Aadvik Foods Success Story in Marathi
आपल्या देशात बरेच स्टार्टअप सुरू झाले, सोबतच त्यांची ख्याती आज विदेशात सुध्दा होते. आज आपला देश जागतिक स्तरावरील देशांमध्ये नाव कमवत आहे. कारण आपल्या देशातील कला, कौशल्य, आणि बाकी गोष्टींचे जगाला दर्शन होत आहे. आज जगात भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते.
भारत विकसनशील राष्ट्र असला तरी सुध्दा देशात नवनवीन कल्पना जन्म घेत आहेत आणि त्यामुळे देश विकसित राष्ट्र बनण्याचे प्रयत्न सुरू ठेवत आहे. तर आजच्या या लेखात आपण अशीच एक स्टार्टअप स्टोरी पाहणार आहोत ज्यामध्ये दोन मित्रांनी एका नवीन कल्पनेला जन्म दिला आहे. तर आशा करतो आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडणार. तर चला पाहूया ही आगळी वेगळी स्टार्टअप स्टोरी.
असाही एक स्टार्टअप ज्यामध्ये उपयोगात आणले उंटाचे दूध – Aadvik Foods Success Story in Marathi
ही स्टोरी आहे दोन मित्रांची ज्यांनी बऱ्याच प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम केले होते आणि काही तरी नवीन सुरुवात करण्यासाठी कल्पना शोधत होते. तेव्हा त्यांना लक्षात आले की राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये उंटाच्या दुधाचे खूप महत्व आहे. आणि या दुधाचा वापर करून आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर कारण या दोन्ही राज्यांमध्ये उंटाच्या दुधाचे उत्पन्न आणि त्याचा वापर खूप व्हायचा.
या विषयी योग्यरीत्या प्लॅनिंग करून त्यांनी २०१६ मध्ये आद्विक फूड नावाची एक कंपनी सुरू केली, ज्यामध्ये उंटाच्या दुधाची प्रोसेसिंग करून प्रॉडक्ट्स बनविल्या जात. ज्याप्रकारे बाकीच्या स्टार्टअप ला उभे करण्यासाठी मेहनत लागते. त्याचप्रकारे या स्टार्टअप ला उभे करण्यासाठी सुध्दा तेवढीच मेहनत लागली.
हितेश राठी आणि श्रेय कुमार यांनी सुरुवातीला १० लाख रुपयांची गुंतवणूक करून या व्यवसायाला उभे केले होते. ज्यामुळे वाळवंटातील उंटाचे रक्षण सुध्दा होईल आणि तेथील शेतकऱ्यांना रोजगार सुध्दा मिळेल. आज आद्विक फूड १५०-२०० शेतकऱ्यांच्या संपर्कात असून २ – ३ लाख ग्राहकांपर्यंत पोहचले आहे.
उंटाच्या दुधाचा फायदा पाहिला असता दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी ची भरपूर मात्रा, सोबतच लॅक्टोज सारखे तत्व या दुधात पाहायला मिळतात. फक्त दूधच नाही तर चॉकलेट, मिल्क पावडर, आणि उंटाच्या दुधाने बनलेले मॉइश्चरायझर, फेशियल स्क्रब, फेस वॉश अश्या प्रकारचे सर्व प्रॉडक्ट्स आद्विक फूड बनवते. आणि ग्राहकांचा या प्रोडक्ट्सना चांगल्या रिते प्रतिसाद सुध्दा मिळतो.
आज आद्विक फूड चे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट, अमेझॉन, बिगबास्केट, या सारख्या ई- कॉमर्स कंपन्यांवर सुध्दा आद्विक फूड चे सर्व प्रोडक्ट उपलब्ध आहेत. आज आद्विक फूड एक ब्रँड बनले आहे आणि या प्रोडक्ट्सना विदेशातून सुध्दा मागणी येत आहे. अमेरिका, फिलिपिन्स, तसेच मलेशिया या देशांमध्ये सुध्दा या कंपनीच्या प्रोडकट्स ची निर्यात होते.
आज जर आद्विक फूड चे वार्षिक उत्पन्न पाहिले असता करोडोंच्या घरात आहे, ही तीच कंपनी आहे जी १० लाख रुपयांची गुंतवणूक करून उभी केल्या गेली होती. या स्टार्टअप मुळे तेथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, आणि त्यांचे जीवन आता एका नव्या दिशेने वाटचाल करत आहे.
आशा करतो आपल्याला लिहिलेली ही स्टोरी आवडली असणार आपल्याला लिहिलेली स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा, माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!