Lord Krishna Son Samba Story
संपूर्ण जगात हिंदू धर्माला मानल्या जात. एवढच नाही तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माला मानणारे असंख्य लोक आहेत, हिंदू पुराणांमध्ये बरेचश्या अश्या घटना आहेत ज्या लोकांना माहिती नाहीत,
आजच्या लेखात सुद्धा आपण अश्याच एका घटनेविषयी माहिती पाहणार आहोत, जी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, भगवान कृष्णाने स्वतःच्याच मुलाला एक भयंकर श्राप दिला होता, तो श्राप का दिला गेला त्यामागे काय कारण होते कि स्वतःच्या मुलाला भगवान कृष्णाला श्राप द्यावा लागला,
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात पाहायला मिळणार आहेत, तर चला जाणून घेऊया, कि नेमके काय कारण आहे,
भगवान कृष्णाने स्वतःच्याच मुलाला का दिला श्राप? हे होते कारण! – Lord Krishna Son Samba Story
श्रीकृष्णाने श्राप कोणाला दिला होता?
श्रीकृष्णाच्या अनेक राण्या होत्या, पुरणाच्या कथेनुसार एका बहुमूल्य मनी साठी जामुवंत आणि भगवान श्रीकृष्णाचे युद्ध सुरु झाले होते. तेव्हा हे युद्ध एकूण २८-३० दिवस चालले पण त्यानंतर जामुवंताच्या लक्षात आले कि कृष्ण कोणी साधारण व्यक्ती नसून ते एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे,
हे समजल्या नंतर लगेच जामुवंताने मनी कृष्णाला दिला आणि आपली पुत्री जामावंती चा विवाह भगवान कृष्णाशी लाऊन दिला,
लग्नानंतर काही दिवसांनी जामवंती ला दिवस गेले आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. पुत्राची प्राप्ती झाल्यावर जामवंती खूप उल्ल्हासाने भरून आली. तेव्हा त्याचे नाव सांबा ठेवण्यात आले होते. बरेच वर्ष निघून गेले सांबा आता किशोर अवस्थेत आला होता.
तो दिसायला इतका सुंदर होता कि अनेक स्त्रिया त्याच्या सौंदर्याच्या मोहात पडायच्या.
एक दिवस कृष्णाची एक राणी सांबा च्या सौंदर्याला पाहून इतकी हरवून गेली कि तिने सांबा च्या पत्नीचे रूप घेतले आणि सांबाला भेटायला गेली आणि सांबा ला आपल्या आलिंगना मध्ये भरून घेतले.
असे करताच त्या दोघांना श्री कृष्णाने पाहिले, आणि ते पाहून कृष्णाला राग आला तेव्हा श्रीकृष्णाने सांबा ला कुष्ठरोगी बनण्याचा श्राप दिला, तेव्हापासून सांबा चे सौंदर्य कमी होत गेले आणि तो एक कुष्ठरोगी बनला.
श्रापातून मुक्ती:
यावर त्याने अनेक ऋषी आणि मुनींना विचारले तेव्हा त्याला ऋषी कटक यांनी या श्रापासून मुक्ती मिळण्याचा उपाय सांबा ला सांगीतला. त्यांनी त्याला सूर्य देवाची आराधना करायचे सांगितले.
तेव्हा सांबा ने सूर्यदेवाची आराधना करण्यासाठी चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर सूर्यदेवाचे मंदिर बांधून मित्रवन वनामध्ये १२ वर्ष तपस्या केली. १२ वर्षाच्या तपस्ये नंतर सूर्य देव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांबा ला श्रापा पासून मुक्ती साठी चंद्रभागा नदी मध्ये स्नान करण्यास सांगितले,
यानंतर सांबा ने नदी मध्ये स्नान केले असता तो त्या श्रापासून मुक्त झाला. तेव्हा पासून भुवनेश्वर च्या या चंद्रभागा नदीला कुष्ठरोग ठीक करणारी नदी म्हणून सुद्धा ओळखल्या जाऊ लागले.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!