Gayatri Mantra
मित्रांनो, भारतीय हिंदू धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार असलेल्या वेद ग्रंथामध्ये वर्णीत गायत्री मंत्र सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी उच्चारला जातो. शास्त्रांमध्ये गायत्री मंत्राला सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ म्हटल गेल आहे. तसचं, या मंत्राला ‘वेदमाता’ म्हणून देखील संबोधले आहे.
गायत्री मंत्र हे सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी उच्चारले जात असल्याने, गायत्री मंत्राचे उच्चारण नेहमी पहाटेच्या समयी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर करावे. यानंतर दुपारी मध्यानाच्या वेळी आणि सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी या मंत्राचे उच्चारण करणे कधी पण उच्चीत असते.
गायत्री मंत्राचे उच्चारण केल्याने वेदोच्चारण केल्याचे उच्चीत फळ मिळते. गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे अप्रगट अवस्थेत असलेल्या अनेक देवीदेवतांची शक्ती आणि चैतन्य प्रगट होऊन सक्रीय होते. त्यामुळे उपासकाला देवतांची कृपा लवकर प्राप्त होते.
मित्रांनो, आपण देखील या सर्वश्रेष्ठ मंत्राचा उच्चार करावा याकरिता आम्ही देखील या लेखात गायत्री मंत्राचे लिखाण केलं आहे. जेणेकरून आपणास गायत्री मंत्र म्हणण्यास मदत होईल.
गायत्री मंत्र – Gayatri Mantra Marathi
ॐ ॐ ॐ
ॐ भूर् भुवः स्वः
तत् सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
गायत्री मंत्र – Gayatri Mantra Meaning in Marathi
अर्थात आपल्या तेजाच्या सतेज प्रकाशाने पृथ्वीवरील प्राणिमात्रांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या सर्वश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. तसचं, या गायत्री मंत्राचे ऋषी विश्वामित्र असून, देवता ही सवितृ आहे.
चौदा अक्षरी मंत्र असणाऱ्या या गायत्री मंत्राचा संबंध मनुष्य शरीरात २४ ठिकाणी वास करणाऱ्या २४ प्रकारच्या देवतांशी आहे. म्हणून या मंत्राला सिद्ध मंत्र मानलं जाते.
तसचं, अनेक ऋषीमुनींनी गायत्री मंत्राला भौतिक जगातील सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारा मंत्र म्हटलं आहे. गायत्री मंत्र हा सर्वांसाठीच लाभकारी असल्याने आपण सर्वांनी त्याचे नियमित उच्चारण करायला पाहिजे.
जेणेकरून या मंत्राचा लाभ आपणास आपल्या भावी जीवनांत होईल. त्याचप्रमाणे, गायत्री मंत्राच्या उच्चाराचे अनेक फायदे लोकांनी प्रकट केले आहेत.
गायत्री मंत्राचा उच्चार सुमारे एकशे आठ वेळा केला जात असल्याने आपल्या शरीरात एकाप्रकारची उर्जा संचारली जाते. मंत्राच्या उच्चाराने शरीरात निर्माण झालेल्या उर्जेच्या गर्मीमुळे आपल्याला शरीरातून उष्ण वाफा बाहेर पडत असल्याचे जाणवते.
मित्रांनो, गायत्री मंत्र उच्चारण करण्याचे काही महत्वपूर्ण नियम देखील आहेत त्यामुळे या मंत्राचा जप त्याच वेळा केला पाहिजे. नाहीतर आपणास हे मंत्र उच्चारण्याचा लाभ होणार नाही. या गायत्री मंत्राच्या उच्चाराने कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, भूत, प्रेत आणि यावरील बाधा होत नाही.
तसचं, हा गायत्री मंत्र साधू संतानी सिद्ध केलेला मंत्र असून चारी वेदांमध्ये या मंत्राचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. सूर्य देवाची उपासना करण्यासाठी या गायत्री मंत्राची रचना करण्यात आली असल्याने या मंत्राचा उच्चार सुर्यास्त झाल्यानंतर कधीच करू नये. नाहीतर मंत्राचा उलट परिणाम होवून आपणास संकटाचा सामना करावा लागेल.
मित्रांनो, आपण देखील या लेखात लिहिलेल्या गायत्री मंत्राचे उच्चारण करावे जेणेकरून आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील. आश्या आहे तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..