Navratri Aarti Marathi (Udo Bola Udo Aarti)
नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा समूह, मुळात नवरात्र हा शब्द संस्कृत भाषेतील असून ग्रंथांमध्ये स्थानबद्ध केल्या असलेल्या स्वरुपात आपण त्यांचा उच्चार करीत असतो. या शब्दाप्रमाणे आपल्या सर्व ग्रंथांची रचना सुद्धा संस्कृत भाषेत केलेली आहे. माता दुर्गा यांना अनुसरून साजरा करण्यात येत असलेला नवरात्री उत्सव हिंदू धर्मीय बांधवांचा महत्वपूर्ण उत्सव आहे.
या लेखात आम्ही नवरात्री साठी आरती चे लिखाण करीत आहोत त्या मुळे आरती म्हणणे सगळ्यांना सोपे जाईल आणि आदिशक्ती दुर्गा माता सगळ्यांवर प्रसन्न होईल.
श्री नवरात्री देवीची आरती – उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो – Navratri Aarti Marathi
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
तसचं, या उत्सवाचे महत्व ग्रंथांत सुद्धा सांगण्यात आलं आहे. नऊ दिवस साजरा करण्यात येत असलेल्या नवरात्री या उत्सवात माता दुर्गा यांच्या विविध रुपांची पूजा केली जाते. भारतात नवरात्री हा उत्सव हिंदू पंचागानुसार पौष, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमी पर्यंत वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. असे असले तरी चैत्र महिन्यात साजरा करण्यात येत असलेल्या नवरात्री उत्सवाला विशेष महत्व आहे.
नवरात्री या उत्सवा बाबत लोकांची अशी धारणा आहे की, माता दुर्गा या आपल्या वाहनावर स्वार होवून या भूलोकात अवतरीत होत असतात. म्हणून आपण या दिवसांत आपल्या घराच्या बाहेर सडा रांगोळी टाकून घरात देवीची सुरेख आरास मांडली पाहिजे.
नऊ दिवस माता दुर्गा आपल्या भक्तांसोबत राहून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत असतात. म्हणून आपण या दिवसांत माता दुर्गा यांची आराधना करण्यासाठी व्रत केले पाहिजे. त्याचप्रमाणे, दिवसातून एक वेळ साधे जेवण घेऊन रात्री झोपतांना जमिनीवर काळ्या रंगाचे घोगळे पाघरून त्यावर झोपलं पाहिजे.
अश्या प्रकारचे काही नियम आपण या दिवसांत पाळले पाहिजे. असे करण्याचा हाच उद्देश्य असतो की, आपण आपल्या सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींवर ताबा मिळवला पाहिजे.
ज्या ठिकाणी देवीची आरास असते किंवा ज्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते त्या ठिकाणी देवीचा वास असतो. म्हणून या ठिकाणी गाईच्या शेणाच्या गौरीवर राई पेटवून त्याचा सुगंध पूर्ण वातावरणात दरवळू द्यावा. तसचं, दरोरोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती केली जाते.
या दिवसांमध्ये माता दुर्गा या त्यांच्या निरनिराळ्या रुपात अवतरीत होत असल्याने आपण त्यांच्या विविध रूपांच्या नऊ आरत्या म्हटल्या जातात. धूप, अगरबत्ती कपूर लावून त्यांना ओवाळलं पाहिजे. नऊ दिवस चालत असलेला हा उत्सव कधी संपतो हे कळतच नाही. कारण, नवरात्रीच्या नऊ दिवस आपण देवी समोर दांडिया, गरबा खेळत असतो. त्यामुळे, नऊ दिवस आपले जागरण होत असते.
स्त्री पुरुषांप्रमाणे बच्चे कंपनी सुद्धा गरबा खेळण्यात व्यस्त होवूत जातात. अष्टमीच्या दिवशी देवी समोर होम हवन करून मंत्र उच्चारण केले जातात. नव्या दिवशी देवीला निरोप देतांना त्यांची मनोभावे आरती करून देवीची आरास हालवली जाते. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
नवरात्री उत्सवाच्या दहाव्या दिवशी दसरा असल्याने देवीचे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी भाविक देवीला आपट्याची पाने अर्पण करून पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करतात.
वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास नवरात्री उत्सव हा खूप महत्वपूर्ण उत्सव आहे. कारण या दिवसांत करण्यात येत असलेल्या उपवासामुळे आपली शारीरिक प्रकृती सुधारते. सामुहिक आरती करत असतांना आपण जोर जोरात आरती म्हणत असतो, त्यामुळे आपल्या गळ्याचे स्नायू तानले जातात स्नायू ताणले गेल्याने गळया संबंधित आजारापासून आपणास आराम मिळतो.
शिवाय टाळ्या वाजवल्याने हाताचे घर्षण होवून उर्जा निर्माण होते. अश्या प्रकारे वैज्ञानिक दृष्ट्या आपणास लाभ मिळत असतो. आप आपल्या विचारानुसार लोक या उत्सवाबाबत तर्क लावतात.
वरील लेखाचे लिखाण करण्याचा उद्देश्य हाच की, नवरात्री या उत्सवात आपणास देवीची आराधना करण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या नवरात्री आरतीचे लिखाण आम्ही या लेखात केलं आहे. तरी, आपण या लेखात लिखाण करण्यात आलेल्या आरतीचे वाचन करून इतरांना सुद्धा पाठवा.