Hare Krishna Hare Rama Mantra
मित्रांनो, भगवान कृष्ण यांची आराधना करण्यासाठी तसचं त्यांच्या भक्तीत रममाण होण्यासाठी भाविक या कृष्ण मंत्राचा जप करीत असतात. अनुष्टुप्छन्द मध्ये वर्णीत या मंत्रांत ३२ अक्षरे सामावलेली असून हा मंत्र ‘हरे कृष्ण महामंत्र’ या नावाने प्रसिद्ध आहे.
कृष्ण मंदिरात दर्शनाकरिता गेल्यास आपल्या कानी या मंत्राचे शब्द पडतील. भगवान कृष्ण यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी हा मंत्र उच्चारला जातो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून याच हरे कृष्ण मंत्राचे लिखाण करणार असून त्याचे महत्व देखील समजावून सांगणार आहोत.
हरे कृष्ण हरे राम मंत्र – Hare Krishna Hare Rama Mantra
हरे राम हरे राम राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥
संत आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून या मंत्राचा उल्लेख करीत असतात तसेच, त्या मंत्राचा अर्थ देखील समजावून सांगत असतात. ‘हरे कृष्ण’ या मंत्रा बद्दल अशी धारणा आहे की, हा मंत्र ‘कली संतारण उपनिषद’ मध्ये वर्णीत एक कृष्ण मंत्र असून वैष्णव धर्मीय लोक या महामंत्राला ‘महामंत्र’ म्हणून संबोधतात.
हरे कृष्ण या मंत्राबद्दल अशी ऐतिहासिक माहिती मिळते की, सुमारे पंधराव्या शतकाच्या सुमारास चैतन्य महाप्रभू यांच्या भक्ती आंदोलनाच्या वेळी हा मंत्र प्रसिद्धीस पावला होता. शिवाय, अनेक पोथी पुराणात देखील या मंत्राचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे या मंत्राला पवित्र मंत्र मानल जाते.
कृष्ण मंत्रांत तीन भिन्न नावांचा उच्चार करण्यात आला असल्याने भगवान विष्णू यांना ‘हरि’, ‘राम’ आणि कृष्ण या तीन वेगवेगळ्या नावाने पुकारून त्यांची भक्ती करण्यात आली आहे. असा या शब्दांचा अर्थ होतो. परमेश्वराचे ध्यान सदैव आपल्या मनी राहावे अशी प्रत्येक भक्तांची इच्छा असते. म्हणून भक्त परमेश्वराची आराधना करतांना नेहमीच प्रभूच्या नावाचे उच्चारण करीत असतात.
Shop Now: Hare Ram T shirt
ईश्वराच्या नावाचे उच्चारण करण्यामागे भक्तांची अशी धारणा आहे की, ईश्वराच्या नावाची एकसारखी उच्चारण केल्याने आपले शब्द परमेश्वराच्या कानी पडतील आणि ते आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतील. याचे महत्व पटवून देण्यासाठी संत आपल्या कीर्तनातून कृष्ण मंत्राचा सतत उच्चार करीत असतात. हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे या कृष्ण मंत्राच्या उच्चाराने संत संपूर्ण परिसर दणाणून टाकतात.
संत परमेश्वराला जाणीव करून देतात की, हे परमेश्वरा तुम्ही दिलेल्या या मानव रुपी देहात मी तुमची प्रतिमा स्थापन केली असून मी तिची रोज आराधना करीत असतो. तसचं मी या कलयुगी मोहमाया आणि भौतिक साधनांचा त्याग करून या देहरूपी परमेश्वर भक्तीत सतत लीन असतो.
मित्रांनो, खरंच परमेश्वर भक्ती करतांना नामाचा गजर करणे खूप महत्वाचा असतो. परमेश्वराच्या नामाचा गजर केलाच नाही तर परमेश्वराला आपली भक्ती कशी कळेल. म्हणून भगवंताची भक्ती करतांना नेहमीच या कृष्ण मंत्राचा उच्चार केला पाहिजे. प्रभू प्राप्तीसाठी ईश्वर भक्तीच हाच एकमेव मार्ग असल्याने आपण या कृष्ण मंत्राचा सतत उच्चार करावा.. धन्यवाद..