Bhaubeej Information in Marathi
दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद उत्साह चैतन्य भरभराट घेउन येणारे असतात. नैराश्याचे मळभ दुर सारून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि म्हणुनच या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट देखील पाहात असतो.
या सणाची जवळपास १५ दिवस शाळांना सुट्टी असल्याने बच्चेकंपनीची तर मजाच असते त्यामुळे त्यांना या सणाची आगळीवेगळी ओढ असते. शाळांना सुट्ट्या, फटाक्यांची आतीषबाजी, फराळावर मारता येणारा ताव त्यामुळे १५ दिवस नुसता धुडगुस असतो.
बरेचजण या दिवसांमध्ये बाहेरगावी जाण्याचे देखील प्लॅन्स् आखतात….
दिवाळीच्या या पाच दिवसांमधे प्रत्येक नात्याचा विचार करण्यात आला आहे… आता बघाना बाप लेकीच्या नात्याचा पाडवा… पतीपत्नीच्या नात्याचा पाडवा… आणि त्यानंतर येतो…
भावा बहीणीच्या नात्याला साजरा करणारा दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज !
दिवाळी भाऊबीज माहिती मराठीमध्ये – Bhaubeej Information in Marathi
भाऊबीजबद्दल माहिती – Bhaubeej in Marathi
कार्तिक शुध्द व्दितीयेला येणाऱ्या या सणाला यमव्दितीया असे देखील म्हणतात. हिंदी भाषीक या सणाला भाईदुज असे म्हणतात.
दिपावलीचा हा पाचवा आणि अखेरचा दिवस असतो. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहिण त्याला ओवाळते अशी पध्दत आहे.
धर्मग्रंथात असे सांगीतले आहे की या दिवशी बायकोच्या हातचे जेऊ नये. भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जाऊन त्याला ओवाळावे स्वतःच्या हाताने तयार केलेले पदार्थ त्याला खाऊ घालावेत.
पौराणिक कथेच्या दाखल्याप्रमाणे आजच्या दिवशी यमराज त्याची बहिण यमुनेच्या घरी गेला आणि तीला वस्त्र अलकांराच्या रूपात अनेक भेटवस्तु दिल्या, तिच्या घरी भोजन केले त्यामुळेच या दिवसाला यमव्दितीया असे देखील म्हणतात. या दिवशी यमुना स्नान करावे असे केल्याने वर्षभर यमाची भिती राहात नसल्याचे बोलले जाते.
आजच्या दिवशी यमराजा आपली बहिण यमीकडे जेवण्याकरता जात असल्याने आजच्या दिवस नरकातील जिवांची नरकाच्या यातनांमधुन सुटका होते अशी आख्यायिका सांगीतली आहे.
यमराजाचा मृत्यु झाल्यानंतर त्याची बहिण यमी हिला अत्यंत दुःख झाले आणि भावनाविवश होउन ती सतत रडु लागली कितीतरी वेळ रडल्यानंतर देखील तीचा दुःख आवेग कमी होई नां आणि तिचे अश्रु थांबेचना अखेर परमेश्वराने दिवस मावळला असे चित्र तिच्या समोर उभे करण्याकरता रात्र निर्माण केली आणि त्यामुळे तिच्या दुःखाची तिव्रता कमी झाली. तेव्हांपासुन भाऊबीजेची परंपरा सुरू झाली.
पाडव्याला पतीचे औक्षवण झाल्यानंतर स्त्रियांना माहेराची ओढ लागते… ही ओढ माहेरी जाउन भावाला भेटण्याची त्याला ओवाळण्याची असते.
या दिवशी बहिण भावाला औक्षवण करण्यापुर्वी आधी चंद्राला ओवाळते… या दिवशी चंद्र देखील लवकर दिसत नाही त्याची छोटीशी कोर दिसते त्यावेळी त्याला ओवाळले जाते आणि त्यानंतर भावाला औक्षवण करतात. सख्खा भाऊ नसल्यास नात्यातील भावाला अन्यथा धर्माच्या भावाला तरी ओवाळावे असे सांगीतले आहे.
ओवाळण्याचे खुप महत्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमधले देवीतत्व जागृत झालेले असते त्यामुळे या काळात भावाने बहिणीच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास त्याला व्यवहारीक आणि आध्यात्मिक दृष्टया लाभ होतो. बहीणीने भावाच्या मस्तकावर लावलेला टिळा म्हणजे बहिणीचे निस्वार्थी प्रेम असते आणि भावाला औक्षवण केल्याने तो यमराजाच्या पाशातुन मुक्त होतो, त्याला मृत्युचे भय राहात नाही तो चिरंजीव होतो असे बहिणीने भावाला ओवाळण्याचे महत्व ग्रंथांमध्ये विशद केले आहे.
अपमृत्यु येऊ नये या करीता आजच्या दिवशी ब्राम्हणास दिपदान करण्याची देखील पध्दत आहे.
सकाळच्या वेळेस बहिणीने भावाला तेल उटणे लावुन अंघोळ घालावी त्याच्या आवडीचा पदार्थ करून त्याला जेवू घालावे त्याचं औक्षवण करावं आणि भावाने बहिणीला भेटवस्तु देऊन बहिणीचा यथोचीत सत्कार करावा.