Hartalika Vrat Katha
भाद्रपद महिन्यात अनेक सण साजरे होतात खरंतर श्रावण सुरू होतो आणि सगळे सण हळुहळु आपल्या भेटीला यायला लागतात…विशेषतः हे सण स्त्रियांशीच जास्त संबंधीत असतात.
भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनापुर्वी एक दिवस अगोदर शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिका पुजन करण्यात येतं.
हरतालिका पुजन म्हणजे देवी पार्वतीने भगवान शिवाला आपला वर म्हणुन मिळविण्याकरीता केलेलं व्रत !
अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणुन सवाष्ण स्त्रिया आणि चांगला वर मिळावा याकरीता कुमारीका देखील हरतालिकेचे व्रत करतात.
या पुजेत भगवान शंकराची भक्तिभावाने पुजा केली जात असल्याने या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात.
हे व्रत केल्याने अनेक संकटे, गृहकलह, अनेक दोषांपासुन मुक्ती मिळते म्हणुन याचे महत्व सांगीतले आहे.
या दिवशी स्त्रियांना कडक उपवास करावयाला सांगीतले आहे.
‘हरतालिका’ व ‘हरितालीका’ असे दोनही शब्दप्रयोग रूढ आहेत.
हरिता या शब्दाचा अर्थ ‘जीला नेले ती’ असा सांगीतला आहे. देवाधीदेव महादेवांना प्राप्त करण्याकरीता सख्या पार्वतीला तप करण्याकरता घेवुन गेल्या म्हणुन ‘हरितालिका’ असे या व्रताला म्हंटल्या गेले आहे.
हरतालिका व्रताविषयी माहिती – Hartalika Vrat Katha in Marathi
हरतालिका या व्रताशी संबंधीत कथा – About Hartalika Story
पर्वतराजाची मुलगी पार्वती ज्यावेळी लग्ना योग्य झाली त्यावेळी तिच्याकरता वर पाहाणे सुरू झाले. नारदमुनींनी पर्वतराजाला पार्वतीकरीता भगवान विष्णुंचे स्थळ सुचवले.
पण या गोष्टीची पार्वतीला काहीच माहिती नव्हती तीने आपल्या मनात फार पुर्वीच भगवान शंकरांना आपला वर मानले होते.
ज्यावेळेस पार्वतीला आपले वडिल आपला विवाह भगवान विष्णुंशी निश्चित करतायेत असे समजते त्यावेळेस तिला फार वाईट वाटते आणि आपल्या मैत्रींणींच्या हातुन ती आपल्या वडिलांना निरोप पाठवते की “जर बळजबरीने तुम्ही माझा विवाह भगवान विष्णुंशी लावुन दिलात तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करेल ’’
निरोप पाठवल्यानंतर देवी पार्वती वनात निघुन गेली आणि भगवान शिव प्रसन्न व्हावेत व आपला पत्नी म्हणुन स्विकार करावा याकरीता व्रत आरंभिले.
तीने अत्यंत मनोभावे भगवान शिवाची पुजा केली आणि कडक उपवास देखील केला.
तीची भक्ती आणि श्रध्दा पाहुन महादेव प्रसन्न झाले आणि तीची विनंती मान्य करून पार्वतीचा आपली पत्नी म्हणुन स्विकार केला.
त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील तृतिया होती त्यामुळे आजही प्रत्येक सवाष्ण स्त्री हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने केलेले व्रत मोठया निष्ठेने आचरतात, यथासांग पुजन करतात, उपवास करतात.
हरतालिका पुजेचा विधी – Hartalika Puja Vidhi
हरतालिकेच्या दिवशी एका चौरंगावर भगवान शंकराची वाळुची पिंड तयार करण्यात येते.
अनेक ठिकाणी स्टिल किंवा वेगळया धातुच्या पेल्यावर काजळ धरून त्यांची शिवपिंड देखील तयार करतात.
यथासांग पुजा करून सगळया गोष्टी १६ या प्रमाणात शिवाला वाहिल्या जातात. या दिवसांमधे पाऊस भरपुर पडत असल्याने सगळीकडेच हिरवळ असते आणि अनेक वनस्पती उगवलेल्या असतात. दुर्वा, आघाडा, केना अश्या वनस्पती शिवपिंडीला वाहतात.
१०८ बेल शिवाची नामावली घेत वाहाण्याची प्रथा आहे. देवी पार्वतीला सौभाग्यलेणं वाहिलं जातं. पंचोपचार पुजा झाल्यानंतर नैवेद्य आरती आणि कहाणी वाचतात.
तिन्ही सांजेला जवळपासच्या सवाष्णींना बोलावुन हळदीकुंकवाचा कार्यक्रम होतो.
दुसऱ्या दिवशी दहिभाताचा नैवेद्य दाखवुन विसर्जन करण्यात येतं व वाळुने बनविलेली शिवपिंड वाहत्या पाण्यात विसर्जीत केली जाते.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी श्रावणातल्या शुध्द तृतीयेच्या दिवशी सुवर्णगौरी… श्रावण मासातच कृष्ण तृतिया दिनाला कज्जली गौरी व भाद्रपद मासात शुध्द तुतियेच्या दिवशी हरितालिका व्रत करावे.
म्हणजे सवाष्ण स्त्रिला तीन वेळेस गौरी पुजण्यास शास्त्राने सुचविले आहे.
भगवान शिवपार्वती हे त्रिलोकाचे माता पिता म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या मिलनातुन विश्वाची निर्मीती झाली आहे असे आपण मानतो म्हणुन स्त्रीतत्व व पुरूषतत्वाचे पुजन प्रतिकात्मक रूपान व्हावे म्हणुन या दिवशी शिवपार्वतीची पुजा करण्यात येते.
तर हरतालिका साजरी करण्या मागचे हे कारण होते, आशा करतो तुम्हाला या लेखामुळे आपल्या ज्ञानात भर पडली असेल, आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
Thank You!