Trimbakeshwar Temple History in Marathi
नाशिक जवळून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेले देवस्थानाचे स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ला आहे, वर्षातून अनेक भक्त गण संपूर्ण देशातून येथे दर्शनासाठी येत असतात, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि या मंदिराविषयी संपूर्ण माहिती, आणि येथे कसे जाता येईल ते सुद्धा. तर पाहूया.
त्र्यंबकेश्वर मंदिर विषयी संपूर्ण माहिती – Trimbakeshwar Temple History in Marathi
त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी माहिती – Trimbakeshwar Temple Information in Marathi
त्र्यंबकेश्वर चे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, पुरातन काळात बनलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो, आणि मंदिराच्या चहूकडे चार दरवाजे आहेत, पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो, बाकी दिवस भक्तगण बाकी तीन दरवाज्यांतून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.
त्र्यंबकेश्वर येथे असलेल मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे, मंदिराच्या आत मध्ये एक गर्भगृह आहे, आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे, आपल्याला ते डोळ्यांच्या आकाराचे दिसत, आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असत जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा,विष्णू आणि महेश, यांचा अवतार मानल्या जातं.
या मंदिरामध्ये कालसर्प दोषाची शांती करण्यासाठी महान पंडितांच्या हातून करण्यात येते, या मंदिराच्या जवळ तीन वेगवेगळे पर्वत आहेत, ते असे निलगिरी, ब्रम्हगिरी, आणि गंगा द्वार, ब्रम्हगिरी पर्वताला शिवाजींच्या स्वरूपा मध्ये पहिले जात. आणि निलगिरी पर्वतावर निलाम्बिका देवीचे तसेच दत्तात्रयाचे मंदिर उपस्थित आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील विशेष आकर्षण.
- काळाराम मंदिर.
- मुक्तिधाम मंदिर.
- पांडव लेणी गुहा.
- इगतपुरी.
मंदिरातील पुजेची वेळ – Trimbakeshwar Temple Timings
त्र्यंबकेश्वर येथील मंदिर आठवड्यातील सातही दिवस उघडे असते, मंदिर सकाळीच उघडल्या जातं.
- भगवान शंकर्जींच्या सोन्याच्या मुकुटाचे दर्शनाची वेळ : सकाळच्या ४.३० ते ५.०० वाजेपर्यंत
- सकाळची मंगल आरती ची वेळ : ५.३० ते ६.०० वाजेपर्यंत.
- मंदिरातील अभिषेक : सकाळचे ६.०० ते ७.०० वाजेपर्यंत.
- मंदिराच्या बाहेरील अभिषेक : सकाळचे ७.०० ते दुपारच्या १२ वाजेपर्यंत.
- एखादी विशेष पूजा, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप : सकाळच्या ७ ते सकाळच्या ९ वाजेपर्यंत.
- दुपारची पूजा : दुपारचे १.०० ते १.३० वाजेपर्यंत.
- संध्याकाळची आरती : रात्री ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत.
वरील दिलेल्या वेळ ह्या विशेष उत्सवाच्या दिवशी बदलू सुद्धा शकतात.
त्र्यंबकेश्वर ला कसे जावे – How to Reach Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर ला जाण्यासाठी आपण रेल्वे मार्ग, सडक मार्ग, आणि वायुमार्ग या तीनही मार्गांचा अवलंब करू शकता, आपण मुंबईवरून येत असणार तर आपल्याला नाशिक पर्यंत कोणत्याही एका मार्गाने यावे लागेल त्यानंतर नशिक वरून प्रत्येक तासाला बस सुविधा उपलब्ध आहेत.
जर आपण नागपूर कडून येत असणार तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करून यायला कधीही परवडणार. नागपूर वरून मुंबई ला येणाऱ्या भरपूर एक्सप्रेस रेल्वे गाड्या आहेत, आणि नाशिक ला उतरून तेथून बस च्या माध्यमाने आपण त्र्यंबकेश्वर ला जाऊ शकता.
तर हि होती त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी संपूर्ण माहिती, तर आशा करतो हि माहिती आपल्याकरिता उपयुक्त ठरेल, आपल्याला हि माहिती आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!