Maharaja Bhupinder Singh
“एक था राजा एक थी राणी दोनो मर गये खतम कहाणी”
हा डायलॉग तर आपण ऐकलाच असेल पण काही जुन्या राजा महाराजांच्या बाबतीत हा डायलॉग लागू होत नाही कारण इतिहासातील बरेचशे राजे असे होऊन गेलेत ज्यांच्या एकापेक्षा अधिक राण्या होत्या. आणि तेही फक्त दोन किंवा तीनच नाही तर असंख्य.
आजच्या लेखात अश्याच एका राजाविषयी आपण माहिती पाहणार आहोत, ज्या राजाच्या ३६५ राण्या होत्या. आणि प्रत्येक राणीविषयी राजाला संपूर्ण माहिती असायची मग ती माहिती आजारा विषयी असो कि आणखी काही. कश्या प्रकारे या राजाने एवढ्या सर्व राण्यांची माहिती ठेवली असेल. सोबतच कोण होता हा राजा तर चला पाहूया आजच्या लेखात या राजाविषयी काही आश्यर्य चकित करणाऱ्या गोष्टी.
३६५ राण्या आणि एकुलता एक राजा – Maharaja Bhupinder Singh
भूपेंदर सिंह यांचा जन्म पटियाला च्या मोती बाग १२ ऑक्टोबर १८९१ ला एका राजघराण्यात झाला. भूपेंदर सिंह हे पटियाला चे महाराज राजेंद्र सिंह यांचे सुपुत्र होते. सन १९०० मध्ये राजेंद्र सिंह यांच्या मृत्यू नंतर भूपेंदर सिंह यांना राजगद्दी मिळाली, पण तेव्हा ते लहान असल्यामुळे राज्याचा कारभार सांभाळण्यास ते समर्थ नव्हते पण १९०९ मध्ये जेव्हा ते १८ वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. एवढच नव्हे तर त्यांनी त्यांच्या राज्यात अनेक बदलाव केले.
राजा भूपेंदर सिंह किशोर अवस्थेत असाताना त्यांना अय्याशी करायची सवय लागली होती. ती सवय एवढी जास्त झाली कि ते त्यांच्या खेळण्याच्या वयाला ते विसरून गेले होते. त्यांनी त्यांच्या राज्यात अय्याशी करण्यासाठी एका विशेष ठिकाणाची निर्मिती केली होती त्या महालाला “लीला महाल” असे नाव दिले होते.
या महालामध्ये त्यांचा एक विशेष कक्ष असायचा त्या कक्षाला त्यांनी प्रेम मंदिर असे नाव दिले होते. ज्यामध्ये ते आपल्या राण्यांना वेळ द्यायचे. एव्हढेच नाही तर त्यांचे किस्से आपल्याला “महाराजा” या पुस्तकात वाचायला मिळतात जे दिवान जरमानी दास यांनी लिहिलेले आहे. त्या पुस्तकात कक्षाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, कि कश्या प्रकारे त्या संपूर्ण कक्षात भिंतीवर नग्न स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारे संभोग करताना दाखविले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राजा महालाच्या स्विमिंग पूल मध्ये नग्न स्त्रिया आणि सोबतीला मद्यपान करून मौज करत असे. अश्या प्रकारचे अनेक किस्से आपल्याला महाराजा पुस्तकात वाचायला मिळतात.
राजा भूपेंदर सिंहच्या ३६५ राण्या
भूपेंदर सिंह यांच्या एकूण ३६५ राण्या होत्या. आणि ते प्रत्येक राणीची बातमी आपल्याजवळ ठेवायचे. एवढ्या राण्यांना कश्या प्रकारे सांभाळत असतील हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल तर चला त्याविषयी सुद्धा आपल्याला या लेखातून सांगतो.
राजा भूपेंदर सिंह यांच्या ३६५ राण्या होत्या तर त्यांची सर्व माहिती ठेवणे थोडे कठीण होते, पण त्यासाठी त्यांनी एक सोयीस्कर गोष्ट करून ठेवली होती त्यामुळे प्रत्येक राणीची तब्येत कळत होती. ते अशी कि ज्या महाराणी आहेत त्यांचे नाव ए, बी, सी, डी, ई, एफ़, जी, इत्यादी आणि राण्यांचे नाव अंकानुसार १,२,३,४,५,६ पासून १५० पर्यंत डॉक्टरांजवळ एका चार्ट मध्ये लिहून ठेवलेले असायचे. सोबतच ज्या स्त्रिया राणीवासात कामाला असत त्यांच्या नावाची माहिती सुद्धा त्यामध्ये असायची ती अशी ए१, ए२, बी१, बी२, सी१, सी२, डी१, डी२.
अश्या प्रकारची एक फाईल फक्त राजा आणि डॉक्टर कडे उपलब्ध असायची. आणि त्यांनी डॉक्टरांनी सांगितले होते कि हि सर्व माहिती गोपनीय ठेवायची. म्हणून या फाईल ची माहिती फक्त डॉक्टर आणि राजाला होती त्यामुळे राजाला प्रत्येक राणीविषयी व्यवस्थित माहिती असायची. कोणती राणीची तब्येत ठीक आहे कि नाही हे कळायचे. यावरून ते ज्या राणीची तब्येत ठीक नसेल तिला भेटायला जायचे.
सोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या महालात प्रत्येक दिवशी ३६५ कंदील पेटत असत आणि सकाळी जो कंदील सर्वात आधी विझायाची त्या राणीकडे राजा रात्री झोपायला जात असे.
भूपिंदर सिंह आणि त्यांचे शौक
भूपिंदर सिंह यांना अय्याशी सोबतच पत्ते खेळायला आवडत असे. तसेच वेगवेगळ्या आणि महाग गाड्यांची खरेदी करायला आवडत असे. राजा भूपिंदर सिंग यांच्या जवळ ४४ रोल्स रॉयल्स होत्या. त्यापैकी २० रोल्स रॉयल्स फक्त दिवसाला संपूर्ण राज्याची पाहणी करण्यासाठी वापरल्या जात असत.
एक वेळ राजा भूपिंदर सिंह बर्लिन ला गेलेले असताना तेथे त्यांची भेट हिटलर सोबत झाली होती आणि हिटलर ने राजा भूपिंदर सिंह यांच्यात बातचीत झाल्यावर हिटलर ने त्यांच्यापासून प्रभावित होऊन त्यांना स्वतःची आवडती कार मायबॅक भेट दिली होती.
भारतातील भूपिंदर सिंह हे पहिले महाराज होऊन गेलेत ज्यांनी सर्वप्रथम त्यांच्या राज्यात विमानासाठी रनवे बनविला होता. आणि विमान विकत घेतले होते.
आशा करतो आपल्याला राजा भूपिंदर सिंह यांच्या विषयी लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!