1 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती, शिवाय, निधन वार्ता आणि त्यांनी केलेलं कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा आज जन्म दिन. स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने १ जुलै हा दिवस राजकीय कृषी दिन म्हणून साजरा करण्याची घोषण केली आहे. दरवर्षी १ जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करतात.
याव्यतिरिक्त, आज भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिन देखील आहे. तसचं, डॉ. विधान चंद्र्राय यांच्या जयंतीनिमित्त देशांत राष्ट्रीय चिकित्सक दिन देखील साजरा करण्यात येतो. मित्रांनो, आपल्या रोजच्या दैनदिन कामकाजामुळे आपण दरोरोज कामात व्यस्त असतो, आज वेळेला खूप महत्व आहे शिवाय, आजचे युग हे स्पर्धेचे युग बनलं आहे. त्यामुळे माणसे ही जास्त प्रमाणात तनावपूर्ण जीवन जगताना दिसतात.
माणसांची वागणूक ही दिवसांदिवस चिडक्या स्वरुपाची होत चालली आहे. यावर उपाय म्हणून सयुक्त राष्ट्राने १ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय विनोदी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. जेणेकरून या दिवसाच्या निमित्ताने लोक हास्य विनोद करून आपले जीवन जगतील.
जाणून घ्या १ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 1 July Today Historical Events in Marathi
१ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 July Historical Event
- इ.स. १६९३ साली मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर मुघलसाम्राज्यात गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
- इ.स. १८३७ साली इंग्लंड देशांत मानवी जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली.
- इ.स. १८७९ साली भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली.
- सन १९०९ साली भारतीय क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी भारत मंत्र्याचे स्वीय सहाय्यक इंग्रज अधिकारी कर्झन वायली यांची गोळ्या मारून हत्या केली.
- सन १९५५ साली भारतीय ‘स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. यापूर्वी या बँकेला ‘बँक इंपिरिअल बँक’ म्हणून ओळखले जात असे.
- सन १९६४ साली भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली.
- सन १९७५ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली.
- सन २०१७ साली देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.
१ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १६४६ साली प्रख्यात जर्मन गणितज्ञ व तर्कशास्त्र विद्वान गाटफ्रीड विलहेल्म लाइबनिज(Gottfried Wilhelm Leibniz) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८२ साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्रता सेनानी, प्रख्यात भारतीय चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८७ साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्मदिन.
- सन १९१३ साली महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिन.
- सन १९३८ साली प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्मदिन.
- सन १९४९ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष वेंकैया नायडू यांचा जन्मदिन.
- सन १९६१ साली भारत वंशीय अमेरिकन अंतराळवीर, अभियंता कल्पना चावला यांचा जन्मदिन. सन १९९७ साली कल्पना चावला यांनी प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबियावरून अवकाशात उड्डाण केलं होत.
- सन १९६८ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत परंपरेतील रामपूर-साहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांचा जन्मदिन.
१ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 July Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८६० साली रबरावरील व्हल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध लावणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ चार्ल्स गुडइयर (Charles Goodyear) यांचे निधन.
- सन १९३८ साली प्रख्यात भारतीय कायदेपंडित, विद्वान, राजकीय कार्यकर्ते व संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांचे निधन.
- सन १९४१ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रागतिक पक्षाचे नेता, श्रेष्ठ वृत्तपत्रकार तसचं, इंग्लंड देशांत आयोजित पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी व उत्तरप्रदेश राज्याचे माजी शिक्षणमंत्री सी. वाय. चिंतामणी यांचे निधन.
- सन १९६२ साली साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्रता सेनानी, प्रख्यात भारतीय चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचे निधन.
- सन १९६२ साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय स्वतंत्रता सेनानी राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक व अखिल भारतीय कॉंग्रेस चे माजी अध्यक्ष तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले पुरुषोत्तम दास टंडन यांचे निधन.
- सन १९८९ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, शिक्षणतज्ञ व बालसाहित्यिक प्राचार्य गणेश हरि पाटील यांचा जन्मदिन.
- सन १९९४ साली ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी नेपथ्यकार व पुण्यातील नाट्यचळवळीतील सक्रीय कार्यकर्ते राजाभाऊ नातू यांचा जन्मदिन.