7 September Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून ७ सप्टेंबर या दिनाचे संपूर्ण सामन्य ज्ञान जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा असून या लेखाच्या द्वारे आपण आजच्या दिनाचे संपूर्ण दिनविशेष माहिती करून घेऊ शकता. या लेखात आम्ही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे.
जाणून घ्या ७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 7 September Today Historical Events in Marathi
७ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 September Historical Event
- सन १९०६ साली बँक ऑफ इंडिया या व्यावसायिक बँकेची स्थापना करण्यात आली. सन १९६९ साली या बँकेचे राष्ट्रीयकरण करून ही बँक सरकारी मालकीची झाली.
- सन १९२३ साली आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस आयोग (आय. सी. पी. सी) ची स्थापना व्हीयना येथे करण्यात आली.
- सन १९३१ साली लंडनमध्ये दुसरे गोलमेज संमेलन आयोजित करण्यात आलं होत. या संमेलनामध्ये भारतीय कॉंग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होत.
- सन २००९ साली भारतीय बिलियर्डस खेळाडू पंकज अडवाणी यांनी वर्ल्ड प्रोफेशनल बिलियर्ड्सचे जेतेपद जिंकले.
- सन २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे नीती आयोग द्वारे आयोजित वैश्विक गतिशीलता शिखर संमेलनाचे उद्घाटन केले.
७ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७९१ साली ब्रिटीश राजवटीला आव्हान देणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक उमाजी नायक यांचा जन्मदिन.
- इ.स. १८२२ साली भारतीय चिकित्सक, संस्कृत अभ्यासक आणि गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाचे पुरातन व्यक्ती भाऊ दाजी लाड उर्फ रामकृष्ण विठ्ठल लाड यांचा जन्मदिन.
- इ.स. १८२६ साली बंगाल नवजागृतीचे प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषिक लेखक राजनारायण बसु यांचा जन्मदिन.
- इ.स. १८४९ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय संस्कृत विद्वान आणि महान दार्शनिक संस्कृत-तंत्र अभ्यासक, भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचा जन्मदिन.
- सन १९१७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय चिकित्सक व वैज्ञानिक बानो जहाँगीर कोयाजी यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली भारतीय सहकारी संघटक कार्यकत्या आणि गांधीवादी तसचं, भारतीय स्वयंरोजगार महिला असोसिएशनच्या संस्थापिका इला रमेश भट्ट यांचा जन्मदिन.
- सन १९६३ साली अशोकचक्र पुरस्कार सन्मानित शूरवीर भारतीय वैमानिक नीरजा भनोट यांचा जन्मदिन.
७ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 September Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९५३ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी, कादंबरीकार व लघुकथा लेखक बी. रघुनाथ उर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे निधन.
- सन १९७९ साली भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जनार्दन ग्यानोबा नवले यांचे निधन.
- सन १९९१ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व समाजसुधारक रवी नारायण रेड्डी यांचे निधन.
- सन १९९७ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता मुकुल आनंद यांचे निधन.
- सन १९९८ साली गुजरात, मध्य प्रदेश आणि पॉन्डिचेरी या केंद्र शासित प्रदेशाचे माजी राज्यपाल के. एम चांडी यांचे निधन.
- सन २०१३ साली भारतीय परराष्ट्र सचिव, दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटांचे माजी उपराज्यपाल आणि त्रिपुरा, गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यांचे माजी राज्यपाल रोमेश भंडारी यांचे निधन.