Famous Shiv Mandir in India
भारतात कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत भगवान महादेवाचे कित्येक मंदिरे आहेत. आणि या मंदिरांमध्ये भाविक गण लाखोंच्या गर्दीने येतात.आणि दर्शन घेऊन जातात. काही दर्शनाला येणारे भक्तगण हे तर हजारो किलोमीटर चा प्रवास करून दर्शनासाठी येतात, पण भारतात अजूनही काही मंदिर आपल्याला पाहायला मिळतात की त्या मंदिरांमध्ये आजही काही चमत्कार घडतात आणि तेथील लोक त्या चमत्काराची ग्वाही सुध्दा देतात.
आणि आपल्या भारतात अजूनही असे काही मंदिरे आहेत जे काही मुख्य सण, किंवा उत्सव या वेळीच उघडल्या जातात तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की भारतातील असेही एक महादेवाचे मंदिर ज्याचे दरवाजे भक्तांसाठी फक्त महाशिवरात्री ला उघडले जातात. म्हणजे तेथील भक्तगणांना दर्शन करण्यासाठी संपूर्ण वर्ष वाट पहावी लागते. आशा करतो आपल्याला हा लेख आवडणार. तर चला पाहूया..
ऐतिहासिक एकलिंगेश्वर महादेव मंदिर – Eklingeshwar Mahadev Temple Jaipur
ह्या लेखात आपण बोलत आहोत जयपूर मध्ये स्थित असलेल्या एकलिंगेश्वर महादेव मंदिराची. हेच ते भारतातील एक मंदिर आहे जे वर्षातून फक्त एक दिवस भक्तांसाठी उघडल्या जाते, तेही फक्त महाशिवरात्री च्या दिवसाला. या मंदिराला महादेवाची गढी म्हणून सुध्दा ओळखल्या जाते. हे मंदिर जयपूर च्या मोतीडोंगरी च्या शंकरगढ च्या पाहाडांमध्ये वसलेलं आहे. या भागात एकलिंग आणि चांदणी चौकातील राज-राजेश्वराचे मंदिर वर्षातून फक्त एकदा उघडते. म्हणजेच वर्षातून एकदाच भाविकांना महादेवाचे दर्शन होते.
ह्या मंदिर च्या पुजारींनी सांगितले आहे की हे मंदिर खूप जुन्या काळचे आहे, एवढे जुने की तेव्हा जयपूर शहर सुध्दा बनले नव्हते. म्हणजेच जयपूर शहराची स्थापना सुध्दा झालेली नव्हती. या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी फक्त वर्षातून एकदा उघडले जातात. त्या पुजारींनी सांगताना बोलले की हे मंदिर जयपूर च्या राजघराण्याचे वैयक्तिक मंदिर होते, या मंदिरात जयपूर चे महाराजा आणि राणी पूजा करायला यायचे. या मंदिरात जयपूर च्या महाराणी तसेच राजमाता गायत्री देवी ह्या स्वतः पूजा करायाला यायच्या. या मंदिरातील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना महाशिवरात्री ची वाट पाहावी लागते. तेव्हा जाऊन कुठे त्यांना महादेवाचे दर्शन होते.
असेही म्हटले जाते की सुरुवातीला या मंदिरात भगवान शंकराच्या सोबत माता पार्वती आणि बाल गणेश यांच्या मूर्ती ठेवल्या जाऊ लागल्या होत्या पण काही दिवसातच या मुर्त्या तेथून अचानक गायब व्हायला लागल्या परंतु तेथील लोकांनी परत काही दिवसानंतर मंदिरात मुर्त्या ठेवल्या पण परत आश्चर्य घडलं आणि तेथून त्या मुर्त्या गायब झाला या घटनेनंतर तेथे कोणीही मुर्त्या ठेवण्याची हिम्मत केली नाही.
श्रावण महिन्यात या मंदिरात पूजा पाठ होत असतो आणि या सर्व गोष्टींचा खर्च तेथील राजपरिवार उचलत असतो. आणि हाच राजपरिवार या मंदिरात श्रावण महिन्यात मोठा उत्सव साजरा करतो. आणि येथे पूजा पाठ सुध्दा हाच राज परिवार करतो असे सांगण्यात येते, वर्षातून एक वेळा उघडल्या जाणाऱ्या ह्या मंदिराचे सर्व लोकांमध्ये एक विशेष नवल पाहायला मिळते. कारण हे मंदिर वर्षातून फक्त एकदा उघडल्या जाते. ह्या मंदिरावर जाण्यासाठी कमीत कमी एक किलोमीटर चे अंतर पार करून बरेच तास रांगेत उभे राहिल्यानंतर येथील महादेवाचे दर्शन घडते.
आजच्या लेखात आपण पाहिले की भारतात एक असेही मंदिर आहे ज्या मंदिरात एका वर्षांनंतरच मंदिराचे दरवाजे उघडल्या जातात. आणि एका वर्षानंतर भाविकांना महादेवाचे दर्शन होते. तर आशा करतो लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!