Mantra Pushpanjali
हिंदू पवित्र धर्म ग्रंथांमध्ये देवी देवतांची आराधना करण्यासाठी अनेक प्रकारच्या मंत्राचा उच्चार करण्यात आला आहे. आपले धार्मिक ग्रंथ फार प्राचीन कालीन असल्याने त्यात संस्कृत भाषेचा वापर करण्यात आला आहे. परिणामी सर्व मंत्र हे संस्कृत भाषेत म्हटले जातात. असे असले तरी, संस्कृत भाषा लोकांना फारशी अवगत नसल्याने त्या मंत्रांचा उच्चार करण्यास थोडं अवघड जाते.
आज आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत ते देवी देवतांची आरती केल्यानंतर म्हटल्या जाणाऱ्या पुष्पांजली मंत्राबद्दल. तसचं, त्या मंत्राबद्दल थोडक्यात माहिती देखील जाणून घेणार आहोत.
पुष्पांजली हा मंत्र देवी देवतांची आरती केल्यानंतर त्यांची स्तुती करण्यासाठी आणि त्यांची वंदना करण्यासाठी या मंत्राचा जप करण्यात येतो.
मंत्र पुष्पांजली – Mantra Pushpanjali in Marathi
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
एकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहि
तन्नोदंती प्रचोदयात्
हा पुष्पांजली मंत्र म्हणतांना, टाळ्या वाजवल्या जात नाहीत, तर देवाला हात जोडून हातात फुल अक्षता धरून देवाची वंदना केली जाते आणि मंत्राचे उच्चारण पूर्ण झाल्यानंतर हातातील फुलं अक्षता देवतेला अर्पण केलं जाते.
गणपती आणि नवरात्री उत्सवाच्या वेळेला हा पुष्पांजली मंत्र जास्त करून आपल्याला ऐकायला मिळतो. या पुष्पांजली मंत्रांत एकूण चार कडवी असून या मंत्राचा उच्चार वेदांमध्ये करण्यात आला आहे. तरी आपण या लेखाचे वाचन करून लेखात नमूद करण्यात आलेल्या पुष्पांजली मंत्राचा अर्थ समजून घ्या. आश्या आहे आपणास आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..