“Ruby Roman Grapes” Most Expensive Grapes
माणसाच्या आरोग्यासाठी फळं आवश्यक असतातच, म्हणून म्हणतात ना की, एक सफरचंद आपल्याला डॉक्टर पासून दूर ठेवतं. म्हणजेच फळांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो, फळांचा उपयोग आपल्या दैनंदिन उपहारात होणे गरजेचं आहेच. मग ते कोणतेही फळ का असेना. पण फळांचा विषय निघालाच आहे तर आज अश्याही एका फळावर नजर टाकूया, जे सामान्य फळांसारखेच आहे पण त्या फळाच्या काही असामान्य गोष्टींमुळे ते खूप जास्त महाग विकल्या जातं.
हो मी त्या द्राक्षांविषयी बोलतोय जे जगातील महाग द्राक्षांपैकी एक आहेत. आजपर्यंत आपण द्राक्षांमध्ये दोन प्रकार च्या रंगांचे पाहिले असतील, एक हिरवे आणि दुसरे काळे पण या द्राक्षांचा रंग काळा किंवा हिरवा नसून गुलाबी आहे. आणि याच द्राक्षांसाठी लोकांना लाखो रुपये मोजावे लागतात. तर चला आजच्या लेखात या नवीन प्रकारच्या द्राक्षांच्या प्रजाती विषयी पाहूया.
एका द्राक्षाच्या गुच्छासाठी मोजावे लागतात ७ लाखापेक्षा जास्त रुपये – “Ruby Roman Grapes” Most Expensive Grapes
जर विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षांच उत्पन्न नाशिक शहरात होते. पण द्राक्षांचा भाव आपल्याकडे एवढा जास्त नाही आहे. आपल्याकडे द्राक्षांचा एखादा गुच्छ शंभर रुपयांमध्ये मिळून जाईल. पण आपण ज्या द्राक्षांविषयी आज माहिती पाहणार आहोत ती द्राक्षांची प्रजाती आपल्याकडील नसून ती जपान मधील आहे. आपल्याला सांगू इच्छितो की ही द्राक्षांची प्रजाती रंगाने गुलाबी आहे. आणि या प्रजातीचे नाव “रुबी रोमन” आहे.
या प्रजातीला जपान मध्ये १९९५ च्या दरम्यान विकसित केल्या गेलं होतं. या द्राक्षांच्या प्रजातींचा इतिहास थोडासा वेगळा आहे. तो असा की या प्रजातीला विकसित करण्याअगोदर जपान च्या काही शेतकऱ्यांनी तेथील रिसर्च सेंटर ला जाऊन द्राक्षांच्या प्रजातींसाठी संशोधन करण्यासाठी विनंती केली. त्यांनंतर प्रिफेकचुलर अग्रीकल्चर रिसर्च सेंटर ने द्राक्षांच्या ३५० ते ४०० पेक्षा काही फांद्यांवर कमीत कमी दोन वर्षे संशोधन केले त्यांनंतर एवढ्या साऱ्या वेलांपासून फक्त आणि फक्त ४ गुलाबी द्राक्षे मिळाले.
या ४ द्राक्षांपैकी एक द्राक्षाची प्रजाती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. ही प्रजाती जपान च्या इशिकवा शहरात उत्पन्न झाली होती म्हणून या प्रजातीच्या द्राक्षांना “इशिकावा चा खजिना” म्हणून ओळखल्या जातं. Ruby Roman ही जगातील महाग द्राक्षांच्या प्रजातींमधील एक आहे. याअगोदर सुध्दा आपल्याला अश्याच जगातील महाग वस्तू आणि गोष्टींविषयी आपण मागील लेखात पाहिले होते. मग ते लाकूड असो की एखादे मसाले असोत.
आजही ज्या प्रजाती विषयी आपण पाहत आहोत ती प्रजाती जगातील महाग द्राक्षांची आहे. या प्रजातीच्या द्राक्षांची जेव्हा शेती केल्या जाते तेव्हा या द्राक्षांचा आकार, स्वाद आणि रंग या सर्व गोष्टींची काळजी घेतल्या जाते. आता आपण या द्राक्षांच्या प्रजातीच्या किमती विषयी पाहणार आहोत. तर ह्या प्रजातींच्या द्राक्षांचे वजन हे मोठ्या प्रमाणात असतं.
आपल्याकडे एका द्राक्षाच वजन ४-१० ग्रॅम पर्यंत असते. पण तेच जर आपण रुबी रोमन प्रजातींच्या द्राक्षांचे वजन पाहिले तर हे वजन १५-२० ग्रॅम पर्यंत असते. सोबतच आपल्याकडील द्राक्षांच्या एका गुच्छात ८०-१०० पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त द्राक्षे असतात, पण या रुबी रोमन च्या प्रजातींमध्ये एका गुच्छात २४-२५ द्राक्षे असतात.
या प्रजातींच्या द्राक्षांची किंमत पहिली असता, एका द्राक्षाच्या गुच्छाला विकत घेण्यासाठी आपल्याला ७-८ लाख रुपयांची किमंत मोजावी लागते. ह्या द्राक्षांना तेच लोक विकत घेतात ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. या द्राक्षांची एवढी जास्त किंमत असण्यामागे एक कारण आणखी आहे की या प्रजातीचे उत्पादन हे अल्पशा प्रमाणात होतं, म्हणून या द्राक्षांची किंमत ही आभाळाला स्पर्श करते.
सोबतच या द्राक्षांचा एक बाईट जर तोडला तर आपले तोंड गोड रसाने भरून येत. असा या द्राक्षांच्या विक्री करणाऱ्या वेब साईट चा दावा आहे, आणि हे खरही असणारच कारण जर एखाद्या फळाची किमंत लाखांमध्ये असेल तर त्या फळाची चव सुध्दा तेवढीच दर्जेदार असेल. आपल्याकडे स्ट्रॉबेरी, किवी, या फळांना ज्याप्रमाणे किंमत मिळते त्याच प्रमाणे जपान मध्ये महाग फळांमध्ये या द्राक्षांना पाहिले जात.
तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!