Krishna Shloka
हिंदू धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथ कथांनुसार द्वापारयुगात या भूलोकात घडलेलं सर्वात मोठ युद्ध म्हणजे महाभारत हे होय.
महर्षी व्यास यांनी या महाकाव्याची रचना केली असून, हिंदू धर्माचे पवित्र महाकाव्य आहे.
त्याचप्रमाणे, महाभारत हे एक प्राचीन संस्कृत महाकाव्य असून, महर्षी व्यास यांनी हे महाकाव्य गणपती यांच्याकडून लिहून घेतलं आहे अशी मान्यता आहे.
महाभारत या महाकाव्याचे प्राचीन नाव जयसंहिता असे आहे. संस्कृत भाषेत लिखाण करण्यात आलेल्या या महाकाव्यात सुमारे एक लाखांपेक्षा जास्त श्लोक आहेत. हे श्लोक म्हणजेच महाभारताचा संपूर्ण सार होय.
आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण श्लोकांचे लिखाण करणार आहोत.
श्रीकृष्ण श्लोक – Krishna Shloka
- वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
- वृन्दावनेश्वरी राधा कृष्णो वृन्दावनेश्वरः। जीवनेन धने नित्यं राधाकृष्णगतिर्मम॥
- पहला मंत्र – ‘ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।‘
- दूसरा मंत्र – ‘ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।‘
- तीसरा मंत्र – ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम, राम-राम हरे हरे।‘
भागवत गीतेत वर्णिल्याप्रमाणे, भगवान श्रीकृष्ण जेंव्हा अर्जुनाला उपदेश देतात तेंव्हा ते संस्कृत भाषेत श्लोकांचा उच्चार करतात.
महाभारत या महाकाव्याप्रमाणे भागवत गीता देखील हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारतातील युद्धाच्या प्रसंगी शिष्य अर्जुनाला उपदेश देतांना ज्या ज्या श्लोकांचा उच्चार केला ते संपूर्ण श्लोक भागवत गीतेमध्ये रचल्या गेले आहेत.
ही गीता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन होय असे महाभारताच्या कथेत म्हटल गेलं आहे.
भगवान श्रीकृष्ण यांना भगवान विष्णूंचे स्वरूप मानलं जाते.
महर्षी व्यास रचित हा पवित्र ग्रंथ मानवी जीवनाला अनुसरून असून या महाकाव्याचे वाचन केल्याने मन प्रसन्न होते. शिवाय, जीवन जगण्यास मनात नवीन आश्या प्रफुलीत होते.
श्रीमद् भागवत गीता चा अर्थ सांगताना आद्य शंकराचार्य म्हणतात की, “श्रीमंता भगवता षडैश्वर्य सम्पन्नेन श्रीकृष्णेन गीता कथिता इति श्रीमद् भगवद्गीता।”
अर्थांत:- ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज इत्यादी गुणांनी परिपूर्ण, संपन्न आणि सुशोभित भगवान श्रीकृष्ण आपल्या त्रिगुणात्मक माया शक्तीला आपल्या अधीन करून आपल्या दिव्य लेलेद्वारे समस्त प्राणिमात्रांवर कृपादृष्टी करण्यासाठी गीतेचे गायन करतात, जिल्हा आपण श्रीमद् भगवद्गीता म्हणून ओळखतो.
Krishna Shloka
भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला उद्देश्यून कथन केलेल्या श्रीमद् भागवत गीते मध्ये प्राणिमात्रांच्या सर्व समस्यांचे अनुकरण करण्यात आलं आहे.
या गीता श्लोकांमध्ये मानवी जीवनाशी निगडीत कर्म, धर्म, कर्मफल, जन्म, मृत्यु, सत्य, असत्य इत्यादी समस्याचे निराकरण करण्यात आलं आहे.
भागवत गीतेचे वाचन केल्यास आपणास या गोष्टींची जाणीव होईल.
भगवान श्रीकृष्ण हे महाभारताच्या वेळी पांडव पुत्र अर्जुन यांचे मार्गदर्शन बनून त्यांच्या रथाचे सारथी बनतात.
या युद्धा प्रसंगी जेंव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना युद्ध खेळण्यास नाही म्हणतात.
त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण आपले विलक्षणीय रूप धारण करून त्यांना आपली खरी ओळख करून देतांना गीता श्लोकांच्या माध्यमातून कर्म आणि धर्म बाबतीत ज्ञान अवगत करून देतात.
मित्रांनो, श्रीमद् भागवत गीताचा अर्थ केवळ गीता वाचणे किंवा माहिती करून घेणे नसून, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या जीवनांत बदल करून घेणे महत्वाचे आहे.