30 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य इत्यादी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ३० जुलै रोजी येणारे दिनविशेष – 30 July Today Historical Events in Marathi
३० जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 July Historical Event
- इ.स. पूर्व ७६२ साली खलिफा अल मन्सूर यांनी बगदाद शहराची स्थापना केली.
- इ.स. १८३६ साली अमेरिकेतील हवाई या शहरात पहिला इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशित झाले.
- सन १९०९ साली अमेरिकन वैमानिक व शास्त्रज्ञ राईट बंधू(Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.
- सन १९३० साली आयोजित पहिला फुटबॉल विश्वकप उरुग्वेच्या फुटबॉल संघाने अर्जेटिना संघाचा ४-२ अश्या फरकाने पराभव करून जिंकला.
- सन १९६२ साली ट्रान्स कॅनडा हा सुमारे ८०३० किमी लांबीचा जगतील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरु करण्यात आला.
- सन १९६६ साली इंग्लंड च्या फुटबॉल संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकला.
- सन १९९७ साली भारतीय गानकोकिळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
- सन २००० साली भारतीय अभिनेते डॉ. राजकुमार यांचे चंदन तस्कर वीरप्पन यांनी अपहरण केलं होत.
- सन २००० साली कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाती निधन पावल्यास त्या वाहनाच्या वाहनचालकास जबाबदार धरता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
३० जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८६३ साली अमेरिकन फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक व उद्योगपती हेनरी फोर्ड यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्मदिन.
- सन १९२३ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार, संस्कृतज्ञ व सौंदर्यशास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा जन्मदिन.
- सन १९२८ साली पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.
- सन १९४५ साली सेवानिवृत्त भारतीय नागरी सेवक व भारताचे माजी १६ वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा जन्मदिन.
- सन १९४७ साली ऑस्ट्रिया-अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, उद्योगपती, लेखक आणि माजी राजकारणी आणि व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू अर्नोल्ड श्वार्ज़नेगर(Arnold Schwarzenegger) यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक व संगीतकार सोनू निगम यांचा जन्मदिन.
३० जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 July Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १७७१ साली अठराव्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी, पत्र-लेखक व शास्त्रीय अभ्यासक थॉमस ग्रे (Thomas Gray) यांचे निधन.
- सन १९६० साली कर्नाटकसिंह म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व महात्मा गांधी यांचे सहकारी गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन.
- सन १९८३ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व नाट्य संगीताचे गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन.
- सन १९९४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार व साहित्यिक तसचं, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ‘बालभारती’चे संपादक शंकर पाटील यांचे निधन.
- सन १९९५ साली भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, ‘इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेचे संस्थापक व ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक डॉ. विनायक महादेव उर्फ वी. व. दांडेकर यांचे निधन.
- सन २०११ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय संगीतकार, गायक व मानववंशशास्त्रज्ञ अशोक दामोदर रानडे यांचे निधन.