29 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन,निधन आणि त्यांचे कार्य आदी बाबी सबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २९ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 29 July Today Historical Events in Marathi
२९ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 July Historical Event
- इ.स. १७४८ साली इस्ट इंडिया कंपनीच्या साह्यतेकारिता ब्रिटीश सैन्यांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली.
- सन १९२० साली जगातील पहिली हवाई वाहतूक टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या दोन शहरांदरम्यान सुरु करण्यात आली.
- सन १९४८ साली दुसऱ्या महायुद्धामुळे बंद असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुमारे १२ वर्षानंतर लंडन या देशांत सुरुवात झाली.
- सन १९५७ साली ऑस्ट्रेलिया देशांतील वियना या प्रांतात आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सी (IAEA) ची स्थापना करण्यात आली.
- सन १९८५ साली भारतीय मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- सन १९८७ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांती करार हस्ताक्षरीत केला.
२९ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८८३ साली इटालियन राष्ट्रीय फासिस्ट पक्षाचे नेता व माजी पंतप्रधान बेनिटो एमिलकेअर अँड्रिया मुसोलिनी (Benito Amilcare Andrea Mussolini) यांचा जन्मदिन.
- सन १९०४ साली भारतातील सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेता व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती व वैमानिक,तसचं, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन.
- सन १९२२ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, नाटककार व इतिहास लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिन.
- सन १९२५ साली प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार व चित्रकार एस. डी. फडणीस यांचा जन्मदिन.
- सन १९५३ साली “भजन सम्राट” म्हणून लोकप्रिय असलेले प्रसिद्ध भारतीय भावगीत व भजन गायक आणि संगीतकार अनुप जलोटा यांचा जन्मदिन.
- सन १९५९ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक व चित्रपट निर्माता संजय दत्त यांचा जन्मदिन.
- सन १९८१ साली फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता स्पॅनिश महान फॉर्म्युला वन ड्रायव्हर फर्नांडो अलोंसो डेझ(Fernando Alonso Díaz) यांचा जन्मदिन.
२९ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 July Death / Punyatithi / Smrutidin
- इस.पुर्व २३८ साली रोमन सम्राट बाल्बिनस (Balbinus) यांचे निधन.
- इ.स. ११०८ साली फ्रांस देशाचे राजा फिलीप (Philip France) पहिला यांचे निधन.
- इ.स. १८९१ साली भारतीय बंगाली समाजसुधारक, तत्वज्ञानी, शैक्षणिक शिक्षक, लेखक, अनुवादक, मुद्रक, प्रकाशक, उद्योजक, सुधारक तसचं भारतातील विधवा विवाहाला प्रोत्साहन देणारे समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.
- सन १९९६ साली भारत रत्न, जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पद्म विभूषण, लेनिन शांती पुरस्कार सन्मानित महान भारतीय शिक्षणतज्ञ व स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. सन ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या भारता छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.
- सन २००२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन.
- सन २००३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट हास्य कलाकार व अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर यांचे निधन.
- सन २००६ साली मराठ संत साहित्याचे विद्वान व गाढे अभ्यासक डॉ. निर्मल कुमार फडकुले यांचे निधन.
- सन २००९ साली जयपूर चे महाराज सवाई मानसिंग यांच्या पत्नी व जयपूर राज्याच्या तिसऱ्या महाराणी महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन.