Octopus Information in Marathi
आपण समुद्रातील अनेक प्राण्यांना पाहिले असेल, जसे मोठमोठे मासे, देवमासे, शार्क, तसेच आणखी काही प्राण्यांना पाहिलं असेल डोळ्याने नाही तर कुठे टेलिव्हिजनवर बघितले असेल, समुद्रात तसे सुद्धा हजारो प्राण्यांच्या प्रजाती आहेत, आणि त्यापैकी बरेचश्या ह्या आपल्या ओळखीचे असतील, आणि काहींना आपण ओळखत सुद्धा नसेल. तसाच एक प्राणी आहे त्याचे नाव आहे ऑक्टोपस.
तर आजच्या लेखात आपण ऑक्टोपस विषयी माहिती पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार तर चला पाहूया समुद्रात राहणाऱ्या या अनोख्या प्राण्याविषयी माहिती.
ऑक्टोपस विषयी संपूर्ण माहिती – Octopus Information in Marathi
हिंदी नाव : | ऑक्टोपस |
शास्त्रीय नाव : | Octopoda |
आपल्याला सर्वांना परिचयाचा असणारा जलचर प्राणी म्हणजे ऑक्टोपस होय.
वर्णन: ऑक्टोपस या प्राण्याचे शरीर मऊ असते. डोळा, चूषक, शुंडके, नलिका, डोके हे ऑक्टोपस या प्राण्याचे अवयव आहेत तसेच या प्राण्याला एक स्नायुमय पाय असतो. हा प्राणी पाण्यात आढळतो.
ऑक्टोपसचे अन्न – Octopus Food
पाण्यातील किडे, किटक हे ऑक्टोपस या प्राण्याचे प्रमुख अन्न आहे.
इतर माहिती: ऑक्टोपस हा प्राणी आपला स्नायुमय पाय प्रचलनासाठी वापरतो. या प्राण्याच्या शरीरान्तर्गत एक कवच असते. हा प्राणी समुद्रात आढळतो. ऑक्टोपस या प्राण्याला आठ पाय आहेत. हे पाय हातासारखे काम करतात. म्हणून त्यांना हात म्हणतात. अशा या आठ भुजांच्या प्राण्याला अष्टभुज’ असेही म्हणतात,
ऑक्टोपस या प्राण्याचे डोके शरीराच्या आतल्या भागात असते ते डोळ्याच्या मागच्या बाजूला असते, हा भाग सहजपणे कोणालाही दिसत नाही.
ऑक्टोपस हा एक समुद्री जीव आहे, आणि तो जास्त प्रामाणात आपल्याला खाऱ्या पाण्यात पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे इतर प्राण्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या फॅमिली मध्ये केलेलं आहे, त्याचप्रमाणे ऑक्टोपस ह्या प्राण्याचे वर्गीकरण करताना याला ऑक्टोपोडिडे ह्या फॅमिली मध्ये वर्गीकृत केले आहे,
आता जर आपण ऑक्टोपस ला बाहेरून पाहू तर तो आपल्याला आठ बाहू असलेला एक प्राणी दिसेल, आणि शरीराच्या मधोमध म्हणजेच बाहूंच्या मधोमध असलेले भाग म्हणजे त्याचे डोके. त्याच डोक्यावर त्याला डोळे पाहायला मिळतात. त्याचे शरीर हे स्पंज सारखे मऊ असते, तो हालचाल करण्यासाठी आपल्या बाहूंचा उपयोग करतो.
काही ऑक्टोपस असे असतात ज्यांचे वजन हे ४ ते ५ किलो असतं. पण जे मोठे ऑक्टोपस असतात त्यांचे वजन हे ४०-५० किलो पर्यंत सुद्धा असतं. ऑक्टोपस हा समुद्री प्राणी जास्त दिवस जगत नाही, ऑक्टोपस चा लाईफ स्पान खूप कमी असतो, काहींचा तर सहा महिनेच आणि काही ऑक्टोपस चे आयुष्य हे ३ वर्षापासून तर ५ वर्षांपर्यंत सुद्धा.
तसे पाहता ऑक्टोपस हा प्राणी मनुष्याला काहीही करणार नाही पण त्याच्या काही प्राजाती ह्या विषारी असतात आणि त्यामुळे ऑक्टोपस पासून माणसाने दूर राहिलेलेच बरं.
आतापर्यंत शास्त्रज्ञांना ऑक्टोपस च्या जवळजवळ ३०० प्रजाती सापडल्या आहेत. ऑक्टोपस वर संशोधन करताना बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत त्या अश्या कि ऑक्टोपस हा दिवसाला एका तासात कमीत कमी १६५ पेक्षा जास्त वेळा आपला रंग बदलू शकतो, सरड्याला मागे टाकण्यात यश मिळवणार कि काय? हा प्राणी.
असो तसेच हा प्राणी खूप चतुर असतो, म्हणजेच आपण यावरून विचार करू शकता कि मोठा ऑक्टोपस शार्क मास्याला सुद्धा मारू शकतो, जो मासा खोडकर तसेच खूप उचापती करणारा म्हणून ओळखला जातो त्या मास्याला सुद्धा ऑक्टोपस मारून खाऊन टाकू शकतो, तर आपण विचार करू शकता हा प्राणी कसा असेल.
तर पाण्याच्या ठिकाणी ऑक्टोपस दिसलाच तर त्याच्या पासून थोडे दूरच रहा, जेणेकरून आपल्याला तो इजा पोहचू शकणार नाही,
आशा करतो आजचा लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आणि या लेखातून आपल्याला ऑक्टोपस विषयी थोडीफार माहिती मिळाली असेल, तर या लेखाला आपल्या मित्रांना सुद्धा शेयर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा या विषयी माहिती मिळेल. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!