2 September Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख अतिशय महत्वाचा असून आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.
जाणून घ्या २ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 2 September Today Historical Events in Marathi
२ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 September Historical Event
- सन १९४६ साली आलेल्या नवीन सरकारने भारतात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात केली.
- सन १९७० साली स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
- सन १९७० साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.
- सन १९९९ साली भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
२ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७७ साली नोबल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सोड्डी(Frederick Soddy) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८५ साली भारतीय समाजसुधारक, पत्रकार आणि श्री नारायण धर्म परिपालणाशी संबंधित क्रांतिकारक टी. के. माधवन यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८६ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समाजसुधारक व इंग्रजी आणि मराठी साहित्याचे शिक्षक श्रीपाद महादेव माते यांचा जन्मदिन.
- सन १९८८ साली भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांचा जन्मदिन.
२ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 September Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९४७ साली प्रसिद्ध भारतीय विद्वान, साहित्यकार व शिक्षणतज्ञ तसचं, अलाहाबाद आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू अमरनाथ झा यांचे निधन.
- सन १९६० साली भारतीय वनस्पतीतज्ञ व ‘विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.
- सन १९७६ साली प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे प्रथम महाराष्ट्रीयन मराठी लेखककादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक वि. स. खांडेकर यांचे निधन.
- सन २००१ साली विश्वातील पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करणारे दक्षिण आफ्रिकेतील महान हृदय विशेषज्ञ व सर्जन क्रिस्टियन बर्नार्ड (Christiaan Barnard) यांचे निधन.
- सन २००९ साली आध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे विमान अपघातात निधन.
- सन २०११ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार व संगीत दिग्दर्शक श्रीनिवास विनायक खळे यांचे निधन.