Dahi Handi Information in Marathi
आपल्या महाराष्ट्रात बरेचशे सण साजरे केले जातात, त्यातलाच एक सण म्हणजे दही हंडी, बाकीचे सण जेवढ्या आनंदात साजरे केले जाते तेवढ्याच आनंदात दही हंडीच्या सणाला सुद्धा साजरे केल्या जातं, दही हंडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केल्या जाते, तसेच भारतात इस्कॉन संस्थेच्या द्वारे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो, तर आजच्या या लेखात आपण दही हंडी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडणार. तर चला पाहूया.
“कृष्ण जन्माष्टमी” दही हंडी विषयी संपूर्ण माहिती – Dahi Handi Information in Marathi
दही हंडी का साजरी केल्या जाते? – Why Dahi Handi is Celebrated?
श्रीकुष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दही हंडी. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. पण आपल्याला माहिती आहे का या सणाला का साजरे केल्या जाते, जेव्हा लहानपणी भगवान श्रीकृष्ण दही दुध खाण्यासाठी मातीच्या वर लटकविलेले मडके फोडून त्यामधील दही आणि दुध फस्त करून टाकत,
जर मडके जास्तीचे वर टांगलेले असेल तर श्रीकृष्ण आपल्या मित्रांना घेऊन त्या मडक्याला फोडत असत. आणि त्यामधील दुध, दही, ताक सर्वांमध्ये वाटून खाऊन घ्यायचे. आणि त्यांच्या ह्या गोष्टींना आठवण ठेवत देशात सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सव साजरा केल्या जातो.
अशी साजरी करतात दही हंडी – Dahi Handi Celebration
आपल्या देशातील दही हंडी साजरी करण्याचा आनंद हा पाहण्याजोगा असतो, आपल्या देशातील दही हंडी हि विशिष्ट प्रकारे साजरी केल्या जाते. महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि बरेच ठिकाणी दहीहंडीला साजरे केल्या जाते, आता आपण दहीहंडीचा उत्सव कश्या प्रकारे साजरा केला जातो याविषयी थोडीशी माहिती पाहूया..
दहीहंडी साजरी करण्यासाठी सुरुवातीला एक मातीचे मडके घेतात त्या मध्ये दुध, दही, ताक, आणि काही फळांना कापून टाकले जाते, त्या मडक्याला एखाद्या उंच ठिकाणी दोरीवर मधोमध टांगले जातं. आणि नंतर बाळ गोपाळ आपल्या मंडळा नुसार एक टीम बनवून त्या मडक्या पर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करतात.
मडक्यापर्यंत पोहचण्यासाठी थरांचा उपयोग केल्या जातो, यादरम्यान गोविंदा आला रे आला! या गाण्याचा उद्घोष केल्या जातो. आणि या उत्साहात ज्या गोपाळाने त्या मडक्याला फोडले त्याला डोक्यावर घेऊन आनंद व्यक्त करत असतात, सोबतच त्या पूर्ण टीम ला एक बक्षीस सुद्धा देण्यात येतं. अश्या प्रकारे दही हंडी चा कार्यक्रम उत्साहात साजरा केल्या जातो.
न्यायालयाने जारी केले आहेत दहीहंडी साठी काही नियम – Dahi Handi Celebration Rules
हंडी फोडण्यासाठी जेव्हा थरावरील काही गोविंदा वर चढत असतात तेव्हा त्यापैकी काही गोविंदा हे खाली पडून जखमी होत होते, २०१२ या वर्षी २२५ गोविंदा जखमी झाले होते, म्हणून महाराष्ट्र सरकार ने काही नियम जारी केले होते,
२०१४ ला महाराष्ट्र सरकार ने याविषयी काही नियम जाहीर केले १२ वर्षाखालील कोणत्याही मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये. दहीहंडीत १८ वर्ष पूर्ण असणारी कोणतीही मुले सहभागी होऊ शकतात. त्यानंतर २०१७ साली या नियमांमध्ये बदल करण्यात आला. १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना दहीहंडीत सहभाग घेता येणार नाही.
पण दहीहंडी साठी उंची किती असावी हे उच्च न्यायालायाने स्पष्ट सांगितले नाही आहे. तर अश्या प्रकारे दहीहंडी चा उत्सव साजरा केल्या जातो, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!