Golden Baba Sudhir Kumar Makkad
गोल्डन बाबा म्हणून देशात प्रसिध्द असणारे सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा यांचे गेल्या मंगळवारी तब्येत अस्वस्थ असल्याने निधन झाले. सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा यांनी संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, काही व्यक्ती घरी सोन्याला ग्रॅम मध्ये विकत घेऊन ठेवतात पण सुधीर कुमार मक्कड हे किलोच्या प्रमाणात स्वतःच्या अंगावर सोने परिधान करायचे. म्हणून त्यांना संपूर्ण देशात गोल्डन बाबा म्हणून ओळखले जायचे. आजच्या लेखात आपण सुधीर कुमार मक्कड या व्यक्तीची गोल्डन बाबा बनण्यापर्यंतची छोटीशी स्टोरी पाहूया, आशा करतो आपल्याला आवडणार, तर चला पाहूया थोडीशी माहिती गोल्डन बाबा यांच्या विषयी.
गोल्डन बाबा विषयी मराठी माहिती – Golden Baba Sudhir Kumar Makkad Information in Marathi
गोल्डन बाबांचा जीवनपरिचय – Golden Baba Biography in Marathi
गोल्डन बाबा यांचे संपूर्ण नाव सुधीर कुमार मक्कड होते, ह्यांचा सुरुवातीला कपड्यांचा व्यापार होता, दिल्लीच्या गांधीनगर मध्ये यांचे कपड्यांचे दुकान होते, कपड्यांच्या दुकानापासून ते स्वतःची उपजीविका भागवत असतं. पण काही दिवसानंतर त्यांना कपड्यांच्या व्यवसायामध्ये नुकसान झाले तेव्हा त्यांनी तो व्यवसाय न करण्याचा विचार केला, आणि सरळ हरिद्वार ला जाऊन नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि काही दिवस विचार केल्यांनंतर त्यांनी हरिद्वार ला फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
याचदरम्यान त्यांची बऱ्याच साधू संतांशी भेट झाली, बरेच दिवस हरिद्वार मध्ये फुलांचा व्यवसाय केल्यानंतर अचानक त्यांनी तो व्यवसाय बंद केला. आणि काही दिवसांनंतर जमिनी खरेदी आणि विक्री करण्याचे काम सुरु केले, हा व्यवसाय करताना त्यांची कमाई वाढली. दिवसेंदिवस व्यवसाय वाढला आणि पैसे येत गेले, या व्यवसायानंतर २०१३ – १४ च्या सुमारास त्यांनी पुन्हा दिल्लीच्या गांधीनगर भागात परत येऊन त्यांचा छोटासा आश्रम सुरू केला.
त्यांनी २०१३ ला त्यांचा जमिनी खरेदी विक्री चा व्यवसाय बंद केला, सुधीर कुमार मक्कड यांना सुरुवाती पासूनच अंगावर मोठ्या प्रमाणात सोने परिधान करायला आवडायचे. सोबतच ते अंगावर करोडो रुपयांचे सोने घालत असतं. एवढंच नाही तर या सोन्याला परिधान करून ते मोठमोठ्या कावड यात्रा करायचे. कावड यात्रेत ते ब्रँडेड कार्स मध्ये बसून जात असत. आणि याच दरम्यान त्यांना गोल्डन बाबा म्हणून लोक ओळखायला लागले होते.
एवढंच नाही तर या गोल्डन बाबांच्या सुरक्षेसाठी नेहमी त्यांच्या आसपास काही सैनिकांचा घेराव असायचा. जे त्यांना सुरक्षा देत असतं. त्यांची सुरक्षा यासाठी होती कारण ते त्यांच्या अंगावर भले मोठे मोठे सोन्याचे दागिने घालत असतं. दागिन्यांसोबत देवीदेवतांचे लोकेट्स, हातात सोन्याचे कडे, हे सर्व दागिने असल्याने त्यांना सुरक्षा मिळाली होती.
या गोल्डन बाबांनी मागच्या वर्षी झालेल्या कावड यात्रे मध्ये आपल्या शरीरावर २० ऐवजी १७ किलो सोने घातले होते. या बदलाबद्दल बाबांना विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या वाढत्या वयामुळे एवढा भार सहन होत नाही म्हणून सोन्याचे प्रमाण कमी केले. त्यांना देशात बऱ्याच प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती, बऱ्याच लोकांना त्यांचे खरोखरचे नाव माहिती नव्हते कारण त्याची ओळख गोल्डन बाबा म्हणून झाली होती. पण गेल्या मंगळवारी त्यांचे निधन झाले. आणि गोल्डन बाबा अनंतात विलीन झाले.
अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!