Shiv Tandav Stotram
भगवान शिव यांना देवादिदेव महादेव असे म्हटल जाते. तसचं, भगवान शिव यांची अनेक रूपे आणि नावे देखील प्रचलित आहेत. जसे की, शिव, शंकर, महादेव, भोलेनाथ, नीलकंठ, अश्या प्रकारे त्यांची अनेक नावे प्रचलित आहेत. शिवभक्त आपल्या इच्छेप्रमाणे त्यांची नाव घेत असतात.
भगवान शिव हे वैरागी असल्याने ते भूलोकापासून दूर हिमालय पर्वतावरील उच्च कैलास पर्वतावर राहतात. त्या ठिकाणी ते निरंतर ध्यानिस्थ मुद्रेत बसलेले असतात. भगवान शिव यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा देखील प्रसिद्ध आहेत.
भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासठी भाविक मंदिरात नेहमीच भगवान शिवांची आराधना करीत असतात. पूजा अर्चना करून शिव श्लोकांचे पठन करत असतात. शिव तांडव स्तोत्र म्हणजे साक्षात शिवांचे केलेले वर्णन होय. आम्ही देखील या लेखाच्या माध्यमातून खास आपणासाठी शिवाची आराधना करण्यासाठी शिव तांडव स्तोत्रचे लिखाण केलं आहे. तरी, आपण या श्लोकांचे आवश्य पठन करावे.
शिव तांडव स्तोत्र – Shiv Tandav Stotram
जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम ॥1॥
जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।
विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि ।
धगद्धगद्ध गज्ज्वलल्ललाट पट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं ममं ॥2॥
धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर-
स्फुरदृगंत संतति प्रमोद मानमानसे ।
कृपाकटा क्षधारणी निरुद्धदुर्धरापदि
कवचिद्विगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥3॥
जटा भुजं गपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे ।
मदांध सिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिंभर्तु भूतभर्तरि ॥4॥
सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः ।
भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोर बंधुशेखरः ॥5॥
ललाट चत्वरज्वलद्धनंजयस्फुरिगभा-
निपीतपंचसायकं निमन्निलिंपनायम् ।
सुधा मयुख लेखया विराजमानशेखरं
महा कपालि संपदे शिरोजयालमस्तू नः ॥6॥
कराल भाल पट्टिकाधगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजया धरीकृतप्रचंडपंचसायके ।
धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने मतिर्मम ॥7॥
नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबंधुकंधरः ।
निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥8॥
प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमच्छटा-
विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥9॥
अगर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम् ।
स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥10॥
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-
धिमिद्धिमिद्धिमि नन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥11॥
दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकमस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥12॥
कदा निलिंपनिर्झरी निकुजकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन्कदा सुखी भवाम्यहम्॥13॥
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥14॥
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।
विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम् ॥15॥
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं
विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥16॥
पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं
यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥17॥
॥ इति शिव तांडव स्तोत्रं संपूर्णम्॥
भगवान शिव यांना प्रसन्न करण्यसाठी अनेक प्रकारचे श्लोक प्रसिद्ध आहेत. त्यापैकी आपण या ठिकाणी शिव भक्त रावण यांनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी पठन केलेल्या शिव तांडव या स्तोत्रा संबंधी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
रावण यांना भगवान शिव यांचे परम भक्त मानलं जाते. त्यांनी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या स्तोत्राची रचना केली होती. या शिव तांडव स्तोत्राबाबत अशी मान्यता आहे की, ज्यावेळी रावण कैलास पर्वताला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात होते. त्यावेळी, भगवान शिव यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याच्या साह्याने तो पर्वत खाली दाबला.
परिणाम स्वरूप रावण भगवान शंकर यांच्या दाबामुळे त्या कैलाश पर्वताच्या खाली दाबल्या गेले. रावणाने आपली सुटका करून घेण्यासाठी शिव तांडव या स्तोत्राच्या स्वरुपात भगवान शिव यांची स्तुती केली. त्यामुळे शंकरजी रावणा वर प्रसन्न होवून त्यांनी रावणाची सुटका केली. रावण यांनी भगवान शिव यांची केलेली स्तुती म्हणजेच शिव तांडव होय.
शिव तांडव या श्लोकांप्रमाणे भगवान शिव यांची स्तुती केलेले अनेक श्लोक उपलब्ध आहेत. प्रत्येक श्लोकाचे महत्व वेगवेगळे आहे. शिव भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी नियमित या श्लोकांचे पठन करीत असतात. महाशिवरात्री आणि श्रावण मास निमित्त भाविक मंदिरात या श्लोकांचे पठन करीत असतात.
लोकांची अशी धारणा आहे की, शिव श्लोकांचे पठन केल्याने आपले सर्व दु:ख आणि दारिद्र्य नाहीसे होतात. म्हणून आपण देखील भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी नित्यनेमाने शिव श्लोकांचे आपल्या घरी पठन करावे. धन्यवाद..