26 July Dinvishes
मित्रांनो, आज आपल्या देशाच्या इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या घटनेचा दिवस म्हणजे कारगिल युद्ध. आजच्या दिवशी आपल्या देशांत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित असलेला हा दिवस. या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते. दरवर्षी २६ जुलै हा दिवस करगील विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
याव्यतिरिक्त आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजची दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटन, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि महत्वपूर्ण कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २६ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 26 July Today Historical Events in Marathi
२६ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 July Historical Event
- इ.स. १५०९ साली महाराज कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याचे पुनरुत्पादन करण्यास सुरुवात केली.
- इ.स. १७४५ साली इंग्लंडमधील गिल्डफोर्ड या ठिकाणी महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना झाला.
- इ.स. १८७६ साली ब्रिटीश कालीन भारतातील कलकत्ता शहरात इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती.
- सन १९९९ साली भारताने कारगिल युद्ध जिंकले.
- सन २००५ साली मुंबई येथे झालेल्या असामन्य पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय, हजाराहून अधिक लोक मरण पावले.
- सन २००५ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अंतरीक्ष यान डिस्कव्हरी चे प्रक्षेपण केले.
२६ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८४४ साली भारतीय कलकत्ता येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व कलकत्ता विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू गुरूदासदास बॅनर्जी यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५६ साली नोबल पारितोषिक विजेता आयरिश नाटककार, समालोचक, सर्वज्ञवादी व राजकीय कार्यकर्ते तसचं स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७५ साली स्विस मानसोपचार तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग (Carl Gustav Jung) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९३ साली भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेरच्या घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९४ साली “शिशुगीते” हा संगीताचा प्रकार मराठी भषेत रूळविणारे महान महाराष्ट्रीयन मराठी बालगीत कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९४ साली ब्रिटीश लेखक व तत्त्वज्ञ तसचं, काल्पनिक कथा व कादंबरीकार अॅल्डॉस लिओनार्ड हक्सले (Aldous Leonard Huxley) यांचा जन्मदिन.
- सन १९१४ साली प्रसिद्ध भारतीय कवयित्री विद्यावती कोकीळ यांचा जन्मदिन.
- सन १९५५ साली पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तान पीपल्स पक्षाचे संसद अध्यक्ष व सह-अध्यक्ष तसचं, पाकिस्तानचे ११ वे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा जन्मदिन.
- सन १९७१ साली बांगलादेशी माजी क्रिकेटपटू व एकदिवसीय कर्णधार खालेद महमूद यांचा जन्मदिन.
- सन १९८६ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री मुग्धा गोडसे यांचा जन्मदिन.
२६ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 July Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८९१ साली भारतीय वंशाचे पहिले आधुनिक प्राच्यविद्या संशोधक आणि बंगालमधील पहिले वैज्ञानिक इतिहासकार तसचं, बंगाल मधील एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मित्र यांचे निधन.
- सन १९६७ साली भारतातील प्रसिद्ध इतिहास, संस्कृत, कला आणि साहित्यांचे अभ्यासक व दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे सह-संस्थापक वासुदेव शरण अग्रवाल यांचे निधन.
- सन २००९ साली प्रसिद्ध भारतीय सितार वादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्य संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन.
- सन २००५ साली माजी कॅनडीयन हॉकीपटू जीन गिलेस मारॉटे (Gilles Marotte) यांचे निधन.
- सन २०१० साली भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन.