Mahishasura Mardini Stotram
हिंदू धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये सुमारे ३३ कोटी देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात सुमारे नऊ करोड दुर्गा आहेत. आदी मा शक्ती दुर्गा देवींची अनेक रूपे आणि नावे प्रसिद्ध असून आपण त्यांची नियमित पूजा करीत असतो.
दुर्गा देवीच्या या नावा आणि रूपांबद्दल अनेक दंत कथा देखील प्रसिद्ध आहेत. आदी मा शक्ती दुर्गा देवी या साक्षात देवी पार्वती यांचा अवतार असून त्यांची सुमारे एकशे आठ नावे आणि रूपे आहेत. प्रत्येक रुपांची विशेष अशी दंत कथा असून आपण त्या कथेनुसार त्या देवीची उपासना करीत असतात.
आज आपण याठिकाणी देवी पार्वती यांच्या महिषासुरमर्दिनी अवताराबद्दल माहिती जाणून घेणार असून देवी महिषासुरमर्दिनी यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या महिषासुरमर्दिनीस्तोत्राचे लिखाण करणार आहोत.
या स्तोत्राबद्द्ल लोकांची अशी धारणा आहे की, या स्तोत्राचे नियमित पठन केल्याने देवीची आपल्यावर सतत कृपादृष्टी राहते. भक्तांच्या रक्षणासाठी देवी पार्वतीने या रूपाचा अवतार धारण केला असून, आपल्या भक्तांच्या हाकेला ती नियमित धावून येत असते. चला तर जाणून घेवू देवी महिषासुरमर्दिनी यांच्या बद्दल प्रचलित असलेली दंत कथा.
महिषासुरमर्दिनी स्तोत्र – Mahishasura Mardini Stotram
Mahishasura Mardini Stotram Lyrics
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषा सुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६ ॥विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९ ॥तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २० ॥अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१ ॥
महिषासुरमर्दिनी अवताराबद्दल माहिती – Mahishasura Mardini Story
महिषासुर नावाच्या राक्षसाने आपल्या जपतपाच्या बळावर देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अजय होण्याचे वरदान प्राप्त केले. या वरदानाच्या बळावर महिषासुर नाहक ऋषीमुनी आणि देवतांना त्रास देत असे. आपल्या शक्तीच्या बळाने उदमग्न असलेल्या महिषासुराला कशाची भीती राहिली नाही. तो सतत आपल्या शक्तीचा दुरुपयोग करीत असे.
महिषासुराने आपल्या शक्तीच्या बळावर नर्क लोकाचा विस्तार स्वर्ग लोकाच्या प्रवेश द्वारापर्यंत केला होता. महिषासुराची हे कृत्य पाहून स्वर्ग लोकांतील देव आश्चर्य चकित झाले होते. त्यांना काय करावं हेच उमजत नव्हत.
शिवाय, महिषासुर यांच्याकडे अजय राहण्याचा वरदान असल्याने त्यांच्यासोबत युद्ध करण्याची कोणाचीच हिमत होत नव्हती. देव लोकांतील देवांची ही स्थिती पाहता महिषासुराने त्यांच्यासोबत युद्ध पुकारले आणि स्वर्ग लोकांतील सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, वरून यासारख्या देवतांचा पराभव करून स्वर्ग लोकांवर आपले राज्य स्थापित केले.
स्वर्ग लोकांवर आपले अधिराज्य प्रस्तापित करून ते देवतांवर अत्याचार करू लागले. परिणामी ब्रह्म विष्णू यांच्यासमवेत स्वर्ग लोकांतील सर्व देवतांनी महिषासुराच्या प्रकोपापासून पुर्थ्वी तसेच, स्वर्ग लोकाचा बचाव करण्यासाठी दुर्गा देवींची उपासना करू लागले.
सर्व देवगण एकत्र आराधना करीत असल्याचे पाहून देवी दुर्गा प्रसन्न झाली. देवतांनी दुर्गा मातेला महिषासुराचा वध करण्यास सांगितला. शिवाय, सर्व देवतांनी आप आपली शास्त्रे दुर्गा मातेला अर्पण केली. दुर्गा मातेने महिषासुराचा वध करण्यासाठी वाघावर स्वार होवून भूलोकावर अवतरल्या.
महिषासुर नावाच्या राक्षसा सोबत त्यांचे नऊ दिवस भीषण युद्ध चालले. महिषासुरा सोबत चालेल्या युद्धात त्यांच्या विविध रूपांचे दर्शन देखील झाले. युद्धाच्या नव्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून आपलं महिषासुरमर्दिनी हे नाव सिद्ध केलं.
महिषासुराच्या निधनानंतर दुर्गा देवीने काली मातेचा अवतार धारण करून नृत्य करू लागल्या. दुर्गा मातेने कालीमातेचे रूप धारण केल्यानंतर त्या जोर जोराने हास्य करीत नृत्य करू लागल्या त्यांचे ते रूप पाहून सर्व देव भयभीत झाले त्यांना वाटले देवी आता संपूर्ण पृथ्वीचा विनाश करतील.
त्यामुळे भीतीने भयभीत होवून देवता भगवान महादेवाकडे गेले. परंतु, शिव ध्यानस्त निद्रेत असल्याने त्यांना देवांचा आवाज एकू आला नाही. जेंव्हा देवीच्या नृत्याने पृथ्वी हलू लागली तेंव्हा त्यांना जाग आली.
भगवान शिव यांनी देवीला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु, आपल्या धुंदीत मग्न असल्याने त्यांना भान राहिले नाही. शेवटी भगवान शिव स्वत: कालिका मातेच्या पाया समोर खाली झोपले. राक्षसांच्या पडलेल्या देहांमुळे त्यांना भगवान शिव दिसले नाहीत.
परंतु त्यांचा पाय शिवांच्या अंगाला स्पर्श होताच देवी पार्वतीला आपल्या पत्नी धर्माचे स्मरण झाले. आपल्या पतीला पाय लागल्यामुळे देवी पार्वती लज्जित झाल्या व त्यांच्या मुखातून त्यांची जिवा एकाएक बाहेर पडली. अश्या प्रकारे देवीचा क्रोध शांत झाला.
याठिकाणी भगवान शिव यांच्या त्याग पणाचा भाव दिसून येतो. सृष्टीच्या रक्षणासाठी आपण कोणत्या स्थाराला जावू शकतो हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिल. अश्या प्रकारे माता दुर्गा यांच्या महिषासुरमर्दिनी अवताराबद्दल दंत कथा प्रचलित असून त्यादिनाचे महत्व म्हणून आपण दरवर्षी नवरात्री महोत्सव साजरा करीत असतो.
दुर्गा देवी यांच्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या माध्यमातून आपण देवींच्या अनेक अवतारांच्या नावांचा उल्लेख केला असून त्याचे आपण नियमित पठन केलं पाहिजे.
मित्रांनो, माता दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यात झालेल्या युद्धाच्या स्थळी भव्य मंदिर उभारले असून ते संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे.