Dattacha Palana
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून भगवान दत्त यांच्या जन्मदिनी गायला जाणाऱ्या पाळण्या बाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
दत्ताचा पाळणा संग्रह – Dattacha Palana
Bala Jo Jo Re Sukumara
।।१।। जो जो जो जो रे सकुमारा । दत्तात्रया अवतारा ।। धृ०॥
कमलासन विष्णु त्रिपुरारी । अत्रिमुनींचे घरीं ।। सत्व हरूं आले नवलापरी । भ्रम दवडिला दुरी ।। जो०।।१।।
प्रसन्न त्रिमूर्ती होऊन । पत्रत्वा पावुनी । हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ऋषीचे सदनी ।। जो०।
नक बांधविला सायासी । निर्गुण ऋषीचे वंशी ।।
मला अविनाशी । अनसूयेचे कुशी ।। जो.।।३।।
दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।।
गादासासी सुख थोर । आनंद होतो फार ।। जो.।।४।।
Dattacha Palana
जो जो जो रे जो जो जो जो । तूं मी ऐसे उमजो ।।धः।।
प्रेम पालख दत्तात्रयाः । हालविती माता अनसूया ।।
बोधुनि निजरूप समजाया । भवभ्रम ही उडवाया ।।जो.।।१।।
रजोगुणी तूं ब्रह्मया । श्रमलासी तान्हया ।।
सुखे निज आतां सखया । धरि रे स्वरूपी लया ।।जो.।।२।।
तमोरूप तूं सदाशिव । विश्रांती घे देवा ।।
धरि रे स्वरूपी तूं भावा । संहारिता विश्व ।।जो.।।३।।
विष्णु सात्त्विक तूं अहंकार । दैत्यांचा संहार ।।
करितां श्रमलासी अपार । आतां समजे सार ।।जो।।४।।
ऐसा आनंदे पाळणा । मालो गातसे जाणा ।।
सद्गुरु कृपे आपण । दत्ता निरंजना ।।जो.।।५।।
या भूतलावर भगवान दत्त यांच्या जन्माबद्दल अनेक कल्पनिक कथा प्रचलित आहेत. त्यानुसार, अत्रीऋषीं नामक ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न होवून भूलोकावर प्रकट झाले आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले.
अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी जन्माला आली.
त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दत्ताचे पारायण करून रात्रीच्या समयी महिला जागरण करून भगवान दत्तांचा जन्मदिन साजरा करतात.
भगवान दत्ताच्या जन्मदिनी दोरीचा पाळणा करून त्यांच्या जन्माची महती सांगणारा पाळणा देखील म्हटला जातो. या लेखात आम्ही अश्याच प्रकारच्या एका पाळणा गीताचे लिखाण केलं आहे. जेणेकरून हे पाळणा गीत तुम्ही भगवान दत्त यांच्या जन्मदिनी गावू शकता.
मित्रांनो, भगवान दत्त यांच्या जन्मा बद्दल अनेक धार्मिक कथा परिचित असल्या तरी त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी झाला अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान दत्त यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात दत्त जयंतीच्या रूपाने साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त घरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते.
त्याकरिता, निरनिराळ्या प्रकारची फुले, पाने, फळे, आदी सामुग्रीच्या साह्याने पूजा मांडण्यात येते. मित्रांनो, वर्षातून एकदाच या पूजेचे आयोजन करण्यात येत असल्याने आपल्या ओळखींच्या सर्व दत्त भक्तांना या पूजेकरिता बोलवण्यात येथे.
भगवान दत्त यांच्या जन्मदिनी करण्यात येणारी ही पूजा दिवस आणि रात्रभर सुरूच असते. रात्रीच्या समयी महिला दत्तांच्या जन्माच्या वेळेला दोरीचा पाळणा बांधून पाळणा गीत म्हणतात. भगवान दत्ताच्या जन्म उत्साहात जणू संपूर्ण लोक मंत्रमुग्ध होवून जातात. भगवान दत्त यांच्या जन्मदिनी गायला जाणाऱ्या विशेष पाळण्याचे लेखन आम्ही या लेखात केलं असून आपण या पाळण्याचे आवश्य वाचन करावे. धन्यवाद..