Dhol Tasha Quotes in Marathi
संपूर्ण वर्षात महाराष्ट्रात सणांची रांगच रांग लागलेली असते, होळी झाली की गुढीपाडवा, पाडवा झाला की सणांची सुरुवात चालू पण आपल्या महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणजे आपल्या इथे ढोल ताश्यांच्या गजरात काही सणांना साजरे केल्या जाते. ती एक वेगळीच मजा असते जेव्हा ढोल ताश्यांचे पथक रस्त्यावर उतरते आणि जल्लोषात ढोल ताश्याच्या गर्जात एक वेगळं वातावरण निर्माण करते. त्याच ढोल ताश्यावर आजच्या लेखात Quotes लिहिले आहेत, आशा करतो आपल्याला आवडतील, तर चला पाहूया Dhol Tasha Quotes.
ढोल ताश्यावर मराठी कोट्स – Dhol Tasha Quotes in Marathi
आम्ही वाजवतो फक्त बाप्पासाठी.
Dhol Tasha Marathi Quotes
ते गणपती बाप्पाची मिरवणूक असो की की शिवजयंती की पाडव्याचा सण तेथे ढोल ताश्याची उपस्थित ही प्राथमिक असते. तो नाद ऐकतच राहावा अस वाटतं, तो नाद वेगळाच आहे, जो मनाला समाधानी करतो आणि त्याच्या तालावर नाचायला प्रवृत्त करतो. आणि आपले पाय तो नाद ऐकून स्वतःच हलतात. ढोल ताश्यावर खाली आणखी काही Dhol Tasha Quotes आहेत, तर चला पाहूया.
हक्काने वाजवतो बाप्पाला नाचावतो म्हणूनच आम्ही वादक म्हणवितो.
Dhol Tasha Quotes in Marathi
नाद काय आहे हे फक्त ढोल हातात घेतल्यावर कळतं.
काय वादकांनो तयार आहात ना परत एकदा गाजवायला.
Dhol Tasha Status in Marathi
आम्ही वाजवतो आणि गाजवतो पण सगळ्यांना आमच्याच ठोक्यावर नाचावतो.
वाजवूनी ढोलांचा ठोका भिडतो रसिकांच्या काळजाला, वाढेल जेव्हा ठोका काळजाचा तेव्हा म्हणा हा वादक ढोल ताश्यांचा.
ताश्याच्या तर्रीला साथ आहे ढोलाची बाप्पा कला दिली तू लाख मोलाची.
बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल ताश्याच्या आवाजाने तुमचे पाय जर नाचण्यासाठी थिरकत असतील तर तुम्ही नक्कीच मराठी आहात.
पुढील पानावर आणखी…