Chess Information in Marathi
मित्रांनो जसे कि आपल्याला माहित आहे खेळांचे दोन मुख्य प्रकार असतात, मैदानी आणि घरगुती (Indoor Games) खेळ. घरगुती खेळ म्हणजे असे खेळ जे आपण घरी बसल्या-बसल्या खेळू शकतो. यामध्ये अनेक खेळ येतात जसे कि, कॅरम, पत्ते, सापशिडी आणि इतर काही.
असाच एक घरगुती खेळ आहे बुद्धिबळ (Buddhibal Game). होय, ज्या प्रमाणे खेळाच्या नावात बुद्धीचा उल्लेख होतो अगदी तसाच बुद्धीचा उपयोग या खेळात करावा लागतो. बुद्धिबळात जिंकायचे झाल्यास आपल्याला कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट निर्णय क्षमता या गोष्टींची गरज लागेल.
“Chess (बुद्धिबळ)” बौद्धिक पातळी वाढविणारा खेळ – Chess Information in Marathi
बुद्धिबळाचा इतिहास – Chess History
बुद्धिबळाचा इतिहास तसा खूप जुना आहे. त्यामुळे हा खेळ नेमका केव्हा सुरु झाला याचा अंदाज बांधणे थोडे कठीणच आहे. परंतु खेळाची सुरुवात भारतात झाली असल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार भारतात ६ व्या शतकापासून बुद्धिबळ खेळल्या जायचे. हळू-हळू हा खेळ संपूर्ण जगात प्रसिद्ध होत गेला.
बुद्धिबळासाठी लागणारे साहित्य – Chess Equipment
खेळासाठी आपल्याला लाकडी किंवा कुठल्याही पदार्थापासून बनलेला एक चौरस ठोकळा लागतो. या ठोकल्यावर ८ उभे स्तंभ आणि ८ आडव्या पंक्ती अशा प्रकारे एकूण ६४ लहान चौरस असतात. हे सर्व चौरस अनुक्रमे पांढऱ्या आणि काळ्या रंगाने रंगविलेले असतात.
या सोबतच १६ काळ्या आणि १६ पांढऱ्या सोंगट्या असतात. हा खेळ दोन खेळाडूंत खेळला जातो. यापैकी एकाला काळ्या तर दुसऱ्याला पांढऱ्या सोंगट्या दिल्या जातात. १६ सोंगट्यांमध्ये ८ प्यादे, २ हत्ती, २ उंट, २ घोडे, १ राजा आणि १ वजीर अशा विविध प्रकारच्या सोंगट्या असतात.
बुद्धिबळ कसा खेळायचा आणि त्याचे नियम – How to Play Chess or Chess Rules
हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळल्या जातो. समोरील खेळाडूच्या राजाला मात देणे हा प्रत्येक खेळाडूचा हेतू असतो. राजाच्या बचावासाठी उर्वरित सोंगट्यांचा उपयोग केला जातो. प्रत्येक सोंगटीची विशिष्ट अशी चाल असते.
१. प्यादे (Pawn) : १ घर सरळ चालते पण जेव्हा प्याद्याच्या तिरप्या बाजूला समोरील खेळाडूची सोंगटी येते, तेव्हा ते तिरपे चालू शकते.
२. हत्ती (Rook) : फक्त आडवी आणि उभी चाल चालू शकते. ही चाल कितीही घरांची असू शकते.
३. उंट (Bishop) : कितीही घरांपर्यंत तिरपी चाल चालतो.
४. घोडा (Knight) : कुठल्याही दिशेला २ घर सरळ आणि १ घर आडवी चाल करू शकतो.
५. वजीर किंवा राणी (Queen) : कितीही घरांची आडवी, उभी आणि तिरपी चाल चालू शकतो.
६. राजा (King) : जो पर्यंत राजाला संकट येत नाही तो पर्यंत चालू शकत नाही. संकट आल्यास कुठल्याही दिशेला १ घर चाल करू शकतो.
बुद्धिबळातील खेळाडूंची संख्या – Number of Players in Chess
चेस हा खेळ फक्त २ खेळाडू खेळू शकतात. यापैकी एकाला पांढऱ्या सोंगट्या दिल्या जातात तर दुसऱ्याला काळ्या सोंगट्या दिल्या जातात. ज्या खेळाडूकडे पांढऱ्या सोंगट्या असतात, पहिली चाल तो चालतो.
भारतीय बुद्धिबळ खेळाडू : Indian Chess Players
भारतीय खेळाडू कुठल्याच खेळात मागे नाहीत. मग बुद्धिबळ त्याला अपवाद कसा ठरेल. आपल्या देशात अनेक दिग्गज बुद्धिबळ खेळाडू आहेत. यामध्ये पुरुषांबरोबर महिला देखील सामील आहेत.
१. पुरुष खेळाडू : (Male Players)
- विश्वनाथन आनंद
- सूर्य शेखर गांगुली
- परिमार्जन नेगी
- पेंताला हरीक्रीष्ण
- बास्करण आधीबन इ.
२. महिला खेळाडू : (Female Players)
- कोनेरू हम्पी
- पद्मिनी रौत
- ईशा करवडे
- द्रोणावल्ली हरिका
- तानिया सचदेव इ.
बुद्धिबळा विषयी काही महत्वाचे प्रश्न – Quiz on Chess
१. बुद्धिबळाचा खेळ किती खेळाडू खेळू शकतात?
उत्तर: २ खेळाडू.
२. बुद्धीबळ हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का?
उत्तर: नाही.
३. भारतातील जगप्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू कोण?
उत्तर: खेलरत्न विश्वनाथन आनंद.