Saraswati Aarti
हिंदू धर्मात विद्येची आराध्यदैवत म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या देवी सरस्वती म्हणजे साक्षात ज्ञानरूपी महासागर होत. ज्ञान, संगीत, कला, आणि विद्या आदी कलांमध्ये पारंगत असणाऱ्या देवी सरस्वती यांना इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलं आहे. म्हणून, विद्यार्थी दशेत आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमित देवी सरस्वती यांची वंदना करीत असतो.
देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी सरस्वती मंत्र, श्लोक आणि आरतीचे नियमित पठन केले जाते. विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वती देवीचे आपल्या जीवनांत अनन्य साधारण असे महत्व आहे. म्हणून ज्ञानरूपी विश्वगुरु असलेल्या सरस्वती देवीची नेहमीच उपासना करायला पाहिजे.
आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून देवी सरस्वती यांची वंदना करण्यसाठी म्हटल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तरी आपण या लेखाचे वाचन करून लेखात नमूद केलेल्या आरतीचे नियमित पठन करावे.
विद्येची आराध्यदैवत सरस्वती देवीची आरती – Saraswati Aarti
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता
सदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी
त्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माताॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता
सदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी
त्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माताचन्द्रबदनि पद्मासिनि, कृति मंगलकारी
मैय्या कृति मंगलकारी
सोहे शुभ हंस सवारी, सोहे शुभ हंस सवारी
अतुल तेज धारी
जय जय सरस्वती माताबाएं कर में वीणा, दाएं कर माला
मैय्या दाएं कर माला
शीश मुकुट मणि सोहे, शीश मुकुट मणि सोहे
गल मोतियन माला
जय जय सरस्वती मातादेवी शरण जो आए, उनका उद्धार किया
मैय्या उनका उद्धार किया
बैठी मंथरा दासी, बैठी मंथरा दासी
रावण संहार किया
जय जय सरस्वती माताविद्यादान प्रदायनि, ज्ञान प्रकाश भरो
जन ज्ञान प्रकाश भरो
मोह अज्ञान की निरखा, मोह अज्ञान की निरखा
जग से नाश करो
जय जय सरस्वती माताधूप, दीप, फल, मेवा, माँ स्वीकार करो
ओ माँ स्वीकार करो
ज्ञानचक्षु दे माता, ज्ञानचक्षु दे माता
जग निस्तार करो
जय जय सरस्वती मातामाँ सरस्वती की आरती, जो कोई जन गावै
मैय्या जो कोई जन गावै
हितकारी सुखकारी हितकारी सुखकारी
ज्ञान भक्ति पावै
जय जय सरस्वती माताजय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता
सदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी
त्रिभुवन विख्याता
जय जय सरस्वती माताॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता
सदगुण वैभव शालिनी, सदगुण वैभव शालिनी
त्रिभुवन विख्याता, जय जय सरस्वती माता
मित्रांनो, वेद पुराणांमध्ये वर्णीत देवी सरस्वती यांची महिमा सांगायची म्हणजे त्यांना ज्ञान, कला, संगीत आणि विद्या इत्यादी ठिकाणी सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सांस्कृतिक, वैज्ञानिक कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते.
आपल्या महाराष्ट्र राज्यात विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्याची परंपरा आहे. आपण बालपणी शाळेत असतांना आपल्या पाटीवर लेखणीच्या साह्याने सरस्वती देवीची प्रतिमा काढून तिला झेंडूची फुले अर्पण करून पूजा करीत होतो.
आता ही पद्धत फारशी बघायला मिळत नाही. देवी सरस्वती मातेला अनुसरून लिखाण करण्यात आलेल्या आरतीमध्ये त्यांच्या विविध रूपांचे आणि नावांचा उल्लेख केला असून, त्यांच्या अखंड रूपाचे वर्णन करण्यात आलं आहे.
तिन्ही लोकांमध्ये विख्यात असलेली देवी सरस्वती अंगात पांढरेशुभ्र वस्त्र धारण करून एक मुखी स्मित हास्य करीत एका हाती पुस्तक आणि दुसऱ्या हाती माळ पकडून दुसऱ्या दोन्ही हाती वीणा धरून कमळाच्या फुलावर विराजमान झाली आहे. या चतुर्भुजा धारी देवी सरस्वती चे वाहन मोर असून त्यांचे निवास्थान हे ब्रह्मलोक आहे. अश्या स्वरुपात देवी सरस्वतीचे वर्णन आरतीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
याशिवाय, देवी सरस्वती यांनी आपली आराधना स्वीकार करावी याकरिता त्यांना विनंती करण्यात आली आहे. मित्रांनो, लोकांची अशी धारणा आहे की, देवी सरस्वती मातेची आराधना केल्याने आरतीचे पठन केल्याने देवीची कुपादृष्टी आपल्यावर होते.
आपणास देखील या गोष्टींचा लाभ व्हावा याकरिता आम्ही या सरस्वती आरतीचे लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखात लिखान करण्यात आलेल्या आरतीचे वाचन करून देवी सरस्वतीची उपासना करावी..धन्यवाद..