23 September Dinvishes
मित्रांनो, प्रत्येक दिवसाचे काहीना काही महत्व हे असतेच, इतिहास घडलेल्या गोष्टींमुळे त्या दिवसाला महत्व प्राप्त होत असते. अश्याच प्रकारे आजच्या दिवशी इतिहासात आजच्या दिवशी काही घटना घडल्या आहे त्याच घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शिवाय, आजच्या दिवशी जन्मदिन आणि निधन पावणाऱ्या महत्पूर्ण व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 23 September Today Historical Events in Marathi
२३ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 September Historical Event
- इ.स. १६४१ साली सहा हजार करोड पेक्षा जास्त सोन्या चांदीने भरलेला रॉयल मर्चंट जहाज इंग्लंडच्या दक्षिणी पश्चिमी समुद्री भागात बुडाला.
- इ.स. १८४६ साली फ्रेंच आणि ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ यांनी संयुक्तपणे नेपच्यून ग्रहाचा शोध लावला.
- इ.स. १८८९ साली विडियो गेम बनविणारी अमेरिकन विश्व प्रसिद्ध कंपनी निनट्याडो ची स्थापना करण्यात आली.
- सन १९८३ साली ‘सेंट किट्स आणि नेव्हिस’ चा संयुक्त राष्ट्रांत समावेश करण्यात आला.
२३ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १२१५ साली चीनमध्ये युआन वंशाची स्थापना करणारे मंगोल शासक कुबलई खान यांचा जन्मदिन.
- सन १९०३ साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेता तसचं, बॉम्बे यूथ लीग आणि कॉंग्रेस सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक युसुफ मेहेर अली यांचा जन्मदिन.
- सन १९०८ साली साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी कवी, लेखक, व निबंधकार रामधारी सिंह दिनकर यांचा जन्मदिन.
- सन १९१७ साली भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्री असीमा चटर्जी यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली भारतीय शिक्षणतज्ञ, विचारवंत, गांधीवादी आणि समाजवादी तसचं, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचा जन्मदिन.
- सन १९२० साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसचं, पुणे येथील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनचे संस्थापक भालचंद्र वामन केळकर यांचा जन्मदिन.
- सन १९३५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता प्रेम चोपडा यांचा जन्मदिन.
- सन १९४३ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुजा समर्थ यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व भारतीय राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक अंशुमन दत्ताजीराव गायकवाड यांचा जन्मदिन.
२३ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 September Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८५८ साली महाराष्ट्रीयन मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँट डफ(James Grant Duff) यांचे निधन
- इ.स. १८६३ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी हरियाणा येथील बंडाचे नेतृत्व करणारे महान क्रांतिकारक राव तुलाराम सिंह यांचे निधन.
- इ.स. १८७० साली प्रख्यात फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार उत्कृष्ट लेखक व कादंबरीकार प्रोस्पर मेरीम्मी यांचे निधन.
- इ.स. १८८२ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर(Friedrich Wöhler) यांचे निधन.
- सन १९३९ साली ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट आणि मनोविश्लेषणाचे संस्थापक सिग्मंड फ्रायड(Sigmund Freud) यांचे निधन.
- सन १९६४ साली महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व नाटककार भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर यांचे निधन.