महाराष्ट्र म्हटलं कि सर्वांना आठवतो, मराठ्यांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांशिवाय हा इतिहास अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या साथीला मावळे तर होतेच पण सोबतीला होते महाराष्ट्रातील भक्कम किल्ले.यातीलच एक किल्ला म्हणजे रामशेज किल्ला. नाशिकपासून साधारणतः १४-१५ किमी, नाशिक-पेठ रस्त्यावर आपले बलदंड शरीर घेऊन उभा असलेले रामशेज किल्ला प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतो.
रामशेज किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती – Ramshej Fort Information in Marathi
रामशेज किल्ला ऐतिहासिक महत्व – Ramshej Fort History in Marathi
नाव (Name)
रामशेज किल्ला (Ramshej Fort)
ठिकाण(Location)
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र (Dist. Nashik, Maharashtra)
उंची (Height)
३२७० फुट (3270 feet)
कथा पुराणांनुसार असे म्हटले जाते कि, प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी रामशेज किल्ल्यावर वास्तव्य केले. रामशेज किल्ल्यावर प्रभू श्रीरामांची शेज किंवा शैय्या असल्याचे वर्णन आहे. यावरूनच किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ पडले असल्याचे समजते.शिवाय मराठ्यांच्या इतिहासात देखील महत्वाचा किल्ला म्हणून रामशेज गडाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर वारंवार आक्रमणे केली. यामध्ये रामशेज गडाचे नाव देखील सामील होते.गड जिंकण्यासाठी त्याने आपला कर्तबगार सरदार शहाबुद्दीन खानाला पाठवले. मुघलांच्या हजारोंच्या सैन्याला मात्र काही शेकडो मावळ्यांनी शह दिल्याचे इतिहासात नमूद आहे. छत्रपती संभाजी राजेंनी महाराजांच्या पाठीशी हा किल्ला मोठ्या शिताफीने लढवला.जवळपास सहा-साडेसहा वर्षे चाललेल्या या दीर्घ लढ्यात मुघलांनी हत्ती, घोडे व तोफांनीशी सर्व ताकदीने हल्ला चढवला. परंतु त्यांना यश काही हाती लागत नव्हते. दुर्भाग्याने गडाचा किल्लेदार मुघलांना फितूर होऊन हा गड मुघलांच्या ताब्यात गेला असे इतिहासात नमूद आहे.
रामशेज गडाचे भौगोलिक स्थान : Geographical Location Of Ramshej Killa
रामशेज गड हा नाशिक जिल्ह्यात असून स्वराज्यातील इतर गडांसारखा दऱ्याखोर्यांत किंवा फार उंचीवर नसून सपाट भूभागावर आहे. हा गड सर्व बाजूंनी चढता येऊ शकतो. लहान ते वयोवृद्ध दुर्गप्रेमी या गडावर सहज चढू शकतात. अगदी तास-अर्धा तासात आपण हा गड सर करू शकतो.
रामशेज गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Places to See on Ramshej Fort
हा गड फार विस्तारलेला नसून याचे क्षेत्र तसे कमीच आहे. गडाजवळ प्रभू श्रीरामांचे मंदिर असून सोबत माता सीता, लक्ष्मण, व भक्त हनुमान विराजमान आहेत. पाण्याचे कुंड, सीता गुंफा इ. पौराणिक स्थळे आहेत. सितागुंफेतून गडावर जाण्यासाठी एक बोगदा असल्याचे म्हटले आहे. गडावरील कोरीवकाम अतिशय सुरेख व आकर्षक आहे.यांशिवाय पाण्याच्या टाक्या, बुरुज हे पाहण्यासारखे आहे. गडावर चढताना एक शिलालेख दिसतो. ज्यावर गडाचा इतिहास कोरलेला आहे. हा लेख वाचल्यावर अंगावर काटा उभा राहतो. गडापासून साधारणतः ८ कोसांवर त्र्यंबकगड आहे. रामशेज गडावरून आपण सातमाळा डोंगररांग बघू शकतो.
रामशेज गडावर कसे जाल – How to reach Ramshej Fort
नाशिक वरून जवळपास १४ – १५ किमी वर नाशिक – पेठ रस्त्यावर रामशेज किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. येथे आपण बसनी किंवा रिक्षाने जाऊ शकतो. आपली खाजगी वाहने घेऊन सुद्धा येथे जाता येते.
रामशेज गडावर कधी जावे – Best Time to Visit Ramshej Fort
गिर्यारोहक व निसर्गप्रेमी येथे पावसाळ्यात भेट देतात. पावसाने बहरलेला निसर्ग गडावरून न्याहाळण्यात काही औरच मजा आहे.काही महत्वाची प्रश्ने : (FAQs)१. रामशेज किल्ल्याची उंची किती आहे?
उत्तर : समुद्रसपाटीपासून जवळपास ३२७० फुट.२. रामशेज किल्ला कोणी बांधला ?
उत्तर : हा किल्ला कोणी बांधला याचा कुठलाही ठोस पुरावा पाहायला मिळत नाही.३. ‘रामशेज’ गडाचे नाव कसे पडले?
उत्तर : कथा-पुराणांनुसार प्रभू श्रीराम आपल्या वनवासादरम्यान या गडावर विश्राम करत होते म्हणून गडाचे नाव ‘रामशेज’ असे पडले.४. रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता?
उत्तर :
Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...
Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...