Dhwani Pradushan in Marathi
प्रदूषण हे बऱ्याच प्रकारांमध्ये विभागलेल आहे, आणि त्या प्रकारांमधील एक प्रकार हा ध्वनी प्रदूषण सुद्धा आहे त्याला आपण साउंड पोलुशन किवां नॉइज़ पोलुशन देखील म्हणतो, प्रदूषण म्हटलं कि त्या पासून पर्यावरणाला त्रासच होतो मग ते कशाचेही प्रदूषण असो, तर आजच्या लेखात आपण ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तर.
ध्वनी प्रदूषणा विषयी माहिती पाहण्या अगोदर आपण जाणून घेऊया कि प्रदूषण काय तर.
ध्वनी प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती – Dhwani Pradushan in Marathi
प्रदूषण म्हणजे काय? – What is Pollution
प्रदुषकांमुळे पर्यावरणाला जी हानी पोहचते, त्याला आपण प्रदूषण म्हणतो, प्रदूषणाला कमी करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रदूषणाला मुख्यता तीन प्रकारांमध्ये विभागल्या गेले आहे, ते असे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण.
त्यांनतर मृदा प्रदूषण आणि बाकी प्रदूषणाचे प्रकार येतात. तर आजच्या लेखात आपण ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत,
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? – Noise Pollution Information in Marathi
एकसारख्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आवाजामुळे जे प्रदूषण होत त्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हणतात. माणसाच्या कानांना जो आवाज असह्य होतो त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणा ला ध्वनी प्रदूषण म्हणतात.
ध्वनी प्रदूषणाची कारणे – Sound Pollution Causes
- ध्वनी प्रदूषण कश्यामुळे होत या मागे काही कारणे आहेत. त्यापैकी काही खाली दिलेली आहेत.
- गाड्यांचे होर्न, उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात वाजविलेले डीजे वरील गाणे.
- सायरन, फटाके आणि भोंगे यांच्या द्वारे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते.
- पाणबुड्यां मधील ध्वनी लहरी मुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते.
- गरजेपेक्षा कोणत्याही मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते.
- टीवी रेडीओ यांच्या प्रमाणापेक्षा आवाजामुळे सुद्धा प्रदूषण होतं.
ध्वनी प्रदूषणाचे परिमाण – Effects of Sound Pollution
- ध्वनी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे परंतु बरेच लोक या प्रदूषणा विषयी एवढे चिंतीत दिसत नाहीत, यामुळे मनुष्याच्याच नाही तर प्राण्यांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो.
- ध्वनी प्रदूषणामुळे माणसाच्या मानसिकतेवर परिणाम होतो, म्हणजेच लवकर राग येणे वगैरे वगैरे.
- ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व त्यामुळे हृदयाला इजा सुद्धा पोहचू शकते, आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुद्धा संपू शकतं.
- ध्वनी प्रदूषणा मुळे गर्भवती असलेल्या स्त्रियांवर परिणाम होऊ शकतो आणि गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो.
- जे कर्मचारी मोठ्या आवाजांच्या माशिन जवळ काम करतात, त्यांना म्हातारपणा मध्ये बहिरेपण येण्याची शक्यता असते.
- पाणबुडी मधून निघणाऱ्या सोनार या ध्वनी लहरींमुळे समुद्रातील देवमासे जखमी पडतात.
ध्वनी प्रदूषणावर उपाय – Solution of Sound Pollution
- वाहनांच्या होर्नचा कमीत कमी वापर करायची सवय लावणे.
- उत्सवादरम्यान डीजेचा आवज मर्यादित ठेवून उत्सव साजरा करणे.
- हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांच्या जवळ कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होता कामा नये.
- टीवी, रेडीओ यांचा आवाज मर्यादेमध्ये ठेवला पाहिजे.
- कार्यक्रमादरम्यान फटाके किंवा भोंग्याचा आवाज जास्त प्रमाणात न ठेवता कमी आवजात ठेवावा. जेणेकरून आजूबाजूला असणाऱ्या हृदयाच्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही.
तर हि माहिती होती ध्वनी प्रदूषणाविषयी आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबत, अश्याच नवीन नवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद !
Thank You So Much And Keep Loving Us!