16 September Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा दिवस आहे.आजच्या दिवशी देश विदेशात अनेक सामजिक, राजकीय, खेळ आदी प्रकरच्या महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. त्या घटनांची तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन, आणि निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आज १६ सप्टेंबर आज जागतिक ओझोन दिन. आपल्या पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा वायू म्हणजे ओझोन हा होय. दिवसांदिवस वाढत चालेल्या प्रदुषणामुळे ओझोनची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला वातावरण खूप गरम असल्याचे जाणवते. याचे महत्व समजून सयुक्त राष्ट्राच्या महासभेने ओझोन वायूच्या संरक्षणासाठी १६ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून जाहीर केला.
जाणून घ्या १६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 16 September Today Historical Events in Marathi
१६ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 September Historical Event
- इ.स. १८२१ साली मैक्सिकोच्या स्वातंत्रतेला मान्यता देण्यात आली होती.
- इ.स. १८६१ साली ब्रिटन देशांतील पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाता उघडण्यास सुरुवात झाली.
- सन १९०८ साली अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स ची स्थापना करण्यात आली.
- सन १९६७ साली सोव्हियत संघाने पूर्व कजाख मध्ये आण्विक चाचणी केली.
- सन १९७५ साली पापुआ न्यू गिनी देशाने ऑस्ट्रेलिया देशाकडून स्वातंत्र्य मिळवील.
- सन २००८ साली भारतीय हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या कर्मचाऱ्यांना विश्वकर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१६ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- सन १९०७ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रोली घराण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्मदिन.
- सन १९१६ साली भारतरत्न, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय कर्नाटकी गायक एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली भारतीय क्रिकेट पंच आर. रामचंद्र राव यांचा जन्मदिन.
- सन १९४२ साली साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी तसचं, १९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. धो. महानोर उर्फ नामदेव धोंडो यांचा जन्मदिन.
- सन १९५४ साली भारतातील बंगाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रख्यात सितार वादक संजॉय बंडोपाध्याय यांचा जन्मदिन.
- सन १९७१ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक व कवी प्रसून जोशी यांचा जन्मदिन.
१६ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 September Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १६८१ साली मुघल शासक दारा शिकोह आणि सम्राट औरंगजेब यांची मोठी बहीण जहाँनारा बेग़म यांचे निधन.
- इ.स. १९३२ साली डासांमुळे पसरणाऱ्या जीवघेणा आजार मलेरियाचा शोध लावणारे ब्रिटीश नोबल पारितोषिक विजेता रोनाल्ड रॉस (Ronald Ross) यांचे निधन.
- सन १९४४ साली भारतीय अभियंता व काशी हिंदू महाविद्यालयाचे माजी उप कुलगुरू ज्वालाप्रसाद यांचे निधन.
- सन १९६५ साली परमवीर चक्र पुरस्कार विजेता भारतीय सैन्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल ए.बी. तारापोर यांचे निधन.
- सन १९७७ साली साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित जयपूर-अतरौली घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन.
- सन १९९४ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक, नाटककार व पत्रकार, तसचं, लोकमान्य या वृत्तपत्राचे माजी संपादक जयवंत दळवी यांचे निधन.
- सन २०१७ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी मार्शल अर्जन सिंह यांचे निधन.