31 October Dinvishes
मित्रांनो, आज आपल्या देशाचा राष्ट्रीय एकता दिन आहे. या दिवसाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आज आपल्या देशांतील महान स्वातंत्र्यसेनानी व राजकीय नेते तसचं, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन. लोक त्यांना पोलादी पुरुष म्हणून संबोधित असतं. त्यांनी भारताच्या फाळणीच्या वेळेला खूप महत्वाची भूमिका बजावली. अश्या या महान नेत्याला माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून शतशः नमन.
मित्रांनो, आज आपल्या भारताच्या इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी दुर्दैवी घटना म्हणजे, आज आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांचे अंगरक्षक बेअंत सिंह व सतवंत सिंग यांनी गोळी मारून हत्या केली होती. या घटनेने जणू संपूर्ण भारत देशच हादरून गेला होता. या घटनेनंतर देशांत अशांतता पसरली. इंदिरा गांधी यांच्या हत्येमागील गूढ रहस्य अजून सुद्धा उलघडलेल नाही. अश्या या महान नेत्या व पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ३१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 31 October Today Historical Events in Marathi
३१ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 October Historical Event
- इ.स. १८६४ साली नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.
- सन १९२० साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हारराव जोशी, लाला लजपतराय व इतर सदस्यांनी एकत्रितपणे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय राय हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.
- सन १९६६ साली दिल्ली येथील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- सन १९६६ साली प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला.
- सन १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाकडून गोळी मारून हत्या करण्यात आली.
- सन १९८४ साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
३१ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 31 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७५ साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित प्रख्यात लोह पुरुष या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय स्वतंत्रता सेनानी व राजकारणी तसचं, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार तसचं, भारतीय पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सर्वोत्कृष्ट माजी भारतीय क्रिकेटपटू व भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार सी. के. नायडू यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली माजी भारतीय क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्मदिन.
- सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.
३१ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 31 October Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९७५ साली भारतीय हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि गायक सचिन देव बर्मन उर्फ एस. डी. बर्मन यांचे निधन.
- सन १९८४ साली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधन.
- सन १९८७ साली गणितातील आकृतींच्या सिद्धांतासाठी ओळखले जाणारे भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि सांखिकी तज्ञ राज चंद्र बोस यांचे निधन.
- सन २००१ साली प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तसचं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पुतणे ब्रज कुमार नेहरू यांचे निधन.
- सन २००५ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय पंजाबी भाषेतील पहिल्या महिला लेखिका, कादंबरीकार, निबंधाकर आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचे निधन.