17 November Dinvishes
१७ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या याशिवाय काही प्रसिध्द व्यक्तीचे जन्मदिवस सुध्दा ह्या दिवशी येतात त्याचबरोबर आजच्या तारखेला निधन पावलेल्या व्यक्तींची माहिती आपणाला देणार आहोत, चला तर मग बघूया आजचा दिनविशेष.
जाणून घ्या 17 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 17 November Today Historical Events in Marathi
17 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 November Historical Event
- मुघल शासक बाबर याने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने १५२५ साली भारतात प्रवेश केला.
- इक्वाडोर व वेनेजूएला १८३१ साली ग्रेटर कोलंबिया या भागापासून विभक्त झाले.
- इंग्लंड या देशाचा जेम्स मुरी याने १८६९ साली तेरा हजार किलोमीटर इतक्या लांब पल्ल्याची पहिली सायकल ची स्पर्धा जिंकली होती.
- तिसऱ्या गोलमेज परिषदेची १९३२ साली सुरुवात झाली होती.
- अमेरिकेने सेवियत संघाला १९३३ साली व्यापारास परवानगी दिली होती.
- भारताच्या रिता फरिया हिने १९६६ सालची जागतिक सुंदरी हा विश्व पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती.
- सेवियत अंतराळ यान ‘ लुनाखोद -१’ १९७० साली चंद्राच्या भूमीवर उतरले होते.
- आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाला १९९९ साली युनेस्को ने मान्यता दिली होती.
- अमेरिकेच्या सिनेट ने आजच्याच दिवशी भारत -अमेरिका परमाणु तहाला २००६ साली मंजुरी दिली होती.
- २००५ साली राष्ट्रपती पदासाठी श्रीलंका येथे निवडणुका पार पडल्या होत्या.
17 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- सरोजिनी नायडू यांच्या पुत्री पद्मजा नायडू यांचा १९०० साली जन्म झाला होता.
- अमेरिका येथील शरीर विज्ञानशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त स्टेनली कोहेन यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द निर्देशक मार्टिन स्कोर्सीस यांचा १९४२ साली जन्म झाला होता.
17 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 November Death / Punyatithi / Smrutidin
- स्वतंत्रता सेनानी लाला लजपत राय यांचा १९२८ साली मृत्यू झाला होता.
- महाराष्ट्रातील प्रभावी व्यक्तिमत्व, राजनेते तसेच शिवसेना या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ साली निधन झाले होते.
- आसाम, जम्मू -काश्मीर व अरुणाचल प्रदेश या राज्यांचे पूर्व राज्यपाल श्रीनिवास कुमार सिन्हा यांचे २०१६ साली निधन झाले होते.