About Fingerprints
सध्या मोबाईल लॉक करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फिंगर प्रिंट सेन्सर. कमाल आहे ना, प्रत्येकाच्या हाताच्या प्रत्येक बोटांचे ठसे वेगळे असतात. अनेक हस्तरेषातज्ज्ञ हाताच्या फिंगरप्रिंट्स घेऊन वर्तवतात. पूर्वी करारपत्रावर सहीऐवजी अशिक्षित लोकांच्या अंगठ्याचा ठसा घेतला जात असे. अजूनही काही महत्वाच्या करारपत्रावर सही व अंगठ्याचा ठसा दोन्हीही गोष्टी आवश्यक असतात. न जाणो भविष्यात सही बदलली तर अंगठ्याचा ठसा हा सर्वोत्तम पुरावा म्हणून उपयोगी पडेल.
फिंगरप्रिंट या संकल्पनेला शास्त्रीयदृष्ट्या महत्व मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे याचा गुन्हेगार शोधण्यासाठी होणारा उपयोग. सन 1892 मध्ये इन्स्पेक्टर एडुआर्डो अल्वारेझ यांनी अर्जेटिना येथे प्रथम फौजदारी कामासाठी फिंगरप्रिंटचा उपयोग केला. तेव्हापासून फोरेंसिक तपासणीमध्ये फिंगरप्रिंट्स महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून वापरले जातात.
फिंगरप्रिंट या विषयाबद्दल अनेकांना कमालीची उत्सुकता असेल. अगदी आधार कार्ड, ऑफिसमधील बायोट्रिक, मोबाईल अशा वेगवेगळ्या ठिकाणी विविध कारणांसाठी वापरले जातात.
फिंगरप्रिंट्स संदर्भात काही रंजक गोष्टी – About Fingerprints
प्रत्येक बोटाचे फिंगरप्रिंट वेगळे येण्याचे नक्की कारण काय असेल ? मुळात आपल्याला फिंगरप्रिंट असण्याचे कारण काय आहे? शरीरशास्त्राच्या किंवा जैविक दृष्टीने विचार करता, याचा नक्की उपायोग काय आहे?
खरं सांगायचं तर, या प्रश्नाचे ठोस उत्तर तर शास्त्रज्ञांजवळही नाही. याबद्दल शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते मांडली आहेत, थोडक्यात याबद्दल शास्त्रज्ञांचे एकमत नाही. इंग्लंडमधील हॉल विद्यापीठातील बायोमेकेनिक्सचे संशोधक आणि जीवशास्त्र विषयक प्राध्यापक रोलँड एन्नोस यांनी सांगितले, फिंगरप्रिंट बद्दल लोकांच्या मनात असलेल्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फिंगरप्रिंट्समुळे हाताची पकड मजबूत होते आणि दुसरी म्हणजे यामुळे स्पर्श सुधारण्यास मदत होते. एन्नोस यांनी आपल्या कारकिर्दीमधील खूप मोठा काळ या दोन्ही गोष्टींवर संशोधन करण्यात घालविला आहे. – हातावर फिंगरप्रिंट्स असल्यामुळे हाताच्या तळव्याला चांगली ग्रीप येते व त्यामुळे आपण वस्तू पकडू शकतो.
एन्नोस यांनी ‘स्पर्श’ या कारणाला ग्राह्य मानून केलेल्या प्रयोगांमधून असे दिसून आले की फिंगरप्रिंट्समुळे स्पर्श करताना तो स्पर्श ठराविक भागावरच उमटतो. याउलट शरीरावरील उर्वरित भागावरची त्वचा गुळगुळीत असल्यामुळे त्याच्या आधारे केलेल्या स्पर्श संपूर्ण भागावर उमटतो. अर्थात, यामुळे फिंगरप्रिंट्समुळे पकड मजबूत होते ही संकल्पना एन्नोस नाकारत नाही.
फ्रिंगरप्रिंट्स या शब्दाचे शास्त्रीय नाव आहे ‘डायमॅटोग्लिफ (Dermatoglyphics)
… आणि फिंगरप्रिंट्सच्या अभ्यासाचे नाव म्हणजे डर्मेटोग्लिफिक्स.
हा शब्द दोन प्राचीन ग्रीक शब्दांचे मिश्रण आहे.
१. Dermato – from derma (skin) त्वचा
२. Glyph/Glyphics: from gluphikós (sculpted) शिल्पबद्ध
फिंगरप्रिंट्स संदर्भात काही रंजक गोष्टी – Facts about Fingerprints
- साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत फिंगरप्रिंटस संपूर्ण विकसित झालेल्या नसतात व त्यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांचे आधार कार्ड सोळा वर्षानंतर परत तयार करून घ्यावे लागते. याचबरोबर सोरायसिस, ऍसिड अटॅक, इत्यादी कारणांमुळे फिंगरप्रिंट्स खराब होऊ शकतात.
- बाळ आईच्या गर्भाशयात असतानाच फिंगरप्रिंट्स विकसित होतात. अर्थात असे असले तरी जुळ्या व तिळया मुलांच्या फिंगरप्रिंटस मात्र वेगवेगळ्या असतात.
- प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स वेगळे का असतात? हे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञ अपयशी ठरले असले, तरीही हे वेगळेपण नाकारणारा एकही पुरावा आजतागायत मिळालेला नाही. जुळ्या व तिळ्या मुलांच्या फिंगरप्रिंट्सही वेगवेगळ्या असतात. आजवर एकच फिंगरप्रिंट असणाऱ्या दोन व्यक्ती सापडल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
- केवळ माणूसच नाही तर प्राण्यांमध्येही फिंगरप्रिंट्स सापडतात. चिंपांझींच्या शरीर रचनेत फिंगर रिजेज आहेत जे फिंगरप्रिंट्स तयार करतात. अर्थात माकड याप्राण्याला माणसाचा पूर्वज मानल्यास याबद्दल काही विशेष वाटणार नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘माकडाच्या प्रजाती सोडून इतर प्राण्यांमध्येही फिंगर रिजेज आढळल्या आहेत. कोआला नावाचा फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या प्राण्यामध्ये फिंगरप्रिंट्स विकसित झालेले आढळले आहेत. या प्राण्यामध्ये फिंगरप्रिंट्स का विकसित झाल्या हे एक न उलगडलेलं कोडं आहे. ‘कोआला’ हा अस्वल प्रजातीमधील प्राणी आहे
- ‘डीएनए’ ही संकल्पना विकसित झाल्यावरही फिंगरप्रिंट्सचे महत्व कमी झालेले नाही.
- वास्तविक, अद्यापही फिंगरप्रिंट्स हाच गुन्ह्याच्या ठिकाणी मिळणार सर्वात महत्वाचा पुरावा समजला जातो.
- पूर्वी गुन्हा अन्वेषणापुरताच मर्यादित असणाऱ्या फिंगरप्रिंटस आता बायोमॅट्रिक संकल्पनेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे.