Marathi Story on Life
आयुष्यात अनेक वाईट प्रसंग नेहमी समोर येतात, आणि आपल्याला त्यांचा सामना सुध्दा करावा लागतो, पण या प्रसंगांवर मात करून आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी लढत रहावे लागते. यात काही शंकाच नाही, पण जीवनात येणाऱ्या संकटांना काय कवटाळून बसायचं का? त्यांचा नेहमी नेहमी विचार करून स्वतःला वेदना द्यायच्या काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या या छोट्याशा स्टोरी मधून समजून येतील, आजच्या या लेखात आपण जीवनात कश्या प्रकारे आणखी चांगल्या गोष्टी ओढवून आणू शकतो आणि स्वतः असलेल्या तणावामधून बाहेर पडू शकतो, हे या कथेद्वारे पाहणार आहोत. तर चला पाहूया एक आशा निर्माण करणारी छोटीशी बोधकथा.
जीवनातील दुःख बाजूला सारून नवीन रित्या जीवन जगण्याची उमेद जागवणारी कथा – Marathi Story on Life
एकदा एका वर्गात गुरुजी तास घेत असतात, वर्गात बरेच विध्यार्थी उपस्थित असतात, आज गुरुजींचा तास कशाप्रकारे होणार या विचारामुळे सर्व विध्यार्थी उत्सुक असतात, आज गुरुजींनी आपल्या सोबत एक पाण्याने भरलेला ग्लास आणला होता, त्यामुळे सर्व विध्यार्थी आज नव्या उत्साहाने गुरुजींकडे पाहत होते. गुरुजींनी सर्व वर्गाला शांत करत पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. आणि विध्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, या पाण्याने भरलेल्या ग्लासाचे वजन किती असेल?
गुरूजींचा हा प्रश्न ऐकताच वर्गातील मुलांनी उत्तरे दिली काहींनी सांगितले, ७० ग्रॅम, ८० ग्रॅम, तर काहींनी १०० ग्रॅम अश्या प्रकारे सर्व वर्गातून वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिल्या गेली. तेव्हा गुरुजींनी सांगितले या ग्लासचे वजन आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा या ग्लासला एखाद्या मापाने मोजल्या जाईल. पण आपण या ग्लासचे वजन जवळजवळ १०० ग्रॅम आहे असे मानू. आता मला सांगा हा ग्लास मी माझ्या हाती काही मिनिटे पकडला तर माझ्या हाताची काही तक्रार येईल का? असे गुरुजींनी शब्द उच्चारले. त्यावर काही विध्यार्थी उत्तर देत म्हणाले, नाही हाताची काहीच तक्रार येणार नाही.
पुढे गुरुजी म्हणाले याच प्रकारे जर मी या ग्लासला तासभर हातात पकडून ठेवले तर काय होईल? त्यावर काही विध्यार्थी म्हणाले काही नाही होणार, तर काही विध्यार्थी म्हणाले तुमचा हात दुखायला सुरू होणार. काही विध्यार्थी बरोबर सुध्दा होते, यानंतर गुरुजींनी आणखी एकदा मुलांना प्रश्न विचारला,
जर या ग्लासला मी दिवसभर माझ्या हाती पकडून ठेवले तर काय होईल? त्यावर एका विधार्थ्याने उत्तर दिले की जर आपण या ग्लासला दिवसभर आपल्या हाती पकडून ठेवले तर आपला हाथ सुन्न पडू शकतो, आणि आपल्या हातामध्ये असलेल्या रक्त वाहिन्या बंद पडू शकतात, त्यामुळे आपल्याला चक्कर येऊन आपण खाली पडू शकता, हे उत्तर गुरुजींना योग्य वाटलं, आणि त्यांनी यावर आणखी एक प्रश्न विचारला तो असा की या सर्व गोष्टींमध्ये ग्लासचे वजन बदलले का? त्यावर सर्व विध्यार्थी सुन्न झाले.
आता गुरुजींनी आणखी एक प्रश्न विचारला की मला माझा हात दुखणे थांबवायचे असेल तर काय करायला हवे? त्यावर एका विद्यार्थ्याने लगेच उत्तर दिले की, हातातील ग्लास परत टेबलवर ठेवून द्यावा लागेल. या उत्तराला ऐकून गुरुजींनी त्या मुलाची प्रशंसा करत वर्गाला समजावले की याचप्रमाणे जीवनात सुध्दा दुःख, ताण, तणाव, किती आहे यापेक्षा आपण किती अधिक वेळ त्याला पकडून ठेवतो ह्यावर बरेचशे दुःख अवलंबून असतं, म्हणून जीवनात दुःख, निराशा, ताण, तणाव, या सर्व गोष्टी जेवढ्या जास्त वेळ कवटाळून धरणार तेवढं जास्त दुःख होईल, आणि तेच त्याविरुद्ध आपण या दुःखाला ग्लास प्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मेंदूतून काढून बाहेर टाकले तर आपल्याला त्रास सुध्दा होणार नाही, म्हणून जीवनातील अनावश्यक गोष्टींना आणि दुःखाला आपल्या मेंदूतून काढून टाका जेणेकरून आपले मानसिक आरोग्य बरे राहील. आणि आपण दररोज एका नव्या स्फूर्तीने आपले जीवन जगू शकणार.
तर आजच्या या छोट्याश्या स्टोरीमधून आपल्याला एक छोटासा जीवनाला योग्य रित्या जगण्याचा मार्ग मिळाला असेल, आशा करतो आपल्याला ही लिहिलेली छोटीशी स्टोरी आवडली असणार आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!