27 October Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या इतिहास काळात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहे. आज आपल्या इतिहासात तसेच आधुनिक काळात अनेक काही घटना घडल्या आहेत. त्याच घटनांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती तसचं, निधन वार्ता याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज येथे पाहणार आहोत.
जाणून घ्या २७ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 27 October Today Historical Events in Marathi
२७ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 October Historical Event
- सन १९०४ साली न्यूयॉर्क शहरात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली होती.
- सन १९७१ साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलून झैरे असे ठेवण्यात आले.
- सन १९८२ साली चीन देशाने आपल्या देशातील जनसंख्या एक अरब पेक्षा जास्त असल्याची घोषणा केली.
- सन १९८६ साली युनाईटेड किंग्डमने आर्थिक बाजार पेठांवरील सर्व निर्बंध काढून टाकले.
- सन १९९१ साली तुर्केमिनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळालं.
२७ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८११ साली शिवन कामाच्या मशीनचे पेटेंट घेणारे महान अमेरिकन शोधक, अभिनेता आणि व्यावसायिक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५८ साली नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन राजकारणी, संरक्षक, निसर्गवादी आणि लेखक तसचं, अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ज्युनियर(Theodore Roosevelt) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७३ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन.
- सन १९०४ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि क्रांतिकारक तसचं, क्रांतिकारक भगतसिंग यांचे सहकारी जतींद्रनाथ दास यांचा जन्मदिन.
- सन १९४७ साली महान महराष्ट्रीयन समाजसेवक तसचं, महाराष्ट्रातील थोर कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्मदिन.
- सन १९६६ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय माजी बुद्धीबळपटू दिबेंदू बारू यांचा जन्मदिन.
- सन १९७७ साली श्रीलंकन क्रिकेट संघाचे सेवानिवृत्त क्रिकेटपटू कुमार संगकारा(Kumar Sangakkara) यांचा जन्मदिन.
- सन १९८४ साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज इरफान पठाण यांचा जन्मदिन.
२७ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 October Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १६०५ साली मुघल साम्राज्याचे तिसरे शासक जनालुद्दिन अकबर यांचे निधन.
- इ.स. १७९५ साली भारतातील मराठा साम्राज्याचे 11 वे पेशवे सवाई माधवराव उर्फ माधवराव नारायण यांचे निधन.
- सन १९०७ साली भारतीय स्वतंत्रता सेनानी, ब्रह्मज्ञानी, व पत्रकार तसचं, स्वामी विवेकानंद यांचे वर्गमित्र आणि रवींद्रनाथ टागोर यांचे सहकारी ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे निधन.
- सन १९३७ साली भारतातील किराणा घराण्याचे संस्थापक व भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे निधन.
- सन १९८७ साली माजी भारतीय क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे निधन.
- सन १९९९ साली हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नगेंद्र यांचे निधन.
- सन २००१ साली महाराष्ट्रीयन बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार व लेखक तसचं, बालमित्र मासिकाचे संपादक भास्कर रामचंद्र भागवत यांचे निधन.