Gajanan Maharaj Mantra
मित्रांनो, विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामी वसलेले संत गजानन महाराज आपण सर्वांना परिचित आहेत. या आधीही आम्ही गजानन महाराज आरती आणि गजानन महाराज बावन्नी आमच्या लेखातून तुमच्या पर्यंत पोहचवली आहे.
सुमारे अठराशे शतकाच्या भीतरी या भूतलावर अवतरलेले संत गजानन महाराज हे साक्षात परमेश्वराचे अवतार होते अशी लोकांची धारणा आहे. त्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान गणेश यांचे अवतार मानलं जाते.
संत गजानन महाराज यांच्या बाबत विशेष सांगायचं म्हणजे, गजानन महाराज यांचा आवडता मंत्र होता तोच मंत्र आम्ही आजच्या या लेखात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया –
संत गजानन महाराज मंत्र – Gajanan Maharaj Mantra
“गण गण गणात बोते”
महाराज नेहमीचं एका हाताने चुटकी वाजवीत “गण गण गणात बोते” या मंत्राचा उच्चार करीत असत. या मंत्राचा जप करीत असतांना महाराज आपले भान विसरून मंत्र म्हणण्यात रममाण होवून जात असत.
यामुळे लोक त्यांना ‘गिणगिणे बुवा’, ‘गजानन महाराज’ म्हणून संबोधित असतं. वऱ्हाडात त्यांना संत गजानन बाबा म्हणून ओळखलं जाते.
“गण गण गणात बोते” या मंत्राचा अर्थ – Gan Gan Ganat Bote Meaning
संत गजानन महाराज या मंत्राचा अर्थ समजवून सांगतांना की, पहिला गण म्हणजे आत्मा, दुसरा गण म्हणजे परमेश्वर आणि गणात म्हणजे या देहरूपी शरीरात राहत असलेला परमेश्वर. गजानन महाराज आपल्या भक्तांना सांगतात की, मानवी देह आणि परमेश्वर हे एकरूप आहेत त्यांना निराळे समजू नका.
या मंत्रा प्रमाणे गजानन महाराज यांचे अनेक मंत्र प्रचलित आहेत, ज्यांचे लिखाण आज आपण या लेखाच्या माध्यमांतून करणार आहोत. तसचं, गजानन महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
संत गजाजन महाराज यांच्या जन्माबद्दल कुठलाच ठराविक पुरावा नसला तरी, संत दासगणू महाराज रचित गजानन महाराज चरित्र ग्रंथानुसार संत गजानन महाराज प्रथम माघ वद्द्य सप्तमी शुक्लपक्षाच्या तिथीवर म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ साली शेगाव ग्रामी प्रकट झाले होते.
संत दासगणू महाराज आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात की, गजानन महाराज प्रथम दृष्टीस पडले ते, देविदास पातुरकर यांच्या घरी मुलाच्या ऋतुशांती निमित्ताने पंगतीचे प्रयोजन करण्यात आले होते. पंगतीच्या उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकण्यात येत होत्या, त्यांचा एक ढीगच जमा झाला होता.
रस्त्याच्या बाजूला जमा झालेल्या पात्रवाळीतील उष्टे अन्न जमा करून समर्थसिद्धयोगी संत गजानन महाराज प्रसाद रुपी ग्रहण करीत होते. ते बंकटलाल अग्रवाल यांच्या नजरेस पडले त्यांनी महाराजांना अन्न ग्रहण करण्यासाठी आत येण्याची विनंती केली. परंतु, गजानन महाराजांनी बंकटलालाचे म्हणने न ऐकल्यासारखे केले आणि आपले काम सुरूच ठेवले.
गजानन महाराज जेंव्हा बंकटलाल अग्रवाल यांच्या दृष्टीस पडले तेंव्हा महाराजांच्या अंगात एक मळकी बंडी होती, पाणी पिण्यास एक फुटका भोपळा आणि ओढण्यास हातात एक कच्ची चिलीम जिने कुभाराच्या भट्टीस कधी पहिले नव्हते.
गजानन महाराजांचा तो अवतार पाहून त्यांना काय म्हणावं हे बंकटलालाना समजलं नाही. त्यांनी महाराजांना चांगले अन्न वाढून आणले महाराजांनी ‘अन्न हेची पूर्ण ब्रह्म’ याचे महत्व पटवून देण्यासाठी सर्व अन्न एकत्र करून ग्रहण केले आणि बाजूला गुऱ्हांसाठी पाणी पिण्यासाठी असलेल्या ओढ्यावर जावून पाणी पिले आणि तृप्ततेची ढेकर दिली.
बंकटलाल आणि देविदास पातुरकर त्यांच्या जवळ जाताच महाराज वायूच्या वेगाने लुप्त झाले. या प्रकारची गजाजन महाराज यांच्या प्रकट होण्याबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महाराजांनी शेगाव नगरीत राहून अनेक चमत्कार आपल्या भक्तांना दाखविले. आपल्या भक्तांची दु:ख नष्ट करून त्यांना परमेश्वर प्राप्ती मार्गावर चालण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला.
संत गजानन महाराजांनी या भूतलावर ३२ वर्षे वास्तव्य करून आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण केला तसचं, लोकांचा मनात एकमेकाप्रती असलेले भेदभाव नाहीसे केले. तसेच, अनेक भक्तांना त्यांनी विविध रुपात दर्शन देखील दिले. गजानन महाराजांची महिमा सांगावी तितकी कमीच. मित्रांनो, या महान योगी संताने समाधी घेण्यापूर्वी लोकांना आधीच समाधी घेण्याची तिथी सांगितली होती, तो पुण्यदिवस होता ऋषीपंचमीचा. समाधी घेण्यापूर्वी महाराज आपल्या भक्तांना सांगतात की,
“आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||”
सन ८ सप्टेंबर १९१० साली ऋषीपंचमीच्या दिवशी संत गजानन महाराजांनी शेगाव या ठिकाणी समाधी घेतली. या ठिकाणी महाराजांचे भव्य मंदिर बांधण्यात आलं असून दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात.
समाधी घेतल्यानंतर देखील महाराजांनी अनेक भक्तांना दर्शन दिल. आज देखील लोकांची अशी धारणा आहे की, महाराज या ठिकाणी वास्तव्य करतात. या ठिकाणी राहून ते आपल्या भक्तांच्या दु:खांचे निवारण करतात. भाविक महाराजांना वंदना करण्यासाठी
|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
मंत्राचा जप करतात. मित्रांनो या लेखात लेखात अश्या प्रकारच्या महत्वपूर्ण संत गजानन महाराज मंत्राचा उल्लेख करण्यात आला आहे, तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे व हा लेख इतरांना देखील पाठवा. धन्यवाद..