Google Office Facts
आजच्या जगात असा एखादाच व्यक्ती असेल कि, ज्याला गुगल विषयी माहिती नसेल, कारण गुगल हि जगविख्यात कंपनी आहे. या कंपनीला स्थापित होऊन बरेच वर्ष झाले आहेत, इसवी सन १९९६ मध्ये या कंपनीला दोन मित्रांनी मिळून सुरुवात केली होती.
आज ती जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये येते. आपण आज काहीही शोधायचे म्हटलं कि लगेच आपल्याला गुगल ची आठवण येते. आणि आपण त्याचा वापर विशिष्ट माहिती शोधण्यासाठी करत असतो.
मित्रांनो, तुम्ही गुगल च्या ऑफिस विषयी जाणल्यानंतर आश्यर्यचकित तर होणारच सोबत त्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल कि आपण सुद्धा तिथे जाऊन काम करावे.
कारण तिथचे वातावरण एवढं छान आहे कि प्रत्येक जण तिथ काम करण्यासाठी उत्सुक असतो.
चला तर पाहू कस विशेष आहे गुगल च ऑफिस !
“ऑफिस पाहिजे ना तर गुगल सारखेच !” – Google Office
गुगल चे प्रत्येक देशात ३-४ ठिकाणी ऑफिसेस आहेत. तेथील प्रत्येक ऑफिस मध्ये शेकडो कर्मचारी काम करतात. गुगल ने आपल्या कर्मच्यार्यांसाठी सगळीच व्यवस्था केलेली आहे.
गुगल ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते आपल्या कर्मच्यार्यांना आपल्या परीवारासारखी वागणूक देतं. प्रत्येक कर्मचारी सुद्धा आनंद घेऊन तिथे काम करतो.
तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मच्यार्यांना दिवसाला त्यांच तीनही वेळेच जेवण उपलब्ध आहे. तेही विनामूल्य !
तसेच त्यांना तिथे चहा कॉफी सुद्धा उपलब्ध असते, जेणेकरून ज्या कर्मच्यार्यांना कामाच्या मध्ये चहा कॉफी ची सवय असेल त्यांना ती मिळू शकेल.
गुगल ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामामधून मिळणाऱ्या फावल्या वेळासाठी काही अॅक्टीविटी ठेवल्या आहेत, ज्या खूप मजेशीर आहेत. आणि त्यामुळे तेथील कर्मच्यार्यांना काम करण्याचा आळस सुद्धा येत नाही. त्यामध्ये बरेचशे खेळ सुद्धा आहेत.
जवळपास आपल्या देशात असे कुठेच ऑफिस असतील ज्यामध्ये कर्मच्यांऱ्यांची काळजी घेतल्या जात असेल व त्यांच्या विषयी विचार केल्या जात असेल.
गुगल मध्ये दर रविवारी त्यांच्या सर्व कर्मच्यार्यांना कंपनी विषयी प्रश्नोत्तराचा तास घेतल्या जातो, आणि कर्मच्यार्यां जवळून कंपनी विषयी फीडबॅक घेतल्या जातो.
ज्यामध्ये प्रत्येक कर्मचारी सहभागी होऊन कंपनीला आणखी उत्कृष्ट कशी बनवायची या विषयावर कंपनीच्या सिईओ सोबत संवाद सादु शकतो.
बरेचश्या गोष्टी गुगल जवळून शिकण्यायोग्य आहेत जसे आपल्या कर्मच्यार्यांशी आपली वागणूक कशी असली पाहिजे. वगैरे वगैरे !
गुगल आपल्या कर्मच्यार्यांना त्या सगळ्या आवश्यक गोष्टी पुरविते ज्या त्यांच्या साठी आवश्यक असतात. गुगल च्या कर्मच्यार्यांना कंपनी मध्ये त्यांना घरच्या वातावरणासारखे वातावरण पुरविल्या जातं.
ज्यामुळे त्यांचे कामामध्ये लक्ष लागतं, आणि ते आपल्या कंपनीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन काम करतात.
आपण बऱ्याच ऑफिस मध्ये पाहतो कि ऑफिस मध्ये कामाला असतांना जर कर्मच्यार्यांसोबत दुखीः घटना होते तर त्यांना त्यांच्या परिवारासाठी काही पैश्यांची मदत केल्या जाते. किंवा त्यांच्या जागी त्यांच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला ते कामाला ठेवतात, हो बरोबर च आहे कि !
गुगल ने सुद्धा त्याचप्रमाणे काही गोष्टी आपल्या कर्मच्यार्यांसाठी केल्या आहेत. गुगल मध्ये नोकरी ला असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्या व्यक्तीच्या परिवाराला त्या व्यक्तीच्या कमाईच्या अर्धी रक्कम प्रत्येक महिन्याला त्यांना पुरविल्या जाते जेणेकरून ते आपली उपजीविका भागवू शकतील.
जर त्या व्यक्तीच मुल लहान असेल तर गुगल त्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्याला १००० डॉलर एवढी रक्कम पुरविते.
तसेच तेथील कर्मच्यार्यांना वर्षातून एकदा विशिष्ट बोनस दिल्या जातो. ज्यामध्ये त्यांच्या पगारापेक्षा जास्त रक्कम मिळते.
ज्या ऑफिसेस मध्ये आनंदमय वातावरण तसेच परीवारासारखे वातावरण असते तिथे कोणाला आवडणार नाही काम करायला !
त्याचप्रमाणे गुगल मध्ये सुद्धा कोणाला काम करायला आवडणार नाही, जर तुमच्या मध्ये कला कौशल्य आहेत तर तुम्ही सुद्धा गुगल मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला गुगल करियर वर जाऊन तिथे आपली माहिती द्यावी लागेल. जेणेकरून गुगल तुमच्याशी संपर्क करू शकेल.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतल्या गुगल विषयी काही गोष्टी ज्यामुळे प्रत्येकाला असं वाटणार कि आपण भविष्यात गुगल चे कर्मचारी बनावे.
जर आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका !अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!