Famous Dictators of the World
जगाच्या पाठीवर १९० पेक्षा जास्त देश आहेत, आणि यापैकी काही देशांत तानाशाही चालते तर काही देशांमध्ये लोकशाही चालते. तानाशाही आणि लोकशाही या दोन्ही मधला फरक तर प्रत्येकाला माहिती असेल की लोकशाही आणि हुकूमशाही यामध्ये नेमका फरक काय असतो, सर्वात आधी हुकूमशाही समजून घेऊया, हुकूमशाही असणाऱ्या देशात पिढ्यान पिढ्या एक परिवार त्या देशाला सांभाळत येत असतो, म्हणजेच संपूर्ण देश फक्त एका व्यक्तीच्या निर्णयावर चालत असतो, ज्याप्रमाणे जुन्या काळात राजा आणि प्रजा होते त्याचप्रमाणे हुकूमशाही मध्ये असते, फरक फक्त एवढाच की ही राजा आणि प्रजा आधुनिक काळातील असते.
राजाने दिलेला निर्णय सर्वांना मानावा लागतो, सोबतच त्याचे पालन न केल्यास शिक्षा सुध्दा भोगावी लागते. आता लोकशाही थोडक्यात, आपणा सर्वांना माहितीच आहे, एवढंच नाही तर चौथीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण वाचून बसलो आहे की लोकशाही कशाला म्हणतात? ज्यामध्ये लोकांनी लोकांच्या हितासाठी बनवलेल्या पध्दतीला लोकशाही म्हटल्या जातं.
लोकशाही मध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले असतात. ज्याच्या आधारावर प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडू शकतो. पण आजच्या लेखात आपण काही हुकुमशाहां विषयी माहिती पाहणार आहोत जे त्यांच्या राज्याला कश्या प्रकारे स्वतःची वैयक्तिक संपत्ती समजायचे. तर चला अश्याच काही ५ हुकूमशहां बद्द्ल आज पाहूया.
जगातील ५ हुकूमशहा ज्यांच्या वेगळ्या वागणुकीमुळे झाले जगात प्रसिध्द – Famous Dictators of the World in Marathi
किम जोंग इल – Kim Jong-il
किम जोंग इल उत्तर कोरिया चे माजी हुकूमशहा म्हणून ओळखले जातात. उत्तर कोरिया मध्ये शतकांपूर्वी सुध्दा हुकूमशाही होती आणि आजही हुकूमशाही आहे. पण आपल्या माहिती साठी किम जोंग इल जेव्हा उत्तर कोरिया चे हुकूमशहा होते तेव्हा उत्तर कोरिया मध्ये माणसांचे मास सुध्दा विकल्या जात असे, यावर आपण विचार करू शकता की किती क्रूर हुकूमशहा असणार किम जोंग इल.
एवढंच नाही तर उत्तर कोरिया च्या लोकांनी केलेल्या चुकीची शिक्षा खूप त्रासदायक असायची एकदा तर या हुकूमशहाने दक्षिण कोरिया च्या एका चित्रपट निर्मात्याला आणि त्याच्या पत्नीला कैद केले होते आणि ४–५ वर्षांनंतर त्याला या अटीवर बाहेर काढले होते की तो उत्तर कोरिया च्या चित्रपट जगात आपले योगदान देणार. कारण तेव्हा हुकूमशहा किम जोंग इल चित्रपटाचा खूप शौकीन होता.
ईदी अमीन – Idi Amin
इदी आमीन हा युगांडा नावाच्या देशाचा हुकूमशाह राहिलेला आहे, हा हुकूमशहा स्वतःला जास्त महत्व देत असे म्हणजे त्याला फक्त आणि फक्त स्वतः मध्ये रस होता, जसे त्याला वाटत असे की संपूर्ण देशांच्या सुरक्षितेसाठी अध्यक्ष म्हणून त्याची निवड व्हावी. पण तेव्हाच्या काळात या पदावर दुसरी महाराणी एलिझाबेथ होती.
एवढंच नाही तर त्याला त्याच्या कपड्यांवर मेडल्स लावायला खूप आवडत असे. त्याला स्वतःचा गौरव करण्यात आनंद मिळत असे, यामुळे त्याने स्वतःलाच खूप साऱ्या मेडल्स नि गौरविले होते. असे म्हटले जाते की या हुकूमशाह ला त्याच्या विरोधी पक्षनेत्यांचे डोके कापून आपल्या फ्रीज मध्ये ठेवायला आवडत असे.
सपार्मुरात नियाझोव – Saparmurat Niyazov
नियाजोव हा तुर्कमेनिस्तान चा राष्ट्रपति हुकूमशहा होता. येथील राष्ट्रपती ला संपूर्ण देशाचे अधिकार होते. हा हुकूमशहा जो निर्णय घेणार तो संपूर्ण देशात लागू व्हायचा. हा हुकूमशहा काही कमी नव्हता, या हुकूमशहा ला सुध्दा स्वतःचे नाम इतरांपेक्षा वेगळे दिसायला पाहिजे असे त्याचे मत होते, यासाठी त्याने तुर्कमेनिस्तान मध्ये बनलेल्या नवीन ठिकाणांना त्याचे नाव दिले होते, मग ते नवीन पार्क असो गार्डन असो रस्ते असो की नवीन शहरे.
एवढेच नाही तर स्वतःच्या नावाला लोकांनी भविष्यात सुध्दा आठवण ठेवले पाहिजे म्हणून त्याने वर्षाच्या पहिल्या महिन्याचे नाव म्हणजेच जानेवारी ला स्वतःचे नाव दिले होते. तर आपण समजू शकता की हा हुकूमशहा कसा असेल, देशात काही गोष्टींवर त्याने प्रतिबंध सुध्दा ठेवलेला होता जसे माणसांचे केस लांब असल्यास त्याला शिक्षा होत होती. याप्रकारे कारण त्याला ते आवडत नसे.
फ्रांसवा डूवलियर – François Darlan
फ्रांसवा डूवलियर हे हैती चे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. हे सुध्दा मोठमोठ्या हुकूमशहां च्या यादीत येतात जे थोडे विचित्र होते. हे त्या हुकूमशहां पैकी होते जे अंधश्रद्धा वर विश्वास ठेवत असतं. यांचे असे मत होते की प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला त्यांच्या शरीरात एका आत्मीय शक्तीचा वास होत असे. ज्यामुळे ते फक्त महिन्याच्या २२ तारखेला आपल्या घराच्या बाहेर पडायचे. आणि त्यांच्या मते या आत्मीय शक्तींमुळे अमेरिकेचे राहिलेले माजी राष्ट्रपती जॉन एफ कैनेडी यांची हत्या झाली होती. असे त्यांचे म्हणणे होते.
कॅलिगुला – Caligula
कैलिग्यूला जगातील पहिला हुकूमशहा म्हणून ओळखल्या जातो, हा रोमन साम्राज्याचा हुकूमशहा होता. या हुकूमशहा ला आपल्या जीवनात घोड्यांची शर्यत लावण्याचा आणि घोड्यांना आपल्या जवळ जमा करण्याची आवड होती. त्याच्याजवळ बरेचशे घोडे होते पण त्यापैकी त्याचा एक घोडा खूप आवडीचा होता, या आवडीच्या घोड्यासाठी त्याने एक वेगळ्या घराचे निर्माण केले होते.
तसेच त्या घोड्याला कोणतीही इजा पोहचू नये म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या आजूबाजूला सैनिकांचा पहारा ठेवला होता. एवढंच नाही तर त्या घोड्याला दारू पाजल्या जात असे, आपण म्हणत असणार की यामध्ये नवीन काय? तर ती दारू सोन्याच्या भांड्यात पाजल्या जात असे. यावरून आपण सुध्दा समजू शकता की हा हुकूमशहा किती शौकीन होता.
तर हे होते जगातील काही हुकूमशहा जे आपल्या वागणुकी मुळे जगात प्रसिध्द होते. आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!