28 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी असणारे दिनविशेष म्हणजेच, इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजच्या दिवशी सन १९७२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरु असलेलं युद्ध समाप्तीनंतर शिमला परिषदेचे आयोजन करण्यात आलं होत. त्या परिषदेचा प्रारंभ हा आजच्या दिवशी झाला होता. तसचं, सयुक्त राष्ट्राने देखील आजच्या दिवशी मानवी हक्कांसंबंधी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.
जाणून घ्या २८ जून रोजी येणारे दिनविशेष – 28 June Today Historical Events in Marathi
२८ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 June Historical Event
- इ.स. १८३८ साली इंग्लंड देशाच्या राणी व्हिक्टोरिया(Queen Victoria) यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
- सन १९७२ साली भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर सिमला परिषदेचा मसुदा तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला.
- सन १९७८ साली अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील आरक्षण निहाय प्रवेश प्रक्रिया बेकायदेशीर रित्या ठरवले.
- सन १९८१ साली चीनने कैलाश मानसरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला.
- सन १९८६ साली अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला.
- सन १९९५ साली वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.
- सन १९९८ साली संयुक्त राष्ट्रांने सन १९४८ साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास पन्नास वर्ष पूर्ण झाली.
२८ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १४९१ साली इंग्लंड देशाचे राजा हेनरी आठवा(Henry VIII of England) यांचा जन्मदिन
- इ.स. १७१२ साली फ्रेंच जिनेव्हन तत्वज्ञानी, लेखक आणि संगीतकार रुसो(Jean-Jacques Rousseau) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८३ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, हिंदी वृत्तपत्र “दैनिक आज” चे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्मदिन.
- सन १९२१ साली भारताचे माजी पंतप्रधान, तत्त्वज्ञ वकील व राजकारणी पी. व्ही. नरसिंहराव यांचा जन्मदिन.
- सन १९२८ साली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रीयन चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्रीय कलासंचालक बाबुराव नारायण सडवेलकर यांचा जन्मदिन.
- सन १९३४ साली माजी वेस्ट इंडीज कसोटी क्रिकेटपटू रॉय गिलक्रिस्ट(Roy Gilchrist ) यांचा जन्मदिन.
- सन १९३७ साली भारतीय मराठी भाषेचे लेखक, समीक्षक आणि महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी विचारवंत व बी. आर. आंबेडकर यांचे अनुयायी गंगाधर विठोबा पानतावणे यांचा जन्मदिन.
- सन १९७० साली माजी पाकिस्तान क्रिकेटपटू व प्रशिक्षक मुश्ताक अहमद मलिक यांचा जन्मदिन.
- सन १९७६ साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचा जन्मदिन.
- सन १९९५ साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालंपिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गावेलु यांचा जन्मदिन.
२८ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 June Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८३६ साली अमेरिकन राजकारणी, मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि संस्थापक तसचं, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेम्स मैडिसन(James Madison) यांचे निधन.
- सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ तसचं, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य पी. सी. महालनोबिस यांचे निधन.
- सन १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांतील गायक व व्हायोलिन वादक पंडित गजाननबुवा अनंत जोशी यांचे निधन.
- सन १९९९ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन भारतीय स्वातंत्र्यसैनिक नेते व झुंजार पत्रकार रामचंद्र विठ्ठल निसळ उर्फ रामभाऊ निसळ यांचे निधन.
- सन २००६ साली महाराष्ट्रीयन मराठी संत साहित्याचे विद्वान, साहित्यकार, समिक्षक व वक्ता निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.
- सन २००७ साली जपानच्या पूर्व पंतप्रधान कीची मियाजावा (Kichi Miyajwa) यांचे निधन.