Mom And Dad Status in Marathi
आई आणि वडील जगातील अश्या व्यक्ती आहेत ज्यांच प्रेम बाकी व्यक्तींसारखे बदलत नाही, त्यांच प्रेम तसंच राहत असते तुम्ही वयाने लहान असाल किंवा मोठे त्यांच प्रेम तुमच्यासाठी तसच राहत. आपल्याला त्यांच प्रेम शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे. आजच्या लेखात Aai Baba Status पाहणार आहोत, जे त्यांच प्रेम जगापेक्षा किती वेगळं आहे हे दिसून येत, आपल्या लेकरासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावतील असे आईवडील असतात. तर चला पाहूया काही आईवडिलांवर सुविचार (Parents Quotes)…
आईबाबांसाठी मराठी मॅसेज –

आई दिव्याची ज्योत असते आणि प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो.
Quotes on Aai Baba

आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते, आणि बाबा एकमेव माणूस जो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो.
Quotes on Parents in Marathi

आई वडिलांची कोणतीही गोष्ट सोडा परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका.
Quotes on Aai Baba in Marathi

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान.
आईवडिलांसाठी मराठी विचार – Mom And Dad Status in Marathi

मी खूप श्रीमंत आहे कारण माझ्याकडे आई बाबा आहेत.
Status for Parents in Marathi

आई वडिलांच मन जिंका नाहीतर जग जिंकून पण काही उपयोग नाही.
Parents Status in Marathi

काही लोकांचं प्रेम कधी बदलत नाही आणि त्यांना आई बाबा म्हटलं जातं.
Parents Quotes in Marathi

स्वतः आधी जे तुमचा विचार करतात ते आईबाबा.
Palak Quotes in Marathi

जे रडवून मनवतात ते बाबा असतात आणि जी रडवून स्वतः पण रडते ती आई असते.
Parents Suvichar

फुल कधी दुसऱ्यांदा फुलत नाही, जन्म कधी दुसऱ्यांदा मिळत नाही, तसे तर बरेच लोक भेटतात पण हजार चुका माफ करणारे आई वडील कधी मिळत नाही
ह्या Parents Quotes आपल्याला त्यांच प्रेम अनुभवून देतील, की कश्या प्रकारे ते आपल्या पाल्यावर प्रेम करतात, जीवनात कितीही मोठे व्हा पण आई वडिलांना मात्र विसरून जाऊ नका, जर तुम्ही आई वडिलांना विसरले तर तुमची अधोगती तेव्हापासूनच सुरू होईल, आई बाबांना आपले दैवत मानून त्यांचा आदर करा, असे कार्य करा ज्या कार्याने त्यांची मान गर्वाने उंच होईल आणि आपल्या आईवडिलांना कधीही दुखवू नका, आशा करतो ह्या Aai Baba Status आपल्याला आवडले असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!