15 January Dinvishes
१५ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 January Today Historical Events in Marathi
१५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 January Historical Event
- १७६१ ला पानिपतचे तिसरे युद्ध समाप्त झाले.
- १९४९ ला सैन्याचे प्रमुख कोदंडेरा मडप्पा करियप्पा यांना फील्ड मार्शल ची पदवी देण्यात आली.
- १९९९ ला आजच्या दिवशी ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकार च्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.
- २००१ ला विकीपीडिया सारखा ज्ञानकोश आजच्या दिवशी लोकांसाठी इंटरनेट वर फ्री मध्ये उपलब्ध झाला.
- २००१ ला गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी ९ वे लष्करप्रमुख म्हणून देशाच्या सेनेचे सूत्र हाती घेतली.
१५ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८५६ ला भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.
- १९१८ ला भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.
- १९२१ ला महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म.
- १९२६ ला प्रसिद्ध कुष्टीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म.
- १९२९ ला नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकेचे मार्टिन लूथर किंग यांचा जन्म.
- १९३२ ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाड़ीया यांचा जन्म.
- १९३८ ला भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.
- १९५६ ला उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा जन्म.
- १९८२ ला प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.
१५ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९७१ ला प्रसिद्ध पेंटर दिनानाथ दलाल यांचे निधन.
- १९९८ ला भारताचे माजी प्रधानमंत्री गुलझारीलाल नंदा यांचे निधन.
- २००९ ला दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.
- २०१२ ला भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.
- २०१४ ला मराठीचे प्रसिद्ध कवी आणि दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन.
१५ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय सैन्य दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!