Aarti Tukarama
सतराव्या शतकामध्ये या महाराष्ट्र भूमीला लाभलेले महान संत म्हणजे संत तुकाराम महाराज हे होत. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायी प्रथेचा पाया रचण्याचे महत्वपूर्ण काम केले. त्यानुसार, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा या वारकरी प्रथेचा कळस रचण्याची बहुमूल्य जबाबदारी पार पडली.
संत तुकाराम महाराज हे प्रखर पांडुरंग भक्त होते. त्यांची विठ्ठलाच्या चरणी अनन्य साधारण श्रद्धा जुळली होती. संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठ्ल्ल मूर्तीचे सुरेख वर्णन करीत असतं.
संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनातून ते एक निष्ठावंत विठ्ठल भक्त असल्याचे निष्पन्न होत असे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन होवून गेलेले ते एक महान संत होते. शिवाजी महाराज स्वत: त्यांच्या कीर्तनास उपस्थित राहत असतं.
संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना मंत्रमुग्ध करून टाकत. त्यांच्या कीर्तनाला सर्व समाजातील लोक येत असतं. संत तुकाराम महाराजांनी कधीच लहान मोठा, जात पाथ अश्या प्रकारचा हेवा केला नाही. त्यांनी सर्वांना एक मानून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सर्व पांडुरंगाची लेकर आहोत अशी शिकवण दिली.
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून संत तुकाराम यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार असून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेल्या तुकाराम महाराज आरतीचे लिखाण करणार आहोत.
तुकाराम महाराजांची आरती – Aarti Tukarama
आरती तुकारामा |
स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती |
पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत |
जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे |
अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||
तुकितां तुलनेसी |
ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें |
चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
सतराव्या शतकाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन होवून गेलेले महान संत संत तुकाराम महाराज हे एक महान संत होते. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्थरांतील लोकांना एकत्र करून पांडुरंग भक्ती करण्याचा बहुमोलाचा सल्ला दिला. या महान संतांचा जन्म वसंत पंचमीच्या मुहूर्तावर माघ शुद्ध पंचमीला झाला होता.
संत तुकाराम महाराज यांचा जन्म धनधान्य संपन्न असलेल्या परिवारात झाला होता. संत तुकाराम यांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले(मोरे) असून ते आपल्या तीन भावांपैकी मधले होते. मोठ्या भावाचे नाव सावजी तर धाकट्या भावाचे नाव कान्होजी होते.
संत तुकाराम महाराज यांच्या आई कनकाई आणि वडिल बोल्होबा यांचे निधन झाले त्यापाठोपाठ थोरल्या भावाची पत्नी वारली आणि त्यानंतर तुकाराम महाराज यांची नेहमीच आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई यांचे सुद्धा निधन झाले. एकापाठोपाठ एक दुख आल्याने त्यांचे थोरले भाऊ वैतागून घर सोडून गेले.
परंतु, संत तुकाराम महाराज यांनी हार न मानता विठ्ठल भक्तीत मग्न राहू लागले. संत तुकाराम महाराज यांचे वडिल सावकारीचे काम करीत असल्याने तुकाराम महाराज यांच्या हिशात आलेली सावकारीचे कागदपत्रे त्यांनी इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाहून टाकली. असे करतांना त्यांनी आपल्या परिवाराचा जरा देखील विचार केला नाही.
तुकाराम महाराज यांची बेताची परिस्थिती असतांना देखील त्यांनी हे कृत्य केलं. तुकाराम महाराजांच्या या कृत्यातून त्यांच्या अंगी असलेला थोरलेपणा दिसून येतो.
संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजात रूढ असलेल्या अनेक अनिष्ठ प्रथा मोडून काढल्या. तसचं,त्यांनी आपल्या हिस्यातील लोकांच्या कर्जाची कागदपत्रे नदीत फेकून दिल्याने गुलामगिरीची चौकट देखील मोडून काढली. संत तुकाराम महाराज एक निर्भीड संत होते. त्यांनी कोणाच्याही विरोधाला न जुमानता जनमानसात वारकरी संप्रदायाचे बीज रोवण्याचे काम निरंतर सुरूच ठेवले. त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, साक्षात पांडुरंग देखील आपल्या भक्तांसाठी धावून येत असतं.
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनात विठ्ठल भक्ती आणि वारकरी प्रथेचे बीज रोवत संत तुकाराम महाराजांनी फाल्गुन वद्द्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले. या दिवसाला आपण वैकुंठ बीज म्हणून साजरा करीत असतो.संत तुकाराम महाराज यांची महिमा खरच खूप थोर आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजा यांच्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी गीतगाथा या ग्रंथाच्या माध्यमातून भागवत गीतेवर टीका केली आहे. मित्रांनो, आपण देखील संत तुकाराम महाराज यांच्याबाबत उपलब्ध असलेली पुस्तके वाचून त्यांच्या बद्दल माहिती जाणून घ्या. तसचं, दरोरोज हरिपाठ म्हणतांना तुकाराम आरतीचे पठन करा.