Fastest Car in the World
तुम्हाला माहिती आहे का की जगात असे काय आहे जे सर्वात वेगवान आहे, तर आपण उत्तर देऊ शकता की आपले मन आहे सर्वात जास्त वेगवान हो हे बरोबर सुध्दा आहे. आणि त्या मुळेच आपल्याला एका मिनिटाला किती सारे विचार येऊन जातात. आणि त्या विचारांचा वेग हा सर्वात जास्त असतो, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा हेच वाक्य एखाद्या कार विषयी बोललं जात तेव्हा आपल्याला शोधावे लागते की कोणती कार ही सर्वात जास्त वेगवान आहे.
तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की जगातील सर्वात वेगवान कार कोणती आणि त्याविषयी माहिती. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला सुरुवात करूया.
ही आहे जगातील वेगवान कार – Fastest Car in the World in Marathi
बुगाटी ही जगातील सर्वात वेगवान धावणारी कार आहे. ह्या गाडीने विश्वातील ४८० किलोमीटर प्रति घंटा हे रेकॉर्ड तोडून त्या गाडीने एक नवीन रेकॉर्ड ची भर केली ती म्हणजे ४९० किलोमीटर प्रति घंटा. आणि या रेकॉर्ड ला TUV-Germany च्या टेक्निकल इन्सपेक्शन असोसिएशन च्या टीमने या सर्वात वेगवान धावणाऱ्या गाडीच्या वेगाची नोंद केली.
या ऑटोमोबाईल कंपनीचे इंजिनिअर गेल्या काही महिन्यांपासून या कार वर काम करत होते. त्यांनी त्या गाडीची उंची पहिल्या पेक्षा थोडीशी कमी केली आणि त्यामध्ये काही प्रमाणात सुधार करून गाडीला एक वेगळं रूप दिले. आणि त्यामुळे गाडी वेगवान धावण्यास आणखी फायदा झाला आणि या गाडीचा वेग हा ४९० किलोमीटर प्रति घंटा झाला. आणि ही जगातील सर्वात वेगवान कार म्हणून लोकांच्या समोर आली.
गाडीच्या रियर विंग आणि एअरब्रेक च्या ठिकाणी एका स्टॅटिक युनिट ला लावल्या गेले त्यांनंतर गाडी चालवण्याच्या ठिकाण च्या जागेला कॉम्प्युटर सिस्टिम ने बदलवून टाकले. त्यानंतर यापेक्षाही बऱ्याच वजनाला या गाडीतून कमी करण्यात आले. आणि या मोठ्या बदलांमुळे गाडीचा वेग हा सर्वोत्तम बनला.
बुगाटी कंपनीचे अध्यक्ष स्टीफेन विंकलमैन यांनी त्यांच्या सर्व इंजिनिअर टीम ला तसेच त्या कार चे चालक एंडी वॉलेस (Andy Wallace) यांना या साध्य झालेल्या गोष्टीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि भविष्यात बुगाटी नामक ऑटोमोबाईल कंपनी स्पोर्ट मध्ये यापेक्षाही आणखी वेगाने धावणारी कार बनवू शकते. आणि त्या कार ला लॉन्च करू शकते असे ऑटोमोबाईल कंपनीच्या मालकांनी म्हटले आहे.
आपल्या माहिती साठी वेगवेगळ्या ब्रँड च्या गाड्यांच्या वेगाचे परीक्षण केल्या जात असते, आणि त्यानंतर लोकांसमोर ही माहिती दिली जात असते, या गाड्यांची किमंत सुध्दा खूप महाग असते, या गाड्यांना आपल्याकडील रस्त्यांवरून चालवायचे झाले तर कठीणच. म्हणूनच आपल्या कडे ह्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत.
तर आजच्या वरील लेखात आपण पाहिले की जगातील सर्वात वेगवान कार कोणती ? आणि त्या कार विषयी थोडक्यात माहिती आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!