Trimbakeshwar Jyotirlinga Story
भारतामध्ये एकापेक्षा एक मंदिरे आहेत, एकत्रित पाहता भारतामध्ये हजारो-लाखो मंदिरे आणि त्यांच्यावर कलाकृती असणारे सुद्धा मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात, आणि त्या पैकी बरेचशे मंदिरे हे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात दिसतात.
आपल्या देशात बारा जोतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी एक आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी च्या किनाऱ्यावर वसलेले हे एक शहर त्र्यंबकेश्वर, या शहरात आपल्याला बारा जोतिर्लिंगांपैकी एक जोतिर्लिंग पाहायला मिळत, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर शिवलिंग. तर चला पाहूया त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग आणि तेथील मंदिराविषयी संपूर्ण माहिती.
त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या मागील पौराणिक कथा – Trimbakeshwar Jyotirlinga Story in Marathi
त्र्यंबकेश्वराची पौराणिक कथा – Trimbakeshwar Jyotirling Katha
पौराणिक कथेनुसार, त्र्यंबकेश्वर येथे प्राचीन काळात गौतम ऋषींचा आश्रम होता, आणि येथे सतत २४ वर्षांपर्यंत पाउस पडलाच नाही, आणि त्यामुळे येथील लोक मरण पाऊ लागले, पण तेच गौतम ऋषींच्या आश्रमात पाउस पडायचा, कारण वरून देवता त्यांच्या भक्ती वर प्रसन्न होते, त्या कारणामुळे तेथील आजूबाजूचे लोक त्यांच्या आश्रमात येऊन राहायला लागले,
तेच त्यांच्या आश्रमात इतर ऋषी सुद्धा राहायला लागले, त्यांनतर काही कारणस्तव राहणाऱ्या ऋषींच्या पत्न्यांनी गौतम ऋषींचा अपमान करण्यासाठी स्वतःच्या पतींना प्रेरित केले. त्यानंतर ऋषींनी गणपती ची आराधना केली त्यानंतर गणपती प्रसंन्न झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले,
तेव्हा त्यांनी गौतम ऋषींना आश्रमातून बाहेर काढण्याचा वर मागितला आणि भगवान गणेशजींना विवश होऊन त्यांना तथास्तु म्हणावे लागले. तेव्हा गणेशजींनी एका वयोवृद्ध गाईचे रूप घेतले आणि गौतम ऋषींच्या शेतात जाऊन पिकाला खाऊ लागले, तेव्हा गौतम ऋषी तेथे आले आणि त्या गाईला हातात असलेल्या चाऱ्याने हाकलण्याचे पाहिले, पण चाऱ्याचा स्पर्श होताच गाय खाली पडून मरण पावली.
तेव्हा तेथे आजूबाजूला लपून बसलेले ऋषी बाहेर येऊन गौतम ऋषींवर आरोप लावायला लागलेत कि गौतम ऋषींनी गोहत्या केली. अश्या परिस्थिती मध्ये गौतम ऋषींना सुचेनासे झाले म्हणून त्यांनी तेथील ऋषींना विचारले कि यावर काय प्रायश्चित्त करावे लागेल, तेव्हा त्या ऋषींनी गौतम ऋषींना प्रायश्चित्त करण्याचा सल्ला देत सांगितले कि पृथ्वीची तीन वेळा परिक्रमा करा, त्यानंतर परत येऊन एक महिना येथे तप करा आणि नंतर ब्रम्हगिरी पर्वतावर शंभर वेळा चक्कर मारावे लागतील तेव्हा जाऊन कुठ या पापातून मुक्ती मिळेल,
नाहीतर गंगा नदीला येथे घेऊन या, आणि त्या पाण्यामध्ये स्नान करून, शिवलिंगाचे एक कोटी वेळा स्नान करून शिवजींची आराधना करा आणि परत गंगेच्या पाण्यात स्नान करून शिवलिंगाला स्नान घालावे लागेल तेव्हा कुठे उद्धार होणार असे त्या ऋषींनी सांगितले,
त्यानंतर गौतम ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपस्या केली, आणि या कठोर तपस्सेला पहिल्या नंतर बरेच दिवसानंतर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले तेव्हा त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा गौतम ऋषींनी स्वतःला गो हत्तेतून मुक्त करण्याचा वर मागितला, तेव्हा भगवान शंकरजी ने त्यांना सांगितले कि हा आरोप तुमच्यावर छळ करून लावलेला आहे, आणि हा छळ तुमच्या आश्रमातील काही ऋषींनी केला आहे म्हणून मी त्यांना शिक्षा देऊ इच्छितो,
तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना समजावत म्हटलं कि प्रभू तुमचे दर्शन मला त्यांच्या मुळेच घडले, म्हणून त्यांना या गोष्टीसाठी क्षमा करावी, आणि या गोष्टीवर प्रसन्न होत इतर देवता तसेच गंगा नदी सुद्धा तिथे उपस्थित होते तेव्हा गौतम ऋषी, गंगा नदी आणि इतर देविदेवातांनी भगवान शंकर यांना त्र्यंबकेश्वर येथेच निवास करण्याचा आग्रह धरला,
तेव्हा भगवान शिवजींनी देवतांच्या विनंतीला मान देत त्र्यंबकेश्वर ला गोदावरी नदीच्या तटावर जोतिर्लिंगाच्या रुपामध्ये येथे विराजमान झाले. आणि तेव्हापासून त्र्यंबकेश्वर ला भगवान शंकर यांचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग उपस्थित आहे.
तर हि होती त्र्यंबकेश्वर च्या जोतिर्लिंगाची पौराणिक कथा, आशा करतो आपल्याला आवडली असेल, आवडल्यास या लेखाला त्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, ज्यांना हि पौराणिक कथा माहिती नाही, सोबतच अश्याच आणखी लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!