Story of Lamborghini
आपल्याला वेगवेगळ्या गाड्यांची आवड आहे का? जर असेल तर आपल्याला बऱ्याच गाड्यांविषयी माहिती असेल. आणि काही अश्या गाड्या आहेत ज्यांची नावे प्रत्येकाला माहितीच आहेत, ज्यांना गाड्यांची आवड नसेल त्यांना सुध्दा अश्या काही गाड्यांची नावे माहिती असतातच, जसे की Ferrari, Lamborghini.आणि आणखी काही गाड्या. ह्या दोन गाड्या अश्या आहेत की जर ह्या गाड्या आपल्या जवळून सुध्दा निघून गेल्या तर आपली नजर हटणार नाही. दिसायला अप्रतिम आणि दर्जेदार असणाऱ्या ह्या गाड्या आहेत.
मग त्यामध्ये Lamborghini ही गाडी सुध्दा येते. आणि Lamborghini ही कंपनी तर सुरुवातीला ट्रॅक्टर बनवत होती मग ती कंपनी स्पोर्ट कार का बनवायला लागली? तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे ही कंपनी स्पोर्ट कार बनवायला लागली. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार तर चला पाहूया..
फेरारी ने केलेल्या अपमानामधून उदय ‘लेम्बोर्गिनी’ चा – Story of Lamborghini in Marathi
१९१६ मध्ये इटलीच्या एका छोट्याश्या गावात Ferruccio Lamborghini यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या घरी द्राक्षाची बाग होती. आणि त्यांच्या परिवाराप्रमाणे त्यांनाही शेती करण्यामध्ये रस नव्हता. पण त्यांना मशिनरीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. दुसऱ्या विश्वायुद्धात Ferruccio Lamborghini हे वायू सेनेत होते, त्यांनंतर ते मिल्ट्री मध्ये होते, त्यांनी मिल्ट्री च्या काही मशिनरी चा वापर करून ट्रॅक्टर बनवू लागले होते, त्यांनंतर ट्रॅक्टर बनविण्याच्या व्यवसायाने त्यांना श्रीमंत केले.
त्यांना मशिनरीमध्ये सुरुवातीपासूनच आवड होती शिवाय त्यांना वेगवेगळ्या गाड्यांची पण आवड होती आणि म्हणूनच ते नवीन नवीन गाड्यांची खरेदी करत, त्यामध्ये Ferrari गाडी सुध्दा होती, आणि या वेगवेगळ्या गाड्यांच्या खरेदी नंतर त्यांनी ह्या गाड्यांमध्ये शर्यती ठेवण्याचा विचार करत. जेव्हा Ferrari गाडी रस्त्यावर धावत होती त्यावेळी ती खूप जास्त आवाज करत होती. आणि रस्त्यावर चालवताना थोडी रफ वाटत होती.
Ferrari या गाडीत त्यांना सर्वात जास्त एका समस्येला सामोरे जावे लागत होते. ते म्हणजे त्या गाडीच्या क्लच ला नेहमी नेहमी दुरुस्त करावे लागत होते. १९६० मध्ये Enzo Ferrari ही कार तेव्हाची सर्वात बेस्ट स्पोर्ट कार होती. आणि Ferruccio Lamborghini यांनी ठरवले की आपण Enzo Ferrari कंपनी ला त्या गाडी मध्ये असलेल्या समस्येबद्दल सांगायचे ,पण जेव्हा Enzo Ferrari यांनी एका मेकॅनिक कडून आपल्या कंपनी च्या कार ची कमतरता ऐकली तेव्हा त्यांना ते सहन नाही झाले, आणि त्यांनी Ferruccio Lamborghini यांना सांगितले की आम्हाला तुमच्या सारख्या मेकॅनिक च्या सल्याची जराही गरज नाही.
मग काय इथूनच खऱ्या कहाणीला सुरुवात झाली. आणि Ferruccio Lamborghini यांनी ठरवले की यापेक्षा उत्कृष्ट कार चे निर्माण करायचे.आणि त्यांनी १९६३ मध्ये आपल्या स्वतःच्या नावाची एक ऑटोमोबाईल कंपनी ची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला एक प्लॉट विकत घेतला. मोठमोठ्या मशिनरी आणल्या आणि कार बनवायला सुरुवात केली कंपनीच्या गाडीचे स्पेयर पार्ट खूप सहज बनून झाले होते पण आता वेळ होती गाडीच्या इंजिन ची. गाडीचे इंजिन त्यांनी Giotto Bizzarrini यांच्या जवळून घेतले होते. Giotto Bizzarrini यांनी Ferrari साठी सुध्दा तेव्हा इंजिन बनविले होते.
बाकी गाडीचे पार्ट बनविण्यासाठी त्यांनी दोन इंजिनिअर नियुक्त केले होते. त्यांनी गाडीचे बाकीचे पार्ट बनविले होते. आणि काही दिवसानंतर त्यांनी एक नवीन गाडी लॉन्च केली. Turin Motar Show मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या स्पोर्ट कार गाडीला लॉन्च केले होते. १९६४ संपेपर्यंत Lamborghini कंपनीने आपल्या १३ गाड्या विकल्या सुध्दा होत्या. Ferruccio Lamborghini यांना बुल फायटिंग आवडत होती त्यामुळे त्यांनी आपल्या गाडीचा लोगो हा बुल ठेवला.
तर आजच्या लेखात आपण पाहिले की ट्रॅक्टर बनवणारी कंपनी Lamborghini कंपनी स्पोर्ट कार का बनवू लागली, तर आपल्याला या लेखातून माहिती झालेच असेल. तर आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!