गंगा नदीबद्दल संपूर्ण माहिती – Ganga River Information in Marathi
भारत देशातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही नद्यांपैकी एक नदी म्हणजे गंगा नदी. ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिचा उगम उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री येथे आहे व ती पूर्व वाहिनी नदी आहे.गंगा नदी भारतात उगम पावून समोर बांग्लादेश मध्ये सुद्धा वाहत जाते जिथे तिला पद्मा नावाने संबोधल्या जाते.
नाव
गंगा
देश
भारत
उगमस्थान
गंगोत्री
राज्य
उत्तराखंड
लांबी
२५१० किमी
प्रवाह
पूर्व वाहिनी
किनाऱ्या वरील राज्ये
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, बांगलादेश
गंगेची लांबी सुमारे २,५१० किमी आहे. हि नदी उत्तराखंड मध्ये उगम पावते. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आणि शेवटी बांग्लादेशात प्रवेश करून बंगालच्या उपसागरास मिळते.जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील झालेला ‘सुंदरबन चा त्रिभुज प्रदेश’ हा गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्यांमुळे तयार झाला आहे.गंगेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. गंगा जल म्हणजे अमृतच अशी धारणा लोकांची आहे. शिवाय कुंभमेळ्यामुळे सुद्धा गंगेला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे.
गंगा नदीचे ऐतिहासिक महत्व – Importance of Ganga River
गंगा हि हिंदू धर्मातील एक पवित्र नदी मानली जाते. गंगा नदीला केवळ नदीच नव्हे तर देवी म्हणून पूजले जाते. असे म्हटल्या जाते कि भगीरथ राजाने अथक प्रयत्न करून गंगेला स्वर्गातून पृथ्वी वर आणले.रामायण आणि महाभारतात देखील गंगा नदी बद्दल लिहल्या गेले आहे. वेद आणि पुराणांमध्ये सुद्धा गंगेचा उल्लेख पाहायला मिळतो. आजही कितीतरी ऋषी-मुनींची आश्रम या नदी किनारी पाहायला मिळतात.पण सरळ पृथ्वी वर न येता ती महादेवाच्या जटांंमध्ये विराजमान झाली व तिथून पृथ्वी वर वाहत आहे. गंगेत अंघोळ केल्याने सर्व पाप नाहीसे होतात अशी सुद्धा लोकांची मान्यता आहे.
भौगोलिक महत्व – Ganga River History
गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमुळे ११ राज्यामध्ये नदीचे खोरे निर्माण झाले आहे. या खोऱ्यांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. तसेच नदी प्रवाहात स्थानिक लोक मासेमारी करतात, सिंचनासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो.स्थानिक लोकांच्या रोजच्या गरजा सुद्धा नदिमुळे भागविल्या जातात. दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार लाभला आहे.गंगेचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग :नदीवर ५ मोठे जल विद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. जसे कि
यमुना जल विद्युत प्रकल्प (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड)
चंबळ जल विद्युत प्रकल्प (मध्य प्रदेश आणि राजस्थान)
राजघाट जल विद्युत प्रकल्प
मातातीला जल विद्युत प्रकल्प
रीहंद जल विद्युत प्रकल्प
ज्या मुळे मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होऊन जवळपासच्या गावांना व शहरांना वीज पुरविल्या जाते.
गंगा नदीच्या उपनद्या – Tributaries of Ganges
गंगेला उजव्या आणि डाव्या अशा दोन प्रकारच्या उपनद्या आहेत.१. उजव्या उपनद्या :
यमुना
तमसा (किवा टोन)
सोन
पुनपून
चंदन
दामोदर
कर्मनाशा इ.
२. डाव्या उपनद्या :
गंडकी
गोमती
कोसी
ब्रम्हपुत्रा
रामगंगा
घाघरा
महानंदा इ.
गंगा नदीचे वैशिष्ट्य : About Ganga River
भारताची ओळख असलेला कुंभ मेळा हा गंगेच्या काठावर भरतो. त्यामुळे नदीला एक वेगळेच महत्व प्राप्त होते. हा मेळा बारा वर्षातून एकदा भरतो. प्रयागराज (अलाहाबाद) आणि हरिद्वार या ठिकाणी हा ‘महाकुंभ’ मेळा भरत असतो. या वेळी गंगा तीरावर भव्य आयोजन केले जाते.यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर साधू संत जमा होतात. पवित्र गंगा स्नान करतात ज्याला शाही स्नान म्हणून संबोधल्या जाते.विशेष म्हणजे अभ्यासातून असे दिसून आले आहे कि इतर नद्यांच्या तुलनेत गंगेतील कचरा हा लवकर विघटीत होतो. इतिहास काळातील बहुतेक राजधान्या गंगा किनारीच वसलेल्या होत्या.
नमामि गंगे योजना : Namami Gange Scheme
एवढी सर्व विशेषता असणाऱ्या गंगा नदीचे पावित्र्य आज धोक्यात आहे. त्याचे कारण असे कि आज गंगेचे खूप जास्त प्रमाणावर प्रदूषण होत आहे. ते कमी करण्यासाठी सरकारनी ठोक पाऊले सुद्धा उचलेली आहेत.त्यापैकी एक म्हणजे ‘नमामि गंगे योजना’. या योजने अंतर्गत केंद्र सरकारने एका विशेष रक्कमेचे नियोजन नदीच्या सफाई करिता केले आहे.तर मित्रांनो हि होती आपल्या देशातील एका महत्वाच्या आणि पवित्र नदी बद्दलची थोडक्यात माहिती. मी आशा करतो कि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल.गंगा नदी विषयी नेहमी विचारल्या जाणारी प्रश्ने :
१. गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे ?
उत्तर : भागीरथी आणी अलकनंदा.२. गंगेला पवित्र नदी का मानले जाते ?
उत्तर : कारण गंगेचा उल्लेख हा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. शिवाय गंगेत अंघोळ केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते.३. आपण गंगेच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जाऊ शकतो का ?
उत्तर : गंगा नदीचे पाणी पिण्या योग्य नाही. परंतु प्रक्रिया करून आपण ते पिऊ शकतो.४. गंगा नदीतील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी कोणता ?
उत्तर : गंगा नदीतील डॉल्फिन.५. जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर : नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे.६. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती ?
उत्तर : ब्रम्हपुत्रा.७. भारताचा राष्ट्रीय जलीय जीव कोणता ?
उत्तर : गंगा नदीतील डॉल्फिन.८. गंगा नदीत किती प्रकारच्या माशांच्या प्रजाती पाहायला मिळू शकतात ?
उत्तर : जवळपास २६८ प्रकारच्या माशांच्या प्रजाती गंगेत पाहायला मिळू शकतात.९. गंगेचा सर्वात लांब प्रवाह कोणत्या राज्यात पाहायला मिळतो ?
उत्तर : उत्तर प्रदेश.
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...