16 January Dinvishes
१६ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 January Today Historical Events in Marathi
१६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 January Historical Event
- १६८१ ला रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्यभिषेक केला गेला.
- १९४१ ला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी इंग्रजांच्या नजरबंदीत घरात असून सुद्धा आजच्या दिवशी देशाबाहेर पलायन केले.
- १९५५ ला पुण्याला असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे आजच्या दिवशी तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
- १९७८ ला भारत सरकार ने ५,००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाहेर केल्या.
- १९९८ ला प्रसिद्ध उर्दू कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१६ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १६३० ला शिखांचे सातवे गुरु गुरु गुरु हर राय यांचा जन्म.
- १९२६ ला भारतीय संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा जन्म.
- १९२७ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.
- १९४६ ला भारतीय चित्रपट अभिनेता कबीर बेदी यांचा जन्म.
१६ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९०१ ला समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
- १९३८ ला बंगाली साहित्यिक शरत चंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन.
- १९६२ ला प्रसिद्ध लेखक राम नरेश त्रिपाठी यांचे निधन.
- १९६६ ला शिक्षणामध्ये मीरा आंदोलन करणारे साधू वासवानी यांचे निधन.
- १९८८ ला भारताचे आठवे गवर्नर लक्ष्मीकांत झा यांचे निधन.
- १९८९ ला तमिळ चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रेम नाझीर यांचे निधन.
- १९९७ ला कामगार नेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. दत्ता सामंत यांची आजच्या दिवशी गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली.
- २००० ला परराष्ट्र सचिव राहिलेले तसेच बरेच देशात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेले त्रिलोकीनाथ कौल यांचे आजच्या दिवशी निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!