Badminton Information in Marathi
मनुष्याच्या जीवनात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे. चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते. त्यातही जर मैदानी खेळ खेळलात तर विचारायलाच नको. मैदानी खेळांचे अनेक फायदे पाहायला मिळतात. या खेळांमधून व्यायाम, चंचलता, सांघिक कार्य करण्याची वृत्ती आणि असे बरेच गुण अंगीकारता येतात.
मैदानी खेळात टेनिस, फुटबॉल, खो-खो असे अनेक खेळ सामील होतात. यांपैकी एक महत्वाचा आणि तेवढाच प्रसिद्ध खेळ म्हणजे बॅडमिंटन. या खेळाचा इतिहास, नियम, साहित्य आणि इतरही माहिती आज आपण बघणार आहोत.
बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती – Badminton Information in Marathi
बॅडमिंटन खेळाचा इतिहास – Badminton History
हा खेळ तसा पाहता फार प्राचीन नाही. खेळाची सुरुवात १८७३ पासून झाल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. खेळाचे नियम तसे साधे आणि सोपे असल्याने अगदी घरोघरी किंवा गल्ली-बोळात हा खेळ खेळता येऊ शकतो.
बॅडमिंटन खेळासाठी लागणारे साहित्य – Badminton Equipment
यासाठी आपल्याला एक कॉर्क आणि पक्ष्यांच्या पंखांपासून तयार केलेले फुल लागते, ज्याला शटलकॉक म्हणतात. तसेच वजनाने हलक्या आणि दोराने विणलेल्या दोन फळ्या लागतात. या फळ्यांना रॅकेट म्हणतात. यासोबत दोन खेळाडूंच्या मध्ये बांधण्यासाठी एक जाळी सुद्धा लागेल.
बॅडमिंटन खेळाचे नियम – Badminton Rules
हा खेळ दोन प्रकारांत खेळला जाऊ शकतो. मैदानाच्या दोन्ही बाजूंना १-१ खेळाडू असल्यास त्याला ‘सिंगल्स’ तर २-२ खेळाडू असल्यास ‘डबल्स’ असे म्हणतात.
प्रत्येक खेळाडूने रकेट च्या सहाय्याने शटलकॉक विरुद्ध खेळाडूकडे मारावे. आणि विरुद्ध बाजूच्या खेळाडूने सुद्धा असेच करावे. मारतांना शटलकॉक जाळीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच खेळाडू मैदानाच्या कुठल्याही बाजूला स्पर्श करणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे. शटलकॉक मारल्या नंतर ते विरुद्ध बाजूच्या मैदानाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जो पर्यंत शटलकॉक जमिनीला स्पर्श करत नाही तो पर्यंत खेळ असाच सुरू राहतो. ज्या बाजूच्या कोर्टला शटलकॉक स्पर्श करेल त्या विरुद्ध बाजूच्या खेळाडूला गुण दिल्या जातात.
बॅडमिंटन खेळाचे मैदान : Badminton Ground or Badminton Court
खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. हे कोर्ट आयताकृती असून त्याची लांबी ४४ फुट आणि रुंदी १७ फुट (सिंगल्स साठी) आणि २० फुट (डबल्स साठी). तसेच कोर्टच्या मधोमध ५ फुट उंचीवर जाळी (नेट) बांधलेली असते.
बॅडमिंटनमधील खेळाडूंची संख्या – Number of Players in Badminton
खेळात सिंगल्स आणि डबल्स असे दोन प्रकार असतात.
१. सिंगल्स : यामध्ये दोन्ही बाजूनी १-१ असे एकूण २ खेळाडू सहभागी असतात.
२. डबल्स : यामध्ये प्रत्येक बाजूनी २-२ असे एकूण ४ खेळाडू सहभागी असतात.
भारतीय बॅडमिंटन खेळाडू – Indian Badminton Players
इतर खेळांप्रमाणे बॅडमिंटनमध्ये देखील भारतीय खेळाडूंनी बाजी मारलेली आहे. भारतात या खेळाचे अनेक दिग्गज खेळाडू आहेत.
१. पुरुष खेळाडू : Male Players
- प्रकाश पदुकोन
- किदंबी श्रीकांत
- पुलेला गोपीचंद
२. महिला खेळाडू : Female Players
- पी. व्ही. सिंधू
- सायना नेहवाल
- ज्वाला गट्टा
बॅडमिंटन खेळाबद्दल विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न : Questions about Badminton
१. बॅडमिंटन खेळ पहिल्यांदा कुठे आणि केव्हा खेळला गेला? (Where was Badminton First Played?)
उत्तर: इंग्लंड येथे १८७३ साली बॅडमिंटन खेळ पहिल्यांदा खेळला गेला होता.
२. बॅडमिंटन खेळत एकूण किती खेळाडू सहभागी असतात?
उत्तर: सिंगल्स मध्ये दोन्ही बाजूंनी १-१ असे एकूण २ तर डबल्स मध्ये दोन्ही बाजूंनी २-२ असे एकूण ४ खेळाडू सहभागी होऊ शकतात.
३. बॅडमिंटन हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का?
उत्तर: होय.
४. भारतातील कुठल्या खेळाडूने बॅडमिंटन खेळामध्ये ऑलिम्पिक पदक मिळविले आहे?
उत्तर: सायना नेहवाल (कांस्य पदक २०१२) आणि पी. व्ही. सिंधू (रजत पदक २०१६)
५. भारतात पहिल्यांदा बॅडमिंटन खेळ कुठे खेळण्यात आला?
उत्तर: पुणे येथे.
६. बॅडमिंटन खेळातील जाळी (नेट) ची उंची किती असते? (Badminton Net Height)
उत्तर: जमिनीपासून ५ फुट उंचीवर.